इन्फ्लुएन्झर गाइडलाइन्स: एएससीआयकडून फीडबॅक तारखेमध्‍ये २१ मार्चपर्यंत वाढ; अंतिम गाइडलाइन्स १५ एप्रिलला जारी करण्‍यात येतील

 

इन्फ्लुएन्झर गाइडलाइन्स: एएससीआयकडून फीडबॅक तारखेमध्‍ये २१ मार्चपर्यंत वाढ; 

अंतिम गाइडलाइन्स १५ एप्रिलला जारी करण्‍यात येतील

मुंबई, मार्च २०२१: अ‍ॅडव्‍हर्टायझिंग स्‍टॅण्‍डर्डस कौन्सिल ऑफ इंडियाने (एएससीआय) शुक्रवारी डिजिटल मीडियावर इन्फ्लुएन्झर अ‍ॅडव्‍हर्टायझिंगसाठी ड्राफ्ट गाइडलाइन्सवरील फीडबॅककरिता अंतिम मुदत २१ मार्च २०२१ पर्यंत वाढवली. पूर्वी ग्राहक, विविध भागधारक व प्रभावकांसाठी अंतिम मुदत ८ मार्च होती. विविध भागधारकांनी केलेल्‍या विनंतीमुळे ही वाढ करण्‍यात आली.

मसुदा मार्गदर्शकतत्त्‍वांच्‍या घोषणेपासून एएससीआयला उपयुक्‍त अभिप्राय मिळाले आहेत. मार्गदर्शकतत्त्वांना अंतिम रूप देण्‍यामध्‍ये या अभिप्रायांना महत्त्व दिले जाईल. एएससीआयला मार्गदर्शकतत्त्वांसाठी मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त पाठिंब्‍याचा आनंद झाला आहे. वाढवलेल्‍या अंतिम मुदतीसह एएससीआय यामध्‍ये अधिक सुधारणा करण्‍यासाठी अधिक अभिप्राय मिळण्‍याची अपेक्षा करत आहे.

अभिप्रायांचा विचार केल्‍यानंतर अंतिम मार्गदर्शकतत्त्वे १५ एप्रिल रोजी जारी करण्‍यात येतील आणि १ मेपासून लागू होतील.   

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24