'वी'ची आदित्य बिर्ला हेल्थ इन्श्युरन्ससोबत भागीदारी

'वी'ची आदित्य बिर्ला हेल्थ इन्श्युरन्ससोबत भागीदारी

मोबाईल रिचार्जेसवर आरोग्य विमा लाभ मिळवून देण्यासाठी 'वी'चा उपक्रम

 

-        मोबाईल उद्योगक्षेत्रात प्रथमच प्रस्तुत आहे वी हॉस्पिकेयर ५१ आणि ३०१ रुपयांच्या रिचार्जवर; आरोग्य विमा संरक्षण ज्यांच्याकडे नाही अशा बहुसंख्य भारतीय युजर्सना मिळणार रिचार्जमध्ये समाविष्ट असलेले आरोग्य विमा लाभ

-        या प्लॅन्सचे सब्स्क्रिप्शन ज्या वी युजर्सनी घेतले असेल त्यांना आदित्य बिर्ला हेल्थ इन्श्युरन्सकडून वैद्यकीय अडीअडचणीच्या (यामध्ये कोविडचा देखील समावेश आहे) काळात हॉस्पिटलायझेशनसाठी दर दिवशी १००० रुपयांचे आणि आयसीयु खर्चांवर दर दिवशी २००० रुपयांचे विमा संरक्षण मिळणार

 

देशाची सामाजिक आर्थिक घडी विस्कटून टाकण्यात असंभावित आजारांच्या प्रभावांचा किती मोठा हात असू शकतो हे सध्याच्या महामारीने आपल्याला चांगलेच दाखवून दिले आहे.  नॅशनल सर्व्हे रिपोर्टनुसार (जुलै २०२० मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या), भारतात गावांमध्ये फक्त १४% तर शहरांमध्ये फक्त १९% लोकांकडे आरोग्य विमा संरक्षण होते. भारतातील बहुसंख्य जनतेसाठी आरोग्य विम्याबाबत जागरूकतेचा अभाव आणि महागडे वैद्यकीय खर्च यामुळे खूप मोठे आर्थिक संकट ओढवणे साहजिकच आहे.

 

भारतातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी वी ने आदित्य बिर्ला हेल्थ इन्श्युरन्ससोबत वी हॉस्पिकेयर ही अशाप्रकारची पहिलीच अनोखी सेवा सुरु केली आहे.  वी प्रीपेड ग्राहकांना यामधून हॉस्पिटलायझेशन कव्हर पुरवले जाईल. वी हॉस्पिकेयरमध्ये वी ग्राहकांना २४ तासांच्या हॉस्पिटलायझेशनसाठी १००० रुपयांपर्यंतची आणि आयसीयु खर्चांसाठी २००० रुपये निश्चित रक्कम एबीएचआयकडून मिळेल.  या योजनेमध्ये कोविड-१९ किंवा आधीपासून काही आजार असल्यास त्यांच्याही हॉस्पिटलायझेशनचा समावेश करण्यात येतो.  ५१ आणि ३०१ रुपयांच्या दोन वेगवेगळ्या, किफायतशीर रिचार्जेससोबत वी प्रीपेड ग्राहकांच्या मोठ्या संख्येला वी हॉस्पिकेयरमध्ये एकत्रित करण्यात आलेल्या आरोग्य विमा सुविधांचे लाभ मिळू शकतील.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.