सिगनिया – मुंबईकरांसाठी सर्वोत्तम हिअरींग केअर!
सिगनिया – मुंबईकरांसाठी सर्वोत्तम हिअरींग केअर!

 

सिवान्तोस इंडिया आणि मृदुल हिअरींग एड सेंटरच्या वतीने मुंबईत 250वे बेस्ट साऊंड सेंटर 

23 फेब्रुवारी, 2021, मुंबईवयाच्या कोणत्याही टप्प्यावर श्रवणशक्तीचा ऱ्हास होऊ शकतो. याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असते. एकूण लोकसंख्येच्या 6% व्यक्तींना थोड्याफार फरकाने कमी ऐकू येते असे संशोधनातून स्पष्ट होते. हे लक्षात घेता, सिवान्तोस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने मुंबईत (ग्रँट रोड) येथे मृदुल हिअरींग एड सेंटरच्या साथीने पहि बेस्ट साऊंड सेंटर लॉन्च केले. बेस्ट साऊंड सेंटर (बीएससी) हे एक अत्याधुनिक हिअरींग केअर सेंटर आहे. ज्यामुळे बहिरेपणाची शिकार ठरलेल्यांना गुणवत्तापूर्ण श्रवणशक्तीचा लाभ होऊ शकतो. सिगनिया / सिमेन्स हिअरींग साधनासमवेत सर्वोत्तम श्रवण शक्तीची हमी मिळते! जगभरातील तीनपैकी एक श्रवण यंत्र हे सिवान्तोस निर्मित असते.     

 

सिवान्तोस इंडिया प्रा. लि. आणि मृदुल हिअरींग एड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने 250व्या बेस्ट साऊंड सेंटरच्या लॉन्चची घोषणा  मोठ्या उत्साहाने करण्यात आली. ध्वनी गुणवत्ता तसेच मुंबईच्या लोकांना चांगली कनेक्टीव्हीटी राहावी या दृष्टीने हे पाऊल अतिशय महत्त्वाचे ठरते. नागरीकांना वैयक्तिक श्रवण शक्तीवर चांगले नियंत्रण राखायला या सुविधेची मदत होणार आहे. द बेस्ट साऊंड सेंटरच्या माध्यमातून आमचा सातत्याने नवीन तंत्रज्ञान पर्यायांवर भर राहणार असून उपभोक्त्यांना सर्वोच्च श्रवण शक्ती अनुभव उपलब्ध करून त्यांच्या वैयक्तिक गरजेनुरूप प्रगत डिजीटल उत्पादने सादर करणार आहोत,” असे सिवान्तोस इंडिया प्रा. लि.चे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर सिवान्तोस इंडिया प्रा. लि. अविनाश पवार म्हणाले.

 

या नवीन श्रवण यंत्राच्या साथीने श्रवण आरोग्य देखभाल व्यावसायिकांना आधुनिक उपभोक्त्यांच्या मागणीनुरूप गरजा पूर्ण करणे शक्य झाले आहे, जेणेकरून रुग्णांसंबंधी असलेले त्यांचे नाते दृढ होईल” असे श्री. पवार यांनी सांगितले.

 

मृदुल हिअरींग एड सेंटर बेस्ट साऊंड सेंटरच्या माध्यमातून सिगनिया हिअरिंग इंस्ट्रूमेंट उपभोक्त्यांना जागतिक दर्जाची ग्राहक देखभाल उपलब्ध करून देणार आहे. द बेस्ट साऊंड सेंटरच्या दालनात उपलब्ध सुविधा पुढीलप्रमाणे:

                   

o   सिगनिया हिअरींग केअर उत्पादनाचा विशेष प्रचार

o   तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत ध्वनीसंबंधी पर्यायांसाठी व्यावसायिक सेवा उपलब्ध

o   प्रगत श्रवण तंत्रज्ञानाचा वापर

o   सर्वप्रकारच्या ग्राहकांकरिता उपयुक्त

o   गुणवत्ता तसेच विश्वासाची हमी

o   अत्याधुनिक स्वरुपाच्या बेस्ट साऊंड टेक्नोलॉजीवर भर

 

सर्व वयोगटातील उपभोक्त्यांच्या आजच्या काळातील गरजांनुरूप नाविन्यपूर्ण श्रवण पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या ग्रँट रोड येथील मुंबई सेंटरचे करण्यात आलेले उदघाटन हे आणखी एक पुढे उचललेले पाऊल म्हणावे लागेल. बेस्ट साऊंड सेंटर येथील अनुभवी ऑडिओलॉजीस्ट श्रवणदोष जाणवणाऱ्या ग्राहकांची लक्षणेत्यांची कारणे तपासणे, चाचण्या करणे तसेच त्यानुसार पर्याय उपलब्ध करून देण्यात मदत देऊ करतील. ज्यामुळे भविष्यात होणारी कानांची क्षती टाळणे शक्य होईल. त्याचप्रमाणे व्यक्तींना चांगल्याप्रकारे संभाषण साधता येईल. श्रवणदोषाचे निदान प्रारंभिक अवस्थेत झाल्यास होणारे नुकसान वेळीच थांबवणे शक्य होईल, उत्तम परिणाम दिसू लागतील,” असे मृदुल हिअरींग एड सेंटरचे संचालक मृदुल राऊत म्हणाले.

 

मृदुल हिअरींग एड सेंटर ही एक नामांकीत श्रवण यंत्र उत्पादने उपलब्ध करून देणारी कंपनी असून या कंपनीत श्रवण देखभाल क्षेत्रात 2 दशकांहून अधिक अनुभव असणारे व्यावसायिक कार्यरत आहेत. मृदुल हिअरींगची मुंबईत 5 (पाच) अत्याधुनिक आणि व्यापक स्वरुपाच्या सुविधा देणारी वाचा आणि श्रवण विषयक चिकित्सालये आहेत. वाचा तसेच श्रवण समस्या असणाऱ्या व्यक्तींना सर्वोत्तम वैयक्तिक देखभाल सेवा पुरविण्याचे आमचे अभियान आहे,” असे मृदुल हिअरींग एड सेंटरचे संचालक मृदुल राऊत यांनी पुढे बोलताना सांगितले.

 

बेस्टसाऊंड सेंटर येथील अनुभवी व्यावसायिकांद्वारे श्रवण दोष जाणवणाऱ्या व्यक्तीची वैयक्तिक चाचणी केली जाते. ज्यामुळे लक्षणे जाणून घेणे सोपे जाते आणि पीडित व्यक्तीवर या दोषाचा परिणाम किती खोलवर झाला आहे, याचा अंदाज बांधणे सोपे जाते.  श्रवण दोष आढळणाऱ्या व्यक्तींची काही एकसमान लक्षणे म्हणजे या व्यक्ती उच्चारलेल्या वाक्यांचा पुनरुच्चार करायला लावतात, समोरची व्यक्ती काय म्हणते आहे ते समजून घेणे त्यांच्याकरिता कठीण होते, या व्यक्ती टीव्ही अथवा रेडीओचा आवाज मोठा करून ऐकतात, संवाद साधण्यास होणाऱ्या अडथळ्याचा ताण जाणवू लागल्याने समाजातील वावर टाळू लागतात, त्यांना सार्वजनिक समारंभांवरून परतल्यानंतर थकवा जाणवू लागतो तसेच बरेच तास लक्ष एकवटून कानोसा घेण्याचा प्रयत्न करतात इत्यादी.

 

मृदुल हिअरींग एड सेंटर – हे मुंबईतील बेस्ट साऊंड सेंटर असून याठिकाणी सर्वसमावेशक ऑडीओ-वेस्टीब्यूलर अँड स्पीच लँग्वेज थेरपी सेवा जसे की, प्युअर टोन ऑडियोमेंट्रीटायंपॅनोमेंट्रीओएई, बेरा त्याचप्रमाणे हिअरींग एड ट्रायल अँड फिटींगहिअरींग एड प्रोग्रामिंग, सर्विसिंग, स्पेअर अँड एक्सेसरीस्पीच थेरपी इ. चा समावेश आहे.

इथे भेट देण्याकरिता पत्ता – दुकान क्र 42, तळमजला, 3 क्रेसेंट मेंशन, गावदेवी पोलीस ठाण्यासमोर, पंडिता रमाबाई मार्ग, गावदेवी, ग्रँट रोडमुंबई – 400007 किंवा अपॉइंटमेंटसाठी 81081 91968  वर संपर्क करा.  

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.