महाराष्ट्रातील ७५ टक्के महिलांकडे आपली आवड जोपासण्यासाठी फक्त ३० मिनिटे असतात, जेमिनी कुकिंग ऑईलचे सर्वेक्षण

महाराष्ट्रातील ७५ टक्के महिलांकडे आपली आवड जोपासण्यासाठी फक्त ३० मिनिटे असतात, जेमिनी कुकिंग ऑईलचे सर्वेक्षण

 

नवी मुंबई, १४ जानेवारी २०२१ : महाराष्ट्रातील दर १० पैकी ६ महिलांना स्वयंपाकातील वेळ वाचवून तो वेळ आपल्या आवडीनिवडींच्या कामासाठी वापरणे आवडेल, असे महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये जेमिनी कुकिंग ऑईलतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. #IgnitingAspirations या सर्वेक्षणातून असेही स्पष्ट झाले की, ४० ते ४५ या वयोगटातील ६१ टक्के महिला त्यांचा बहुतांश वेळ घरातील कामे, विशेषत: स्वयंपाक आणि मुलांची काळजी घेणे यात घालवतात. खरे तर सर्वक्षणात सहभागी झालेल्या ६० टक्क्यांहून अधिक महिलांना फक्त गृहिणी न राहता त्यापलिकडे काहीतरी करायचं आहे. या सर्वेक्षणानुसार तरुण पुरुष घरातील महिलांना घरगुती कामांमध्ये अधिक साह्य करतात, २१ ते २५ वयोगटातील ७४ टक्के महिलांना पुरुषांकडून साह्य मिळते, अगदी नवी मुंबई (९० टक्के), ठाणे (९९ टक्के), मुंबई (८२ टक्के) आणि पुणे (८० टक्के) अशा मोठ्या शहरांमध्ये दिसून आले.

 

कुटुंबाचे आरोग्य आणि पोषण याकडे लक्ष देणे सर्वात महत्त्वाचे आहे, यावर महिलांचा ठाम विश्वास आहे, असे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. सर्वेक्षणातील ६५ टक्के महिलांना वाटते की, त्यांनी बनवलेले अन्न अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी असते. मात्र, आपल्या महत्त्वाकांक्षा जोपासण्यासाठी त्यांना घरगुती कामांमध्ये जाणारा वेळ कमी करायचा आहे. आपली आवड जोपासायची आहे, असे महाराष्ट्रातील ६० टक्के महिलांनी सांगितले. नाशिक, सोलापूर आणि पुणे ही तीन शहरे यात आघाडीवर आहेत. या शहरातील महिलांना रोजच्या घरगुती कामांतून ३० मिनिटे जरी अधिक मिळाली तरी स्वत:ची आवड जपायची आहे. आपली आवड जपण्यासाठी ३७ टक्के महिलांना कुटुंबियांकडून अधिक पाठिंबा आणि प्रोत्साहनाची अपेक्षा आहे, असेही या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.

 

या सर्वेक्षणाबद्दल कारगिलच्या भारतातील तेल उद्योगाचे मार्केटिंग प्रमुख सुबिन सिवन म्हणाले, “जेमिनी ऑईलच्या #IgnitingAspirations सर्वेक्षणातील निषकर्षांमुळे आमच्या ग्राहकांसाठी अधिक वेळ देऊ करणाचा जेमिनी ब्रँडचा प्रयत्न अधोरेखित झाला आहे. गृहिणी स्वयंपाकघरात बराच वेळ व्यतित करतात आणि या जागतिक महासंकटामुळे त्यात भरच पडली आहे, हेही यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना स्वत:साठी फारच कमी वेळ मिळतो. न्यूट्रीफ्रेशलॉकसारख्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानातून त्यांना स्वयंपाकघरातील वेळ कमी करता यावा आणि आवडीनिवडी, छंद जोपासण्यासाठी वेळ मिळावा यात साह्य करण्याची आमची बांधिलकी यातून अधिक दृढ झाली आहे.”

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.