द्वारा केजीएफएस ला क्रिसिलची BBB+ रेटिंग

 द्वारा केजीएफएस ला क्रिसिलची BBB+ रेटिंगमुंबई,  फेब्रुवारी २०२१: क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलने द्वारा केजीएफएसला बीबीबी+ / स्टेबलचे दीर्घकालीन रेटिंग दिले आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलने द्वारा क्षेत्रीय ग्रामीण फायनान्शियल सर्व्हिसेस (द्वारा केजीएफएस) ला ‘स्थिर’ दृष्टिकोनासह बीबीबी+ रेटिंग निश्चित केले आहे. हि रेटिंग द्वारा केजीएफएस ऑपरेशन्सला सामर्थ्यवान बनवते आणि तिची आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये मजबूत स्थिती दर्शवते.

याविषयी बोलताना द्वारा केजीएफएसचे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. सी ओ जोबी म्हणाले कि, "क्रिसिलने दिलेले बीबीबी+ रेटिंग हे द्वारा केजीएफएसने गेल्या अनेक वर्षात सातत्याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर द्वारा कमावलेल्या विश्वासार्हतेचे समर्थन आहे. बळकट आणि अत्याधुनिक डिजिटल क्षमतांचे समर्थन असलेल्या आमच्या अद्वितीय ग्राहक केंद्रित वेल्थ मॅनेजमेन्ट दृष्टीकोन, दीप ग्रामीण फोकस आणि सुधारित ऑपरेशन प्रक्रियेविषयी हे सकारात्मक प्रतिबिंब आहे."

क्रिसिलने दिलेल्या रेटिंगचे महत्त्व सांगताना द्वारा केजीएफएसचे मुख्य वित्तीय अधिकारी जी विजयकुमार म्हणाले, "बीबीबी ते बीबीबी+ पर्यंत रेटिंगमध्ये केलेली ही महत्त्वपूर्ण सुधारणा कोविड-१९ द्वारे झालेल्या गंभीर विचलनाचा विचार करता एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे आणि आम्ही बर्‍याच वर्षांमध्ये तयार केलेल्या सक्षम व्यावसायिक व्यासपीठाची साक्ष आहे. आमचे गुंतवणूकदार आणि सावकारांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आणि आत्मविश्वास यामुळे दृढ होईल. तसेच आम्हाला आशा आहे की यामुळे येत्या तिमाहीत आमच्या निधी उभारणीच्या प्रयत्नांना चालना मिळेल."

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.