M1xchange ने अॅमेझॉनच्या नेतृत्वाखाली उभारला १ कोटी डॉलरचा निधी

 

M1xchange ने अॅमेझॉनच्या नेतृत्वाखाली उभारला १ कोटी डॉलरचा निधी 

 

  • ३५२ शहरांमधील सूक्ष्म, लघु मध्यम उद्योग (एमएसएमई) M1xchangeचा वापर करतात
  • M1xchange भारतभरात आपले नेटवर्क विस्तारेल आणि सर्व आकाराच्या एमएसएमईंससाठी सर्वसमावेशक पुरवठा साखळी वित्तपुरवठा लीडर होईल
  • M1xchange TreDS एक्स्चेंजच्या माध्यमातून एमएसएमई कमी दराने निधी अॅक्सेस करू शकतात
  • दोन दिवसांच्या कालावधीत आणि द्विपक्षीय निधी दराच्या तुलनेने कमी दरात एमएसएमईंना निधी उपलब्ध होऊ शकतो. हा एक्स्चेंज कोणत्याही बँकेसोबत होऊ शकतो आणि ३६ बँकाचा सहयोग प्राप्त झालेला आहे
  • M1xchangeचे उत्पादन आणि तंत्रज्ञान यामुळे बनावट बिलांची जोखीम कमी झाली आहे आणि यात शून्य अपवाद आहेत.

M1xchange ने सध्याच्या फंडिंग राउंडमध्ये एक कोटी डॉलरचा निधी उभा केला आहे, ज्या राउंडचे नेतृत्व अॅमेझॉनने केले होते आणि या राउंडमध्ये BEENEXT आणि सध्याचे गुंतवणूकदार मेफील्ड हे सहभागी झाले होते.

M1xchange हे आरबीआयने जारी केलेल्या तीन ट्रेड रिसीव्हेबल डिस्काउंटिंग सिस्टिम (TReDS) परवानाधराकांपैकी एकूण डिस्काउंट केलेल्या इन्वहॉइसेच्या एकत्रित मूल्याचा विचार करता आघाडीवर आहेत. साधारण + वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या M1xchange च्या स्थापनेनंतर M1xchangeने १०,००० एमएसएमई पुरवठादारांचे . अब्ज अमेरिकन डॉलरचे इन्व्हॉइसेस डिस्काउंटिंग केले आहेत. हे पुरवठादार ३५२ शहरांमधून डिजिटल माध्यमातून वेबसाइट अॅक्सेस करतात आणि त्यांच्या प्राप्य (रिसीव्हेबल) रकमेच्या बदल्यात आर्थिक मोबदला मिळवतात आणि % ते १०% वार्षिक व्याजदराचा लाभ ते घेतात, जो दर M1xchangeच्या बाहेर उपलब्ध असलेल्या द्विपक्षीय फंडिंग दरापेक्षा कमी आहे.

 

M1xchange कर्जाचा खर्च सर्व सहभागींसाठी कमी करते, परिणामी एमएसएमई अधिक स्पर्धात्मक होतात. डिजिटल प्रक्रियेमुळे बिलांचे सादरीकरण, त्यांची वैधता, डिस्काउंटिंग आणि निधीचे वितरण सुरळीत होते आणि ही सर्व प्रक्रिया दोन दिवसांमध्ये पार पडते. उपलब्ध पर्यायांपैकी M1xchange एमएसएमईंना किमान वेळात निधी उपलब्ध करून देते.

 

M1xchange ही अशी एकमेव TReDS आहे जिथे संबंधित प्राप्यांची (रिसिव्हेबल्स) नियुक्ती प्रत्येक व्यवहारासाठी डिजिटली करण्यात येते आणि ही नियुक्ती आर्थिक पुरवठा करणाऱ्या बँकेच्या बाजूने केली जाते. M1xchangeच्या अंतर्गत जोखीम परतफेड स्कोअरिंग अल्गॉऱ्हिदमने बनावट बिलांची जोखीम कमी केली आहे, गेल्या वर्षात शून्य अपवाद झाले आहेत. M1xchangeचा अजून एक यूएसपी म्हणजे ही कंपनी कोणत्याही बँकेसोबत काम करते आणि सध्या त्यांच्यासोबत ३६ बँका आहेत.

 

M1xchange टीम सातत्याने युझर अनुभवामध्ये सुधारणा करत आहे आणि अलीकडेच त्यांनी मोबाइल अॅप लाँच करत असल्याची घोषणा केली. मोबाइल अॅपवर इनव्हॉइसेस आणि बिड्स अधिकृत करणे/स्वीकारणे या प्रक्रिया जलद करण्यासाठी आधार वर आधारीत -स्वाक्षरी सक्षम करणे हे त्यांच्यातर्फे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अनेक फीचर्सपैकी एक उपयुक्त फीचर आहे.

 

M1xchangeवर  मंजुर इनव्हॉइसेस मंजूर करणाऱ्या कॉर्पोरेट्सची संख्या सर्व एक्स्चेंजेसमध्ये सर्वाधिक आहे आणि त्यामुळे एमएसएमईंना अनेक खरेदीदारांचे इनव्हॉइस डिस्काउंट करण्याची संधी देतात. या महामारीदरम्यान, M1xchangeने सोशल डिस्टन्सिंग सक्षम करण्यासाठी अधिक पावले उचलली आणि वेबसाइटवर एमएसएमईंचे डिजिटल ऑनबोर्डिंग सुरू केले. या कागदरहीत आणि डिजिटल ऑनबोर्डिंगमुळे त्यांना १५ मिनिटांत त्यांचे डिजिटल ऑनबोर्डिंग पूर्ण करता आले, त्यासाठी त्यांना कागदपत्रे कुरिअर करण्याचीही आवश्यकता भासली नाही. दिल्ली येथील मेपल कॅपिटल अॅडव्हायजर्स यांनी या गुंतवणूक फेरीसाठी M1xchangeला मदत केली.

