भारतीय निर्देशांक काही टक्क्यांनी वधारला

 


भारतीय निर्देशांक काही टक्क्यांनी वधारला

मुंबई, ३ मार्च २०२१: सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी भारतीय निर्देशांकांनी काही टक्क्यांनी वृद्धी दर्शवली. या नफ्याचे नेतृत्व ऑटो आणि आयटी क्षेत्राने केले. निफ्टी १.०७% किंवा १५७.५५ अंकांनी वधारला आणि १४,९०० अंकांपुढे म्हणजेच १४,९१९.१० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.९०% किंवा ४४७.०५ अंकांनी वाढला व ५०,२९६.८९ अंकांवर स्थिरावला. जवळपास १८१३ शेअर्सनी नफा कमावला, १६६ शेअर्स स्थिर राहिले तर ११३८ शेअर्स घसरले.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की टाटा मोटर्स (५.१६%), एम अँड एम (४.५८%), विप्रो (४.४९%), अदानी पोर्ट्स (४.०९%), आणि हिरो मोटो (४.०२%) हे निफ्टीतील टॉप लाभार्थी ठरले. तर याउलट ओएनजीसी (२.५६%), एचडीएफसी (१.१९%), डॉ. रेड्‌डीज (१.०१%), पॉवरग्रिड (०.६४%), आणि कोल इंडिया (०.४५%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.

क्षेत्रीयदृष्ट्या विचार करता, निफ्टी ऑटो आणि निफ्टी आयटी निर्देशांक ३% पेक्षा जास्त वधारला तर निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फार्माने जवळपास 1 टक्क्यांचा नफा कमावला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप अनुक्रमे १.५५% आणि १.६०% नी वधारले.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. चे स्टॉक्स २०% नी वाढले व त्यांनी १२४.५० रुपयांवर व्यापार केला. सरकारने या कंपनीच्या खासगीकरणाच्या अनेक बिड्स स्वीकारल्यानंतर हे परिणाम दिसले. हे व्यवहार आता दुसऱ्या टप्प्यात दिसून येतील.

सिप्ला लि.: फर्मच्या सुमाट्रिप्टॅन नसल स्प्रेला संयुक्त राष्ट्र अन्न व औषध प्रशासनची मंजूरी मिळाल्यानंतर सिप्ला लि. चे स्टॉक्स २.६८% नी वाढले व त्यांनी ८११.०० रुपयांवर व्यापार केला. मायग्रेन अटॅकच्या उपचारांकरिता हा स्प्रे वापरला जाऊ शकतो.

भारत पेट्रोलियम कॉर्प लि.: बीपीसीएलच्या बोर्डाने नुमालिंगर्थ रिफायनरीतील स्टेक विक्रीस मंजूरी दिल्यानंतर कंपनीचे शेअर्स ३.२४% नी वाढले व त्यांनी ४७०.०० रुपयांवर व्यापार केला. कंपनी ६१.६५% स्टेक मोकळे करेल तर १३.६५% स्टेक आसाम सरकारला विकले जातील.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड: फेब्रुवारी २०२१ मध्ये एमअँडएम कंपनीने ट्रॅक्टर विक्रीत २५% वाढ दर्शवली. कंपनीच्या एकूण ट्रॅक्टर विक्रीत या महिन्यात २५% ची म्हणजे २८,१४६ युनिट्सची वाढ झाली. तर देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीत २४% म्हणजेच २७,१७० युनिटची वाढ झाली. फर्मचे स्टॉक्स ४.५८% नी वाढून त्यांनी ८५७.०० रुपयांवर व्यापार केला. 

भारतीय रुपया: सलग दुसऱ्या दिवशी देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये खरेदी दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया १९ पैशांनी वधारला व त्याने ७३.३६ रुपयांचे मूल्य कमावले.

जागतिक बाजारात संमिश्र संकेत: चिनी अधिकाऱ्यांनी अॅसेट बबलच्या जोखिमीविषयी चिंता व्यक्त केल्याने आशियाई स्टॉक्स पडले तर युरोपियन इक्विटी फ्युचर्सदेखील घसरले. जागतिक बाजाराने संमिश्र संकेत दिले. नॅसडॅक, एफटीएसई एमआयबी आणि एफटीएसई १०० ने अनुक्रमे ३.०१%, ०.११% आणि ०.६०% ची वृद्धी घेतली. याउलट निक्केई २२५ आणि हँगसेंगचे शेअर्स अनुक्रमे ०.८६% आणि १.२१% नी घसरले.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.