एसबीआय जनरल इन्श्युरन्सची बस प्रवाश्यांना अंतर्गत प्रवास विमा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने इंटरसिटी रेलयात्री सोबत भागीदारी


               एसबीआय जनरल इन्श्युरन्सची बस प्रवाश्यांना अंतर्गत प्रवास विमा

उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने इंटरसिटी रेलयात्री सोबत भागीदारी
मुंबई, डिसेंबर 17, 2020: भारतातील अग्रणी जनरल इन्श्युरन्स कंपन्यांपैकी एक म्हणून गणना होणा-या एसबीआय जनरल इन्श्युरन्सने, इंटरसिटी रेलयात्री या मल्टि-मोडल शहरांतर्गत चलनवलन मंचाशी इंटरसिटी रेलयात्रीमार्फत प्रवास करणा-या ग्राहकांसाठी अंतर्गत प्रवास विमा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे अंतर्गत बस प्रवाश्यांना त्यांच्या प्रवास तिकिटासोबत 5 लाखांचे कॉंप्लिमेंटरी कव्हर मिळवण्याची संधी मिळणार आहे.
या भागीदारीच्या अंतर्गत एसबीआय जनरल्स इन्श्युरन्स अपघातात्मक मृत्यू, स्थायीस्वरुपाचे संपूर्ण अपंगत्व आणि वैद्यकीय इव्हॅक्युएशनचा आंतर्भाव करत वैविध्यपूर्ण कव्हरेज उपलब्ध करुन देणार आहे.
एसबीआय जनरल इन्श्युरन्सचे प्रमुख व्यवसाय अधिकारी श्री अमर जोशी म्हणाले, “आजच्या काळात अर्थकारणाच्या प्रत्येक पैलू आणि प्रत्येक विभागावर डिजीटलायजेशनचा प्रभाव आढळतो. तो अंतर्गत प्रवास बुकिंग्जपर्यंत देखील पोहोचताना दिसत आहे.
मनीष राठी, सीइओ, इंटरसिटी रेलयात्री म्हणाले,” आमच्यासाठी आमच्या प्रवाशांची सुरक्षितता हा नेहमीच सर्वात महत्वपूर्ण विषय होता आणि असेल. एसबीआय जनरल इन्श्युरन्स समाधाने आमच्या सुरक्षित, सोयीस्कर आणि विश्वासार्ह प्रवास अनुभवाच्या वचनबध्दतेला साजेशी आहेत आणि ती विस्तिर्ण समाधान निर्मितीच्या आमच्या इतर अग्रक्रमांना देखील जोड देतात. या भागीदारीच्या अंतर्गत, आम्ही प्रवाशासाठी प्रवास प्रिमियम शुल्क रद्द केले आहे, म्हणजेच इंटरसिटी स्मार्टबस प्रवाशाला बस तिकिटासह कॉंप्लिमेंटरी प्रवास विमा मिळणार आहे.”
कोणत्याही प्रकारच्या प्रवासाला सुरक्षित करणे आणि प्रवास बुकिंग करतेवेळी विम्याची जोड देणे अतिशय आवश्यक आहे, ज्यामुळे विमा संपूर्ण आणि सुरक्षित प्रवास पॅकेजची शाश्वती देतो. एसबीआय जनरलमध्ये आमचा असा विश्वास आहे की ही भागीदारी भारतातील इन्श्युरन्सच्या पोहोचेला वाढवेल आणि ग्राहकांच्या सुरक्षित प्रवासाच्या अनुभवाला शाश्वत करेल.”

a

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.