 

M1xchangeचे म्हणणे

पुरवठा साखळी वित्तपुरवठा क्षेत्रात आघाडीवर जाण्याच्या आमच्या ध्येयामध्ये अॅमेझॉनसारखी जागतिक पातळीवरील टेक्नोलॉजी कंपनी शेअरहोल्डर म्हणून सहभागी होत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. गेल्या दशकभरात भारतात प्रचंड बदल झाला आहे आणि एमएसएमई मोठ्या संख्येने त्यांचा माल ऑनलाइन विकत आहेत. भारतात अॅमेझॉनने उभारलेल्या व्हेंडर्सच्या मोठ्या परिसंस्थेलासुद्धा आमच्या पुरवठा साखळी वित्तपुरवठा करण्याच्या पद्धतीचा लाभ होणार आहे. इतर सरकारी डिजिटल पुढाकारांसह प्राप्य (रिसिव्हेबल्स) वित्तपुरवठ्यासाठी ही सुरक्षित बाजारपेठ एकात्मिक करण्यासाठी M1xchange काम करत असताना ही गुंतवणूक लाभली आहे. या नव्या निधी उपलब्धतेचा वापर करून आम्ही आमची व्याप्ती ३५२ शहरांहून अधिक विस्तारणार आहोत. सध्या ३५२ शहरांमधील एमएसएमई डिस्काउंट केलेल्या इन्व्हॉइसचा लाभ घेत आहेत., असे M1xchangeचे सीईओ संदीप मोहिंद्रू म्हणाले.

 

अॅमेझॉनचे म्हणणे

संदीप हे द्रष्टे असून त्यांनी M1xchange ही एक उत्तम दर्जाची सेवा उभारली आहे. या सेवेमध्ये भारतातील एमएसएमईंसाठी प्रचंड फायदा करवून देण्याची क्षमता आहे. एमएसएमई हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आजच्या घडील लाखांहून अधिक विक्रेते अॅमेझॉन इंडिया मार्केटप्लेसमध्ये वस्तूंची विक्री करतात. त्यापैकी मोठा वाटा एमएसएमईंचा आहे. एमएसएमईंना त्यांचा व्यवसाय वाढविता यावा आणि प्रगती करता यावी यासाठी आम्ही विविध मार्ग चाचपून पाहत असतो. २०२५ सालापर्यंत कोटी एमएसएमईंचे डिजिटायझेशन करण्याचा आमचा पण पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. M1xchangeसारख्या कार्यक्षम डिजिटल एक्स्चेंजमुळे देशभरातील ग्राहकांना अॅक्सेस करण्यासाठी अधिकाधिक एमएसएमईंना -कॉमर्स स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असा आमचा विश्वास आहे., असे अॅमेझॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कंट्री हेड अमित अगरवाल म्हणाले.

 

BEENEXTचे म्हणणे

TReDS यांच्याकडून नियंत्रित असेलेली M1xchange ही कपनी एमएसएमई डिजिटायझेशनचा वेग वाढवत आहे, बी२बी पेमेंट्स सुलभ करत आहे आणि भारतात व्यवसाय अधिकाधिक खोल रुजावेत यासाठी प्रयत्न करत आहे. ही अजूनही सुरुवात आहे आणि पुढील दशक हा भारत एमएसएमईंसाठी सुवर्णकाळ असणार आहे. टेक्नोलॉजिकल सोल्युशन्सच्या माध्यमातून M1xchange त्यांना साहाय्य करण्यास तयार आहे. अॅमेझॉनच्या गुंतवणुकीमुळे हा प्रवास वेगवान होण्यास मदत होणार आहे., असे BEENEXTचे भागीदार हिरो चौधरी म्हणाले

 

मेफिल्डचे म्हणणे

२०१९ साली M1xchangeमध्ये गुंतवणूक करताना आमची जी व्हिजन होती तिच अॅमेझॉनचीही व्हिजन आहे हे पाहून आम्हाला आनंद होत आहे आणि या अत्यंत मोठ्या आणि व्याप्ती फार वाढलेल्या बाजारपेठेत प्रगती करण्यासाठी संदीप आणि या कंपनीतील नवीन गुंतवणूकदारांसोबत काम करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत., असे मेफिल्ड इंडियाचे व्यवस्थापकीय भागीदार विक्रम गोडसे म्हणाले.

 

सिड्बी व्हेंचरचे म्हणणे

 

M1xchange मध्ये आम्ही विद्यमान गुंतवणूकदार आहोत आणि TReDSच्या माध्यमातून एमसएमईना विलंबाने होणाऱ्या पेमेंट्सची समस्या सोडविताना आम्ही पाहिले आहे. एमएसएमई पुरवठा साखळी वित्तपुरवठ्याच्या या प्रवासात आम्ही अॅमेझॉनचे स्वागत करतो., असे सिड्बी व्हेंचरचे उपाध्यक्ष सीएस आणि एमएसएमईवर भर देत व्हीसी फंड्स आणि एआयएफचे व्यवस्थपापन करणारे महेंद्र लोढा म्हणाले.

 

M1xchange बद्दल

M1xchange ही आरबीआय मान्यताप्राप्त TReDS (ट्रेड रिसीव्हेबल डिस्काउंटिंग सिस्टिम) आहे.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App