जागतिक कर्करोग दिनानिमित्त एसबीआय जनरल इन्शुरन्स’चे #MakeHopeWin करिता योगदान

 जागतिक कर्करोग दिनानिमित्त एसबीआय जनरल इन्शुरन्स’चे #MakeHopeWin करिता योगदान


~ अॅक्यूट लिम्फोब्लास्टीक ल्यूकेमियाग्रस्त बालकांना उपचारांकरिता हातभार ~


मुंबई, 08 फेब्रुवारी 2021: एसबीआय जनरल इन्शुरन्स, ही भारतातील जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक अग्रगण्य कंपनी असून त्यांच्या वतीने दुर्बल घटकातील अॅक्यूट लिम्फोब्लास्टीक ल्यूकेमियाग्रस्त बालकांना साह्य उपलब्ध करून देण्याकरिता प्रतिज्ञा घेण्यात आली. या उद्देशाच्या अनुषंगाने एसबीआय जनरल’च्या वतीने जागतिक कर्करोग दिन (4th Feb 2021)च्या निमित्ताने #MakeHopeWin कॅम्पेनची सुरुवात करण्यात आली.


या कॅम्पेन अंतर्गत, उपक्रमाला हातभार लावण्याच्या उद्देशाने एसबीआय जनरलमार्फत त्यांच्या डिजिटल असेटमार्फत काढण्यात येणाऱ्या प्रत्येक जनरल इन्शुरन्स पॉलिसीमागे, रु. 500 दान करण्याचे निश्चित केले आहे. या दान करण्यात आलेल्या निधीचा वापर कॅनकिड्स किड्सकॅन एनजीओद्वारे दुर्बल घटकांतील कर्करोगग्रस्त बालकांना उपचार आणि उपचार-पश्चात साह्य उपलब्ध करून देण्यासाठी होणार आहे.   


या उपक्रमातंर्गत, एसबीआय जनरलचे उद्दिष्ट हे कर्करोगग्रस्त जीवाच्या आयुष्यात आशा आणि सकारात्मकता फुलविण्याचे असेल. या कॅम्पेनचा भाग म्हणून कंपनीच्या वतीने कर्करोगातून सावरलेल्यांच्या यशोगाथा आणि जिद्द सोशल मीडियावर शेअर करणार आहे. ज्यामुळे कर्करोगाशी मुकाबला करणाऱ्या अनेकांच्या मनात जगायची नवीन आशा उत्पन्न होईल. त्यामुळे सर्वांना एकत्र मिळून #MakeHopeWin प्रत्यक्षात आणणे शक्य होईल.   


एसबीआय जनरलचे एमडी आणि सीईओ पीसी कंडपाल याविषयी बोलताना म्हणाले की, “समाजाला मोठ्या प्रमाणात कशाप्रकारे साह्य करता येईल, यादिशेने आमचा प्रयत्न असणार आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ)च्या अहवालानुसार, दरवर्षी भारतात सुमारे 1.16 दशलक्ष नवीन कर्करोग केस आढळून येतात. सुमारे 10 भारतीयांपैकी एका व्यक्तीत, त्यांच्या जीवनाच्या एखाद्या टप्प्यावर कर्करोगाचे निदान होऊ शकतो. तसेच या विकाराने 15 पैकी एक व्यक्ती मृत्युमुखी पडते. ही वास्तविक स्थिती लक्षात घेता, एसबीआयजीमध्ये आम्ही #MakeHopeWin संकल्पना राबवून ती लॉन्च केली आहे.


या उपक्रमासोबत, कॅनकिड्स किड्सकॅन एनजीओच्या माध्यमातून आमचा उद्देश दुर्बल घटकांतील बालकांना मदत करण्याचा राहील. दिनांक 4 ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान डिजीटल पर्यायातून विकल्या जाणाऱ्या प्रत्येक पॉलिसीमागे रु. 500 दान करण्यात येणार आहेत. या एकीकृत उपक्रमाच्या माध्यमातून, आम्ही अनुभव शेअर करणे, समाजाची शक्ती दाखवणे तसेच सर्वांना एकत्र आणून मदत उपलब्ध करून देण्याच्या दिशेने मदत करणार आहोत.”   


व्हीडिओ लिंक: https://www.youtube.com/watch?v=ZKnKgc_gVS8

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.