कतरिना कैफ नवीन उत्पादन शुभारंभाच्या माध्यमातून साजरे करत आहे #शेडऑफब्युटीफुल

 कतरिना कैफ नवीन उत्पादन शुभारंभाच्या माध्यमातून साजरे करत आहे #शेडऑफब्युटीफुल 

~ ‘के ब्युटी’ने २० शेड्समध्ये दाखल केले हायड्रेटिंग फाउन्डेशन  ~



मुंबई, १० मार्च २०२१ उच्च पारिभाषा, उच्च आर्द्रता आणि उच्च मोहकता... तुम्हाला आणखी काय अपेक्षा असणार? तुमच्या त्वचेच्या गुणधर्माशी सुसंगत फाउन्डेशन मिळविण्यासाठी ‘के ब्युटी’ने नवीन उत्पादन के ब्युटी हायड्रेटिंग फाउन्डेशन दाखल केले आहे. हे मोठ्या प्रमाणावर आर्द्रतापूर्ण संयुग असून हे उत्पादन तुम्हाला संपूर्ण दिवस पुरते. हे फाऊन्डेशन २० शेड्समध्ये उपलब्ध असून त्या डीप, टॅन, मेडीयम आणि लाईट अशा सर्व प्रकारच्या भारतीय त्वचा टोन आणि अंडरटोनसाठी  उपलब्ध आहेत. #मेकअपदॅटकेअर्स बांधिलकीतून अगदी मऊ, ऐषारामी टेक्स्चर आणि सहज असा फिनिश यातून मिळतो. या उत्पादनामध्ये मँगो बटर, अॅवोकॅडो तेल आणि हायल्युरॉनिक अॅसिड असल्याने हे साध्य होते. 


के ब्युटी हायड्रेटिंग फाउंडेशन हे आपल्या नैसर्गिक, दवपूर्ण फिनिश आणि अत्यंत क्रिमी अशा आरामदायी लोणीयुक्त टेक्सरचे आपले आश्वासन पूर्ण करते. या उत्पादनामध्ये मोईस्चरयुक्त घटक असून त्यातून हे फाउंडेशन अधिक कालमर्यादेपर्यंत काम करते आणि त्याद्वारे अधिक हायड्रेशन साध्य करत त्वचेचे कॉम्प्लेक्शन अधिक आरोग्यपूर्ण करते. 


या फॉर्म्युल्यामुळे नैसर्गिक ते उच्च प्रमाणातील त्वचेचा आवाका साधला जातो. ‘नायका’च्या वेबसाईटवर आणि अॅपवर विशेष मार्गदर्शक सूचना असून त्याद्वारे तुम्हाला तुमची योग्य ती शेड, ही तुमच्या त्वचेच्या टोन आणि अंडरटोननुसार निवडता येते. 


कतरिना कैफ म्हणते, “तुम्ही हळुवार अशा ग्लॅमरची अपेक्षा करत असाल किंवा उच्च प्रभावाचे नाट्य अपेक्षित असाल तर हे फाउन्डेशन तुम्हाला कोणत्याही लूकसाठी योग्य असा पाया निर्माण करून देदेते. फाउन्डेशनकडून मला त्वचा नैसर्गिक दिसावी किंवा अधिक चांगली दिसावी अशी अपेक्षा असते. नेमका तोच प्रभाव मिळावा यासाठी या उत्पादनामध्ये प्रयत्न केले गेले आहेत. त्यातून ‘के ब्युटी हायड्रेटिंग फाऊन्डेशन’ निर्माण झाले आहे. याचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हे उत्पादनामुळे सुरकुत्या पडत नाहीत, रेषा उमटत नाहीत किंवा कसलाही परिणाम मागे सोडला जात नाही. त्यातून हा वजनाने हलका असा फॉर्म्युला परिपूर्ण बनतो आणि पूर्ण दिवस टिकतो. त्यातून नैसर्गिक ते उच्च दर्जाचा पायाभूत परिणाम साध्य होतो. “ 


नायका ब्रँडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रीना छाब्रा म्हणतात, “आमचा सर्व भर हा ‘के ब्युटी’वर आहे आणि त्याद्वारे आम्ही आरामदायी टेक्स्चर, सर्वसमावेशकता देण्याचा प्रयत्न केला असून त्याच्या शेड्स सर्वच उत्पादनांमध्ये उपलब्ध आहेत. त्यातून उच्च परिणाम साधणारे फॉर्म्युलेशन मिळविले जाते. ‘के ब्युटी’ आता सर्व मेकअप ब्रँडसमध्ये आघाडीचे उत्पादन ठरले असून त्याला ग्राहकांचा व मेकअप व्यावसायिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. सर्वोत्तम परिणाम आणि त्याला उच्च दर्जाच्या फॉर्म्युल्याची जोड यांमुळे हे साध्य झाले आहे. ‘के ब्युटी’कडून चेहरा विभागामध्ये दाखल झालेले एक सर्वोत्तम असे हे उत्पादन आहे. यंदाच्या आणि पुढील वर्षी आम्ही अत्यंत आकर्षक अशी उत्पादने दाखल करत असून त्या माध्यमातून आम्हाला पोर्टफ़ोलिओचा विस्तार करायचा आहे.”

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24