इन्नोव्हिटी पेमेंट सोल्यूशन्स तर्फे भारतातील पहिले स्मार्ट मार्केटिंग अँप लाँच

 इन्नोव्हिटी पेमेंट सोल्यूशन्स तर्फे भारतातील पहिले स्मार्ट मार्केटिंग अँप लाँच


पुणे : ऑफलाइन उद्योग चालविणा-या व्यापा-यांना पेमेंट उपाययोजना पुरविणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी इन्नोव्हिटी पेमेंट सोल्यूशन्सने आज महाराष्ट्रातील मोबाइल डीलर्ससाठी जी.ई.एन.आय.ई हे भारताचे पहिले स्मार्ट मार्केटिंग अँप  लाँच केले आहे. ऑनलाइन पर्यायांच्या अतिक्रमणामुळे विशेषत: सध्या सुरू असलेल्या कोव्हिड-१९ पॅनडेमिकमध्ये पेमेंट्सचे ऑनलाइन पर्याय अधिक लोकप्रिय होऊ लागल्यामुळे   स्थानिक मोबाइल आणि कन्झ्युमर ड्युरेबल उत्पादनांच्या क्षेत्रातील व्यापा-यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे त्यामुळे संकटात सापडलेल्या मोबाइल डीलर समुदायाच्या हिताची जपणूक करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून तयार करण्यात आलेले जी.ई.एन.आय.ई ऑनलाइन ग्राहकांना पुन्हा एकदा रिटेल दुकानांकडे वळवणार आहे .

जी.ई.एन.आय.ई च्या साथीने प्रत्यक्ष दुकाने चालविणा-या व्यापा-यांकडे अधिकाधिक ग्राहकवर्ग आकर्षित व्हावा, अधिक कन्व्हर्जन्स व्हावीत व अधिक नफा मिळावा यासाठी अशा व्यापा-यांद्वारे होणा-या विक्रीला नवसंजीवनी देण्याचा व त्यांच्या वाढीला चालना देण्याचा इन्नोव्हिटीचा हेतू आहे. पुण्यामधील   ९टक्‍क्‍यांहून अधिक आघाडीच्या मेनलाइन मोबाइल डीलर्सनी  जीईएनआयई  टर्मिनल्ससाठी पूर्वनोंदणी केली आहे .

जी.ई.एन.आय.ई. द्वारे स्थानिक मोबाइल डीलर्सना अनेक  प्रकारचे  फायदे  पुरविण्यात येणार आहेत त्यात प्रामुख्याने  प्रत्येक ब्रँडेड मोबाइल फोनच्या विक्रीवर  ५ टक्‍के ते १ टक्‍के वरकड मार्जिन मिळणार आहे   व  व्यापा-यांना जी.ई.एन.आय.ई ईएमआय वॉलेट दिले जाणार, ज्याचा वापर करून ते ग्राहकांना कोणत्याही उत्पादनावर विनाशुल्क ईएमआय पुरवू शकतील. यामुळे त्यांना अधिक ग्राहकांना आपल्याकडे वळवत विक्रीमध्ये वाढ करता येईल आणि ११० हून अधिक बँकांच्या क्रेडिट/डेबिट कार्डांच्या वापरावर जी.ई.एन.आय.ई कडून झटपट रिवॉर्ड दिला जाणार, ज्यामुळे अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करता येईल व प्रत्यक्ष दुकानात येणा-या ग्राहकांची संख्या वाढू शकेल.

इन्नोव्हिटी पेमेंट सोल्युशन्सच्या न्यू बिझनेस इनिशिएटिव्जच्या को-फाउंडर आणि सीबीओ अमृता मलिक म्हणाल्या की   ग्राहक जेव्हा स्थानिक मोबाइल डीलर्सकडून इलेक्ट्रॉनिक उत्पादने विकत घेतात तेव्हा हे डीलर्स ग्राहकांना त्या उत्पादनांना स्पर्श करण्याची, त्यांना प्रत्यक्ष हाताळण्याची संधी देतात व विश्वासार्हता देऊ करतात. हे डीलर्स त्यांना माहिती देतात आणि मार्गदर्शनही करतात. पण केवळ ग्राहकांना अधिक चांगल्या ऑफर्स निर्माण करण्यासाठी व पुरविण्यासाठी आवश्यक ती डिजिटल संसाधने नसल्यामुळे शेवटी त्यांचे ग्राहक ऑनलाइन खरेदीकडे वळतात. महाराष्ट्रातील स्थानिक मोबाइल डीलर्सना इतरत्र कुठेही मिळणार नाही अशा उत्कृष्ट ऑफर्स देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही बँका आणि ब्रँड्सशी सहयोग साधला आहे.डिसेंबर २०२१ पर्यंत संपूर्ण भारतभरातील १००,००० स्थानिक मोबाइल डीलर्सपर्यंत पोहोचण्याचे आमचे लक्ष्य आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24