भारतातील वेगाने वाढत असलेल्या एमएसबी डिजिटलीकरण स्टार्टअप फ्लोबिझने एलिव्हेशन कॅपिटल आणि विद्यमान गुंतवणूकदारांकडून १० दशलक्ष डॉलर्स उभारले
भारतातील वेगाने वाढत असलेल्या एमएसबी डिजिटलीकरण स्टार्टअप फ्लोबिझने
एलिव्हेशन कॅपिटल आणि विद्यमान गुंतवणूकदारांकडून १० दशलक्ष डॉलर्स उभारले
मुंबई, २४ मार्च २०२१: एलिव्हेशन कॅपिटलच्या नेतृत्वात सीरिज ए फेरीत
भारतातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या एसएमबी डिजिटलीकरण स्टार्टअप कंपनी
फ्लोबिजने १० दशलक्ष डॉलर्स उभारले. नवीन फेरीमध्ये विद्यमान गुंतवणूकदार
ग्रीनऑक्स कॅपिटल आणि बेनेक्स्ट देखील हजर होते.
कंपनी आपले फ्लॅगशिप उत्पादन, बिलिंग आणि अकाउंटिंग अॅप मायबिलबुक
(myBillBook) सादर केले आहेत. या भांडवलाचा संघाचा विस्तार करण्यासाठी,
उत्पादनांचा विकास करण्यासाठी आणि विक्री तसेच विपणन प्रयत्नांना गती
देण्यासाठी करण्याचा कंपनीचा हेतू आहे.
मोबाईल आणि डेटा एक्सेस, जीएसटीचे अनुपालन, तंत्रज्ञानाचा वापर आणि
शेवटी कोविड -१९, यामुळे दीर्घकाळ मंदीचा अनुभव घेत असलेले एसएमबी (लघु व
मध्यम व्यवसाय) अधिक व्यवस्थित व संघटित झाले आहेत. तांत्रिक प्रगती आणि
डिजिटलायझेशनमुळे या क्षेत्रात बरेच बदल झाले आहेत,
परंतु कस्टम ईआरपी आणि लेगसी अकाउंटिंग सिस्टमसारखे आवश्यक सॉफ्टवेअर
अद्याप बरेच महाग आहे आणि ते चालविण्यासाठी पर्याप्त तांत्रिक ज्ञान आणि
अकाउंटिंग विषयक ज्ञान असणे आवश्यक आहे. परवडेल अशा किमतीमध्ये उपलब्ध
नसल्यामुळे आणि वापरण्यास सुलभ असे तंत्रज्ञान नसल्यामुळे
एसएमबीच्या वाढीवर व्यापक परिणाम झाला आहे. डिजिटलायझेशनद्वारे
तंत्रज्ञानात प्रवेश करणे आणि भारताच्या लघु आणि मध्यम उद्योगांच्या आर्थिक
विकासाला गती देणे हे फ्लोबीजचे ध्येय आहे. या प्रयत्नात, कंपनीने जटिल
युजर एक्सपीरियन्सची पुन्हा रचना केली आणि आता अधिक उत्कृष्ट
सॉफ्टवेअर उत्पादन तयार केले आहे.
Comments
Post a Comment