फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनीचा बँक ऑफ इंडियाशी बँकान्शुरन्स करार
फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनीचा बँक ऑफ इंडियाशी बँकान्शुरन्स करार
मुंबई, 26 ऑक्टोबर, 2021 – फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एफजीआयआय) या फ्युचर समूह आणि जागतिक विमा कंपनी जनराली यांची संयुक्त भागिदारी असलेल्या सर्वसाधारण विमा कंपनीने बँक ऑफ इंडियाशी (बीओआय) बँकान्शुरन्स करार केला असून त्याद्वारे सर्वसाधारण विमा उत्पादने दूरपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. या सहकार्याच्या माध्यमातून एफजीआयआय आपली सर्वोत्तम, नाविन्यपूर्ण आणि विस्तारित उत्पादन श्रेणी 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेशांतील 5084 बीओआय शाखांसाठी उपलब्ध करेल.
बँकान्शुरन्स करार एफजीआयआयच्या विकास धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे. कंपनीने आतापर्यंत 15 सार्वजनिक व खासगी बँकांशी यशस्वी करार केला असून त्याद्वारे आपल्या उत्पादनांचे वितरण उंचावले आहे.
फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप राऊ म्हणाले, ‘1906 पासून बीओआय राष्ट्र उभारणीसाठी सर्वतोपरी योगदान दिले आहे आणि ही संस्था व तिच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या करारामुळे देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील बीओआयच्या 5084 शाखांद्वारे त्यांच्या 70 दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला आनंद वाटतो. बँकेबरोबर दीर्घकालीन नाते प्रस्थापित करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
Comments
Post a Comment