रेनो काइगरची विक्रीच्या पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी, भारतभर 1100 हून अधिक वाहनांची डिलिव्हरी

 

रेनो काइगरची विक्रीच्या पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी,

भारतभर 1100 हून अधिक वाहनांची डिलिव्हरी  

 


मुंबई, 3 मार्च, 2021: रेनो इंडियाच्या वतीने देशातील विक्रेत्यांकडे नवीन गेमचेंजर रेनो काइगरची विक्री आणि डिलिव्हरी सुरू करण्यात आली. स्मार्ट, स्पोर्टी आणि लक्षवेधी कार रेनोची सब-फोर मीटर एसयुव्ही सेगमेंटमधील दमदार अस्तित्व दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. यानिमित्ताने भारतीय वाहन उद्योगात आपला नवाकोरा ठसा उमटविण्याची तयारी सुरू झाली. आज विक्रीच्या पहिल्या दिवशी भारतातील ग्राहकांकरिता 1100 हून अधिक रेनो काइगर वाहनांची डिलिव्हरी करण्यात आली.

 

वाहनांच्या डिलिव्हरीला झालेल्या शुभारंभाविषयी बोलताना रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम मामिल्लापल्ले म्हणाले की, “काइगर समवेत रेनोचे आणखी एक अद्वितीय उत्पादन बाजारात यशस्वीपणे लॉन्च झाले आहे. हे भारतीय वाहन बाजाराचे महत्त्व लक्षात घेऊन दाखल करण्यात आले. आम्ही काइगर तसेच आमच्या विक्रेत्या भागीदाराला ग्राहकांकडून मिळालेल्या भरभरून प्रोत्साहक प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानतो. डस्टरच्या आगमनामुळे अनेकांना एसयुव्ही उपलब्ध झाली, आता डस्टरनंतर रेनो काइगर ग्राहकांच्या नवीन पिढीसाठी, एसयुव्ही आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. या नवीन गेम-चेंजर उत्पादनासोबत रेनो कुटुंबात आणखी नवीन सदस्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत”, असेही ते पुढे म्हणाले.

 

रेनो काइगर हे भारतात रेनोने लॉन्च केलेले नव्या दमाचे क्रांतिकारक उत्पादन आहे. आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यापूर्वी ही नवीन-कोरी आटोपशीर एसयुव्ही भारताच्या दृष्टीने डिझाईन आणि विकसीत केली आहे. रेनो काइगरच्या रुपात रुबाबदार, स्मार्ट आणि स्पोर्टी बी-एसयुव्ही उपलब्ध झाली. हिचे डिझाईन लक्षवेधी असून तिचा स्पोर्टी आणि पिळदार रुबाब रेनो काइगरला एसयुव्ही’मध्ये वेगळे ठरवते. रेनो काइगरच्या अंतर्गत भागात रेनो काइगरच्या स्मार्ट केबिनमध्ये तंत्रज्ञान, कार्यशीलता आणि प्रशस्त जागेचा संगम अनुभवता येतो. रेनो काइगर नवीन टर्बोचार्ज 1.0 लिटर पेट्रोल इंजिनने युक्त असून उत्तम कामगिरी सोबत ड्रायव्हिंगचा आनंद देते. या वाहनाची सर्वोत्तम कामगिरी, आधुनिकता आणि कार्यक्षम इंजिन स्पोर्टी ड्राईव्हची खातरजमा करते. यामध्ये अनोखे मल्टी सेन्स ड्राईव्ह मोड देण्यात आले आहेत, जे ग्राहकांच्या ड्रायव्हिंग प्राधान्यांना साजेशी लवचिकता प्रदान करतात.

 

सर्वार्थाने नवीन रेनो काइगर ही नोंदणीकरिता सध्या रेनोच्या विस्तृत विक्रेता नेटवर्कसह देशातील 500 हून अधिक दालने त्याचप्रमाणे त्यांची वेबसाईट - https://www.renault.co.in/  वर उपलब्ध आहे. रेनो काइगरमध्ये 1.0L एनर्जी आणि 1.0L टर्बो अशा दोन प्रकारच्या इंजिनांचा पर्याय असून प्रत्येक इंजिनवर 2 पेडल देण्यात येतात. ग्राहकांना चार ट्रीम्स – आरएक्सई, आरएक्सएल, आरएक्सटी तसेच आरएक्सझेड उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे हा वाहन पर्याय – कॅस्पीयन ब्ल्यू, रेडीयंट रेड, मूनलाईट सिल्व्हर, प्लॅनेट ग्रे, आईस कूल व्हाईट, महोगनी ब्राऊन अशा सहा आकर्षक रंगांसोबत ड्यूएल टोनमध्ये उपलब्ध आहे.

 

एक्सेसरीविषयी सांगायचे झाल्यास ग्राहक वैयक्तिक आवडीनुसार 47 निरनिराळ्या, मोठ्या प्रमाणावरील एक्सेसरीज श्रेणींमधून निवड करू शकतात. या विस्तृत एक्सेसरीज श्रेणींची पाच खास तयार करण्यात आलेली एक्सेसरीज पॅक आहेत – एसयुव्ही, अॅट्रक्टीव्ह,सेन्शियल, स्मार्ट, स्मार्ट प्लस सोबतच त्यात वायरलेस चार्जर आणि एअर प्युरीफायरसारख्या टेक एक्सेसरी दिलेल्या आहेत.

 

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.