एंजल ब्रोकिंगची फेब्रुवारी २०२१ मध्ये विक्रमी वृद्धी

 एंजल ब्रोकिंगची फेब्रुवारी २०२१ मध्ये विक्रमी वृद्धी

~ ~११ महिन्यांत दुप्पट वाढीसह ग्राहकसंख्या ३.७५ दशलक्षांवर पोहोचली


मुंबई, ११ मार्च २०२१: देशातील सर्वात मोठ्या ब्रोकरेज हाऊसपैकी एक असलेल्या एंजल ब्रोकिंगने फेब्रुवारी २०२१ मध्ये विक्रमी ऑपरेटिंग पॅरामीटर्स दर्शवले आहे. कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२० मधील ग्राहकांची संख्या १.८२ दशलक्षांहून दुपटीने वाढून फेब्रुवारी २०२१ मध्ये ३.७५ दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे. डिजिटल फर्स्ट असा दृष्टीकोन असल्यामुळे एंजल ब्रोकिंगला टीअर २,३ आणि त्यापुढेही इतर शहरांमध्ये एकूण ग्राहकांचा वर्ग वाढवण्यासाठी मदत झाली. फेब्रुवारी २०२१ मध्ये कंपनीने ०.२९ दशलक्षांहून अधिक ग्राहक वर्ग जोडला आहे आणि ही वृद्धी गेल्यावर्षीच्या तुलनेत ३५०.१% आहे.

महिनाभरात ०.२० दशलक्षांपेक्षा ग्राहक जोडणारा हा सलग तिसरा महिना असून, तिमाहीत ०.५० दशलक्षांपेक्षा जास्त ग्राहक जोडणारी सलग तिसरी तिमाही ठरली. एंजल ब्रोकिंगच्या दमदार ग्राहक वृद्धीमुळे, ग्राहकांच्या क्रियाही वाढल्या आणि यातून रेकॉर्ड हाय अॅव्हरेज डेली टर्नओव्हर वाढून फेब्रुवारी २०२१ मध्ये तो ४ लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचला. जानेवारी २०२१ पेक्षा तो २४% जास्त तर फेब्रुवारी २०२० पेक्षा ४९८% जास्त ठरला.

एंजल ब्रोकिंगने तंत्रज्ञान वापरावर भर देत ग्राहक वृद्धी वाढवण्याचे प्रयत्न केले व या प्रयत्नांना सकारात्मक यश मिळाले. टीअर २, ३ आणि त्यापुढील बाजारपेठा, मिलेनिअल्समध्ये कंपनीची मोठी भरभराट झाली. यातून भारतातील शेअर बाजारातील रिटेल सहभागाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर विस्तारले.

एंजल ब्रोकिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय अग्रवाल म्हणाले, “ मागील एक वर्ष हे एंजल ब्रोकिंगसाठी विक्रमी ठरले. आमच्या ग्राहकांसाठी आम्ही अत्यंत मौल्यवान सेवा निर्माण करू शकलो. आम्ही योग्य मार्गावर आहोत, हेच या आकडेवारीतून दिसते. भविष्यात उत्कृष्ट मानवी भांडवल आणि तंत्रज्ञान आधारीत सोल्युशन्स आणण्याचा प्रयत्न कंपनीकडून सतत होत राहील. आता भौगोलिक सीमांपलिकडे आम्ही ग्राहक वर्ग वाढवणार असून ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव प्रदान करण्याकरिता उत्पादनांची संख्याही वाढवणार आहोत.”

मागील काही वर्षांमध्ये एंजल ब्रोकिंग एक उत्कृष्ट डिजिटल कंपनीत परिवर्तन घडवण्याकरिता गुंतवणूक केली. यात ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, ट्रेडिंग अॅप्स, डिजिटल गुंतवणूक सल्ला सेवा इत्यादींचा समावेश होता. परिणामी, कंपनीच्या मोबाइल अॅप डाऊनलोड्स, विविध टिअर्समधील ग्राहकवर्गात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामुळे मार्केट शेअर वाढला व नफाही वृद्धींगत झाला. कंपनीने अनेक वेगळ्या सेवा दिल्या. यात स्मार्ट मनी (एज्युकेशन), स्मार्टएपीआय (ऑटोमेटेड ट्रेडिंग), व्हेस्टेड आणि एआरक्यू प्राइम (इन्व्हेस्टमेंट इंजिन) सोबत भागीदारी करत आंतरराष्ट्रीय गुंतवणूक केली.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy