१९५९ मध्ये एका छोट्या पुस्तकाच्या दुकानापासून सुरू झालेली आणि आज विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी प्रसिद्ध अग्रगण्य प्रकाशन संस्था अशी अविरत वाटचाल

 

१९५९ मध्ये एका छोट्या पुस्तकाच्या  दुकानापासून  सुरू झालेली  आणि आज विद्यार्थ्यांच्या  सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी प्रसिद्ध अग्रगण्य प्रकाशन संस्था अशी अविरत वाटचाल  

मुंबई,  सप्टेंबर २०२१ : भारतातील शैक्षणिक प्रकाशन संस्थांमधील अग्रगण्य विश्वासार्ह ब्रँड नवनीत एज्युकेशन लिमिटेडने आपल्या ६० वर्षांहून अधिक काळाच्या वाटचालीच्या निमित्ताने 'प्रोग्रेस लिमिटलेस ' या डिजिटल मोहिमेचा शुभारंभ केला आहे. नवनीतच्या सहा दशकांच्या यशस्वी व्यावसायिक प्रवासाचा रंजकपणे आढावा घेत गतस्मृतींना उजाळा देणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. जर आपण भारतात आपले बालपण घालवले असेल तर ही मोहीम आपल्याला बालपणाची सफर घडवणारी ठरेल

गाला परिवाराने सन १९५९ मध्ये मुंबईमध्ये छोट्याश्या पुस्तकाच्या दुकानापासून सुरू केलेली व्यावसायिक वाटचाल आज नामांकित प्रकाशन समूह अशी विस्तारली आहेनवनीतने शैक्षणिक साहित्यातील अग्रगण्य ब्रँड म्हणून ठसा उमटवला आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या क्लासरूम ते बोर्डरूम या वाटचालीचा साक्षीदार राहिला आहेविशिष्ट उद्दिष्टाने स्थापन झालेली ही संस्था ज्ञानप्रसाराचे कार्य अविरतपणे करीत आहे.     

अनेक दशकांपासून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये नवनीत शैक्षणिक साहित्यासाठी पसंतीचा ब्रँड ठरला आहे. नवनीत मार्गदर्शके, विकास व्यवसाय पुस्तिका, गाला सराव पुस्तके, युवा वह्या, -सेन्सचे TopScorer या नवनीतच्या उत्पादनांनी भारतीय तरुणांची मने जिंकली आहेत. ही उत्पादने त्यांच्या उत्तम दर्जामुळे लोकप्रिय आहेतच, शिवाय नव्वदच्या दशकातील मुलांच्या आठवणीही या सर्वांशी जोडलेल्या आहेत.    

गेल्या दशकागणिक नवनीतने प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आणि नवनीतच्या छायेत विविध उपशाखा जोमाने रुजू लागल्या. १९५९ मध्ये नवनीतने इयत्ता १० वी साठीचे पहिले मार्गदर्शक प्रकाशित केले. १९७० मध्ये व्यवसाय पुस्तिका ही संकल्पना रुजवली, तर १९७५ मध्ये '२१ अपेक्षित प्रश्नसंच' प्रकाशित झाले. १९९० पासून बालसाहित्य प्रकाशन सुरू केले, तसेच १९९३ मध्ये इतर शैक्षणिक साहित्याची उत्पादने बाजारात आणली. १९९४ मध्ये नवनीतला पहिली शैक्षणिक साहित्य प्रकाशन संस्था म्हणून बीएसइ आणि एनएस कडून अधिकृत मान्यता मिळाली. २००८ मध्ये '-सेन्स' या नावाने B2B डिजिटल शिक्षण क्षेत्रात, २०११ मध्ये शाळा व्यवस्थापन-K12, तर २०१४ मध्ये B2C डिजिटल क्षेत्रात नवनीतने प्रवेश केला२०१६ मध्ये 'युवा' हा स्टेशनरी ब्रँड सुरू झाला, तसेच एन्सायक्लोपीडिया कडून ब्रिटानिका इंडियाचे अधिकार घेऊन ते 'इंडियानिका' नावाने भारतात प्रसिद्ध करण्यात आले. २०१७ मध्ये ,००० कोटीची विक्रमी उलाढाल झाली आणि नवनीत (एचके) लि. ला कायदेशीर मान्यता मिळाली. २०१८ मध्ये 'HQ' हा नवा स्टेशनरी ब्रँड उदयाला आला. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकणे अधिक सोयीचे आणि सुलभ व्हावे यासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये नवनीतने प्रकाशित केलेल्या सर्व पुस्तकांची डिजिटल आवृत्ती उपलब्ध असलेले 'नवनीत डिजिबुक' हे ऍप तसेच वेब आधारित प्लॅटफॉर्म उपलब्ध केले आहे

या मोहिमेची संकल्पना दि मिनिमलिस्ट या जाहिरात एजन्सीची आहे. निर्मिती दिग्दर्शक मयुरेश बांगर आणि निर्माते प्रगौर फिल्म्स आहेत

नवनीतच्या या देदीप्यमान वाटचालीविषयी बोलताना नवनीतचे ब्रॅंडिंग प्रमुख श्री. देविश गाला म्हणाले, नवनीत हा भारतभर घराघरात विश्वासाचे स्थान मिळवलेला ब्रँड आहे. आजी-आजोबा, पालक, मुले अशी पिढ्यान पिढ्या नवनीतला पसंती मिळाली आहे. एका छोट्याशा दुकानापासून सुरुवात करून देशातील मान्यताप्राप्त ब्रँड ही नवनीतची वाटचाल आपणांस दाखविण्यास आम्ही अतिशय उत्सुक आहोत. गेल्या सहा दशकांपासून नवनीतचे व्यवस्थापन  करणाऱ्या तीनपेक्षा जास्त पिढ्यांचा वारसा घेऊन आम्ही उत्क्रांतीच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. गतस्मृतींचा हा ठेवा नवनीत परिवार पुढील कित्येक दशके जतन करू इच्छितो. आमच्या या प्रवासात आम्हाला खंबीर साथ देणाऱ्या प्रत्येक सदस्याविषयी नवनीत कृतज्ञ आहे.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy