एएससीआयच्या गेमिंगविषयक मार्गदर्शक तत्त्वांना ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद

 

एएससीआयच्या गेमिंगविषयक मार्गदर्शक तत्त्वांना ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद 

 

७ आठवड्यांत संभाव्य उल्लंघनांच्या विरोधात ८०हून अधिक तक्रारींवर प्रक्रिया 

मुंबई, फेब्रुवारी २०२०: दि अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्डस् कौन्सिल ऑफ इंडियाने अर्थात एएससीआयने घालून दिलेल्या रिअल-मनी गेमिंगशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांना प्रचंड प्रतिसाद प्राप्त होत आहे. ही तत्त्वे १५ डिसेंबरपासून लागू झाली आहेत. त्यानंतरच्या सात आठवड्यांतच एएससीआयने मार्गदर्शक तत्त्वांच्या संभाव्य उल्लंघनांबाबतच्या ८१ जाहिरातींविरोधातील तक्रारींवर प्रक्रिया केली. यातील सुमारे ७५ टक्के तक्रारी या शेवटच्या ग्राहकांकडून (एण्ड कंझ्युमर) आलेल्या होत्या, तर उर्वरित एएससीआयने स्वयंस्फूर्तीने घेतल्या होत्या.

यापैकी १५ प्रकरणांमध्ये, एएससीआयचे पत्र प्राप्त झाल्यानंतर जाहिरातदारांनी स्वेच्छेने जाहिराती मागे घेतल्या. अन्य २७ प्रकरणांमध्ये जाहिरातदारांनी तक्रार दाखल झाल्यानंतर पण एएससीआयचे पत्र मिळण्यापूर्वीच जाहिराती काढून घेतल्या होत्या. २ प्रकरणांमध्ये जाहिरातदारांनी तक्रारीला आव्हान दिले पण त्यांच्या जाहिराती नियमांचे उल्लंघन करणा-या आहेत असा निष्कर्ष एएससीआयने काढल्यामुळे तक्रारींचे समर्थन करण्यात आले. ३७ जाहिरातींविरोधातील तक्रारी सध्या प्रक्रियाधीन आहेत. यात एएससीआयने जाहिरातदारांकडून स्पष्टीकरण मागितले आहे आणि त्यांच्या उत्तराची प्रतिक्षा सुरू आहे. 

प्लॅटफॉर्म्सचा विचार करायचा तर, प्राप्त झालेल्या सर्वाधिक तक्रारी इन्स्टाग्रामवरील (३९) जाहिरातींबाबत होत्या, तर त्याखालोखाल यूट्यूबवरील जाहिरातींबाबत ३७ तक्रारी होत्या. गेम्सच्या प्रकारांचा विचार करता, क्रिकेटविषयक जाहिरातींबाबत ५५, तर रमीच्या जाहिरातींच्या १५ तक्रारी होत्या. 

प्रत्यक्ष पैशाचा सहभाग असलेल्या ऑनलाइन गेम्सच्या जाहिरातींबद्दलच्या प्रमुख चिंतांचे निराकरण या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे होत आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जाहिरातदारांनी अल्पवयीन वापरकर्त्यांना लक्ष्य करू नये, गेम्सना उपजीविकेचा संभाव्य स्रोत म्हणून सादर करू नये किंवा त्यांचा संबंध यशाशी जोडू नये. याशिवाय, सर्व जाहिरातींमध्ये आर्थिक नुकसानीचा धोका तसेच या गेम्सच्या आहारी जाण्याचा धोका यांबद्दल अस्वीकृतीचा (डिसक्लेमर) समावेश करणे मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक करण्यात आले आहे. या मार्गदर्शक तत्त्वांना माहिती व प्रसारण मंत्रालयाचा पाठिंबा आहे. जाहिरातींनी एएससीआय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे अशा अर्थाचे निर्देश मंत्रालयाने जारी केले आहेत. 

एएससीआयच्या महासचिव मनिषा कपूर म्हणाल्या: “ऑनलाइन रिअल मनी गेमिंग हा मोठा उद्योग झाला असल्याने वेगवेगळ्या संबंधितांनी संभाव्य धोक्यांबाबत चिंता व्यक्त केल्या आहेत. ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी तसेच ग्राहक व संबंधितांच्या वाजवी  चिंतांचे निरसन करण्यासाठी एएससीआयने गेमिंग मार्गदर्शक तत्त्वे आणली. या तत्त्वांचे संभाव्य उल्लंघन होत असलेल्या जाहिरातींबद्दल तक्रारी करण्यास ग्राहक पुढे आले, याचा आम्हाला खूपच आनंद आहे. आम्हीही, टॅम मीडिया रिसर्च या आमच्या सहयोगींच्या माध्यमातून, या जाहिरातींवर बारीक लक्ष ठेवून आहोत. या सहयोगामुळे आम्ही डिजिटल क्षेत्रावर अधिक कार्यक्षमतेने लक्ष ठेवू शकत आहोत. या उपायांमुळे प्रत्यक्ष पैसे जिंकून देणा-या ऑनलाइन गेमिंगच्या जाहिराती अधिक पारदर्शक व ग्राहकांसाठी सुरक्षित होतील, अशी आशा आम्हाला वाटते.

ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यापूर्वी माहिती व प्रसारण मंत्रालय, ग्राहक व्यवहार मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, उद्योगक्षेत्रातील संबंधित तसेच ग्राहक हितसंरक्षक समूह व व्यक्ती अशा अनेक संबंधितांशी चर्चा करण्यात आली. 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24