हायफनचा रिटेल विभागात प्रवेश; २०२२ पर्यंत बाजारात २० टक्के वाटा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट

 

हायफनचा रिटेल विभागात प्रवेश२०२२ पर्यंत बाजारात २० टक्के वाटा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट

ठळक वैशिष्ट्ये:

      कंपनीने मुंबईदिल्लीअहमदाबादपुणेबेंगळुरू आणि हैदराबाद येथील ६००० रिटेलर्ससोबत भागीदारी केली आणि लवकरच महत्त्वाच्या -कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरही उत्पादने उपलब्ध होणार

      विस्तारासाठी ३०० कोटी रुपयांची कॅपेक्स गुंतवणूक

      २०२२ पर्यंत उत्पादन क्षमता २०० हजार टनांपर्यंत वाढवण्याची योजना



मुंबई मे २०२१:  हायफन या भारतातील अव्वल दर्जाच्या फ्रोजन बटाटा उत्पादनांच्या सर्वांत मोठ्या उत्पादक  निर्यातदार कंपनीनेआपली व्याप्ती भारतभरातील ग्राहकांपर्यंत विस्तारण्याचे उद्दिष्ट ठेवूनरिटेल विभागात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले आहेसरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाशी सुसंगती राखत कंपनीने २०१५ मध्ये गुजरातमधील मेहसाना येथे अत्याधुनिक बटाटे प्रक्रिया कारखाना स्थापन केलाकेवळ  वर्षांच्या अल्प काळात हायफननेहोरेका आणि क्यूएसआर्समध्येदेशांतर्गत  निर्यात अशा दोन्ही बाजारपेठांत प्रचंड मोठे यश प्राप्त केले आहे.

कंपनीचे कार्यक्षेत्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्तारण्याचे तसेच भारतीय बाजारपेठेतील वाढती मागणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून हायफन आपली उत्पादनक्षता २०२२ पर्यंत ८० हजार टनांवरून २०० हजार टनांवर नेणार आहेआयएमएआरसीच्या संशोधनानुसारभारतातील फ्रोजन बटाटा उत्पादनांची बाजारपेठ पुढील पाच वर्षांत १७.३० टक्के सीएजीआरवर वाढण्याची शक्यता आहेफ्रोजन बटाटा उत्पादनांना देशात महत्त्व प्राप्त झाले आहेकारण ती शिजवण्यास सोपी असतात तसेच अनेक स्वादआकार  आकारमानात उपलब्ध असल्याने ग्राहकांच्या वेगवेगळ्या चवींचे समाधान करण्यात यशस्वी ठरतातअसे एका अभ्यासातून पुढे आले आहे.

हायफनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहरेश करमचंदानी या घोषणेबद्दल म्हणाले, “सध्याच्या साथीच्या काळात ग्राहक त्यांच्या वैविध्यपूर्ण चवींचे समाधान करतील अशा चांगल्या दर्जाच्या तसेच सोयीस्कर अन्नपदार्थ पर्यायांच्या शोधात आहेत, असे आम्हाला दिसत आहेव्यावसायिक तसेच गृहिणींची पसंती सध्या स्वच्छसुरक्षित  शिजवण्यास सोप्या अशा साध्या अन्नपदार्थांना आहेहायफन उत्पादने अगदीच सोयीस्कर आहेत आणि दररोजच्या जेवणासाठी सोपे पर्याय पुरवणारी आहेतआम्ही नजीकच्या भविष्यकाळात आणखी अनेक चाकोरीबाह्य उत्पादने बाजारात आणण्यास उत्सुक आहोतही उत्पादने भारतीय ग्राहकांच्या रसनेला रुचतील अशी आहेत आणि त्यांत निवडीसाठी विस्तृत वैविध्यही असेल."

ते पुढे म्हणाले"आम्ही आमच्या विस्तार योजनेमध्ये ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहोत आणि गुजरातमध्ये अधिकाधिक रोजगार संधी निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहेएफएसएसएआयने जारी केलेल्या फूड हायजिन अँड सेफ्टी गाइडलाइन्सनुसार आम्ही उत्पादनप्रक्रियेत जास्तीत-जास्त काळजी घेऊन अन्नपदार्थ सुरक्षित असतील, याची खातरजमा करणार आहोत.” 

हायफनचे मार्केटिंग प्रमुख श्रीवरुण मलिक मार्केटिंग योजनांबद्दल म्हणाले, "आम्ही डिजिटल फर्स्ट दृष्टिकोन ठेवून एकात्मिक मार्केटिंग धोरण आखत आहोतब्रॅण्ड उभा करण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म हे प्राथमिक माध्यम असेलतर आम्ही विविध टचपॉइंट्सवरील ग्राहकांना सक्रिय करण्यासाठी ट्रेड मार्केटिंग कार्यक्रम तसेच सॅम्पलिंग (नमुनेमोहिमांवरही भर देत आहोत."

हायफन फ्रेंच फ्राइजआलू टिक्कीबर्गर पॅटीजनगेट्स अशी २५ हून अधिक रेडी-टू-कूक फ्रोजन उत्पादने देऊ करतेही उत्पादने कंपनीच्या प्रतिष्ठित भारतीय  आंतरराष्ट्रीय चॅनल पार्टनर्सफूड सर्व्हिसमधील वितरकहोरेका (HoReCa) चॅनल्स आदींच्या माध्यमातून उपलब्ध होतातब्रॅण्डने आपली उत्पादने भारतीयांच्या चवीला अनुकूल अशी तयार केली आहेतत्यांच्या आलू टिकीमुंबई आलू वडासाबुदाणा पॅटी आदी लोकप्रिय भारतीय स्नॅक्सच्या स्वरूपातील उत्पादनांमधून हे दिसून येतेत्यांच्या पोर्टफोलिओतील आणखी एक आकर्षक  वेगळा स्नॅक म्हणजे “पोटॅटोबेट्स” होय. (यात कुस्करलेल्या बटाट्यांना अल्फाबेट्सचा आकार देण्यात आला आहे). हे उत्पादन खास लहान मुलांसाठी आहे.  

हायफनला आपल्या सर्वोत्तम संरचनेचा अभिमान आहेयामध्ये संपूर्ण स्वयंचलन असल्याने अंतिम उत्पादनाला कोणत्याही प्रकारे हाताचा स्पर्श होत नाहीकंपनीच्या उत्पादन पद्धती आणि स्वच्छतेतील उत्कृष्टता जागतिक मानकांची पूर्तता करणारे आहेतम्हणूनच हायफनला बीआरसीजीएसचे एए ग्रेड प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेव्यवस्थापनातर्फे सर्व कर्मचाऱ्यांची  अन्नपदार्थ हाताळणाऱ्यांची कठोर तपासणी केली जाते  देखरेख ठेवली जातेजेणेकरून सर्व काही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून केले जावे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24