स्मार्टकेमची अॅग्रोस्टारसोबत भागीदारी, खतांची होम डिलिव्हरी करणार

 

स्मार्टकेमची अॅग्रोस्टारसोबत भागीदारी, खतांची होम डिलिव्हरी करणार

 

Ø  या भागीदारीमुळे शेतकऱ्यांना उच्च दर्जाची पोषक महाधन उत्पादने अॅग्रोस्टारच्या डिजिटल अॅग्री-टेक व्यासपीठाच्या माध्यमातून घरपोच मागवता येणार

Ø  इंडियन क्रॉप न्युट्रिशन कंपनीच्या थेट अंतिम ग्राहकापर्यंतच्या वितरण धोरणातील आघाडीचे घटक

 

पुणे : 5 जानेवारी 2021: खतांमधील एक आघाडीची कंपनी स्मार्टकेम टेक्नॉलॉजीस लिमिटेड या दीपक फर्टिलायझर्स आणि पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएफपीसीएल) या भारतातील आघाडीच्या फर्टिलायझर्स आणि इंडस्ट्रियल केमिकल्समधील आघाडीच्या कंपनीच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने आज अॅग्रोस्टार या आघाडीच्या अॅग्री-इनपूट ई-कॉमर्स व्यासपीठासोबत भागीदारी केल्याची घोषणा केली. ग्राहकांना सेवा आणि उत्पादने वितरित करण्याच्या पद्धतीत डिजिटलायझेशनमुळे प्रचंड वेगाने बदल होत असल्याने या भागीदारीमुळे मूल्यवर्धित, अनोखी खते शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यात साह्य होणार आहे. सध्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना खतांच्या होम डिलिव्हरीच्या सेवेचा लाभ मिळत आहे. भविष्यात इतर भागांमध्येही ही सेवा सुरू करण्याची योजना आहे.

 

या घडामोडींबद्दल डीएफपीसीएलच्या क्रॉप न्युट्रिशन व्यवसायाचे अध्यक्ष महेश गिरधर म्हणाले, "'न्यू नॉर्मल' स्थिती म्हणजे अडथळ्यांवर योग्य लक्ष देऊन त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न करणे. कोविड-19च्या संकटाने आणि मोबाइल डेटा स्वस्तात उपलब्ध झाल्याने अगदी ग्रामीण भागातही ई-कामॅर्स व्यासपीठांचा वापर वाढला आहे आणि हा ट्रेंड हळूहळू कृषी क्षेत्रातही दिसून येत आहे. शेतकऱ्यांनाही आता पारंपरिक सेवांपलिकडे विविध पर्यायांची उपलब्धता होत आहे. शेतकऱ्यांना आता उच्च दर्जाची महाधन उत्पादने घरपोच केली जातील."

"अॅग्रोस्टार या भारतातील आघाडीच्या अॅगटेक स्टार्ट-अपसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे. शेतकऱ्यांची उत्पादकता आणि उत्पन्न वृद्धिंगत करून त्यांना सक्षम करण्याचे आमचे समान ध्येय आहे," महेश पुढे म्हणाले.

अॅग्रोस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक शार्दुल शेठ म्हणाले, "शेतकऱ्याला त्याचे उत्पादन आणि मालाचा दर्जा वृद्धिंगत करायचा असेल तर उत्तम प्रतीची पोषकतत्वे उपलब्ध असणे आणि कधी, काय वापरावे याची माहिती असणे फार आवश्यक असते. स्मार्टकेम टेक्नॉलॉजीससोबत भागीदारी करून त्यांची उत्पादने आम्ही कार्यरत असलेल्या विविध राज्यांमध्ये अधिक व्यापक प्रमाणावर पोहोचवण्यास आम्ही उत्सुक आहोत."

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.