नीलकमलने आणला भारतातील पहिला सर्वांगीण स्लीप सोल्युशन ब्रॅण्ड, डॉक्टर ड्रीम्स

 नीलकमलने आणला भारतातील पहिला सर्वांगीण स्लीप सोल्युशन ब्रॅण्ड, डॉक्टर ड्रीम्स

 ख-या अर्थाने डिजिटल अनुभव- सुखद निद्रेची डिलिव्हरी एका बॉक्समधून, केवळ एक बटन क्लिक करून

नवोन्मेषकारी मॅट्रेसेस, उशा यांसारखी एक्स्लुजिव उत्पादने तसेच झोपताना ऐकण्याच्या गोष्टी, संगीत, स्लीप जर्नल्स आणि यांसारखे अनुभव यांच्या माध्यमातून गाढ झोपेची निश्चिती करणारी सर्वसमावेशक सोल्युशन्स

मुंबई, 6th January 2021: भारताच्या आवडत्या फर्निचर ब्रॅण्डने अर्थात नीलकमलने अलीकडेच देशातील पहिला सर्वांगीण स्लीप सोल्युशन ब्रॅण्ड- डॉक्टर ड्रीम्स- सर्वांपुढे आणला. डिजिटल विश्वात रमणा-या मिलेनियल्सना डोळ्यापुढे ठेवून तयार करण्यात आलेला हा ब्रॅण्ड अनेकविध उत्पादने, सोल्युशन्स आणि डिजिटल अनुभव देऊ करतो. यामध्ये नवोन्मेषकारी मॅट्रेसेस, मॅट्रेस प्रोटक्टर्स, उशा, गाद्या आणि ब-याच उत्पादनांचा समावेश आहे. ही उत्पादने ग्राहक केवळ एक बटन क्लिक करून प्राप्त करू शकतात! एका कल्पक डिझाइनसह बॉक्समध्ये पॅक घेऊन येणा-या डॉक्टर ड्रीम्स मॅट्रेसेस हे ब्रॅण्डच्या ‘हॅपी स्लीप डिलिव्हर्ड’ या मूल्यविधानाचे जिवंत स्वरूप आहे.

 व्यक्तीच्या एकंदर मानसिक व शारीरिक स्वास्थ्यांमधील झोपेचे महत्त्व लक्षात घेऊन डॉक्टर ड्रीम्सने ग्राहकांमधील झोपेशी निगडित असंख्य व्यथा समजून घेण्यासाठी सोशल लिसनिंगचा उपयोग करून घेतला. या माहितीच्या आधारावर तसेच देशामध्ये सर्वोत्तम स्लीप सोल्युशन्स पुरवण्याच्या उत्कट इच्छेतून, डॉक्टर ड्रीम्सने अनेकविध उत्पादने, अ‍ॅक्सेसरीज आणि सॉफ्ट सोल्युशन्सच्या माध्यमातून एक सर्वसमावेशक निद्रा परिसंस्था निर्माण केली. डॉक्टर ड्रीम्स मॅट्रेसेस झोपेचे विशिष्ट प्रकार, शरीराचे एर्गोनॉमिक्स आणि भारतातील प्रचलित हवामानाची स्थिती हे सर्व लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आल्या आहेत. या जागतिक दर्जाच्या उत्पादनांशिवाय डॉक्टर ड्रीम्सने स्लीप जर्नल, स्लीप म्युझिक आणि स्लीप स्टोरीज यांसारखे अनेकविध डिजिटल अनुभव निर्माण केले आहेत.

 नीलकमल लिमिटेडचे वरिष्ठ महाव्यवस्थापक (ई-कॉम हेड अँड बायिंग) श्री. विनोद खंडेलवाल डॉक्टर्स ड्रीम्सबद्दल म्हणतात, “झोपेचा काळ हा प्रत्येकासाठी आनंदाचा काळ असतो आणि शरीराची ती अंगभूत गरज आहे. एक टीम म्हणून आम्ही सर्वांत सुखद झोप मिळवून देण्याच्या मोहिमेवर आहोत. आम्ही एक सर्वसमावेशक निद्रा परिसंस्था निर्माण करण्यावर काम करत आहोत. यामध्ये आम्ही उत्पादनांच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञान व सेवांचा लाभ घेऊन ग्राहकांना सर्वांत आरामदायी व सुखद झोप मिळेल याची काळजी घेत आहोत. आमचा प्रत्येक ग्राहक आमच्या उत्पादनाबाबत पूर्णपणे समाधानी असावा या हेतूने डॉक्टर ड्रीम्स मॅट्रेस १०० रात्रींच्या मोफत ट्रायलसह दिली जाते.  आणखी पुढे जात, सर्व ५ संवेदनांवर प्रभाव टाकून झोपेच्या प्रत्येक अंगावर लक्ष देणारे सोल्युशन देण्याची आमची इच्छा आहे. उत्पादनाच्या खरेदीसोबत संपणा-या व्यवहार्य संबंधाच्या पलीकडे जाऊन ग्राहकांसोबत दीर्घकाळ टिकणारे नाते जोडण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे. आम्हाला उत्पादन ब्रॅण्डहून अधिक सेवा ब्रॅण्ड अशी ओळख प्राप्त करण्याची इच्छा आहे.”

 

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.