सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेडची 900 कोटी रु.ची प्राथमिक समभाग विक्री 19 सप्टेंबर 2025 पासून होणार सुरू
सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेडची 900 कोटी रु.ची
प्राथमिक समभाग विक्री 19 सप्टेंबर 2025 पासून होणार सुरू
·
प्रत्येकी
2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी
शेअर”) 442 रुपये ते 465
रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
·
बोली/ऑफर
शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025 रोजी खुली होईल आणि मंगळवार, 23 सप्टेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक गुरुवार, 18 सप्टेंबर 2025 आहे.
·
बोली
किमान 32
इक्विटी शेअर्ससाठी आणि
त्यानंतर 32 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
·
कर्मचारी
राखीव भागांत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 44 रु. ची सवलत
सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेड (“कंपनी”) ची इक्विटी शेअरसाठी प्राथमिक समभाग
विक्री शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025 रोजी खुली करण्याचा प्रस्ताव आहे.
इक्विटी शेअर्सच्या 9000 दशलक्ष रु. पर्यंतच्या (900 कोटी रु.) एकूण ऑफर साईज मध्ये 7000 दशलक्ष रु. पर्यंतचे (700 कोटी रु.) फ्रेश इश्यू आणि विक्री समभागधारकांकडून 2,000 दशलक्ष रु. पर्यंतची (200 कोटी रु.) ऑफर फॉर सेल (“OFS” आणि फ्रेश इश्यू सोबत एकत्रितपणे “Offer Size”) समाविष्ट आहे.
प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक गुरुवार, 18 सप्टेंबर 2025 आहे. बोली/ऑफर शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025 रोजी खुली होईल आणि मंगळवार, 23 सप्टेंबर 2025 रोजी बंद होईल.
प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर”) 442 रुपये ते 465 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा (कर्मचारी राखीव भागांत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 44 रु. ची सवलत मिळणार आहे.) निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 32 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 32 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
कंपनी इक्विटी शेअरच्या फ्रेश इश्यू मधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग कंपनीने घेतलेल्या काही प्रलंबित कर्जाचे पूर्ण किंवा काही प्रमाणात आगाऊ परतफेड/नियोजित परतफेड करण्यासाठी, आमची पूर्णपणे मालकीची उपकंपनी सात्विक सोलर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कर्ज किंवा इक्विटीच्या स्वरूपात गुंतवणूक करून त्या उपकंपनीने घेतलेल्या काही प्रलंबित कर्जाची पूर्ण किंवा आंशिक परतफेड/आगाऊ परतफेड करण्यासाठी, आमची पूर्णपणे मालकीची उपकंपनी सात्विक सोलर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये नॅशनल हायवे – 16, चमकहंडी, गोपालपूर इंडस्ट्रियल पार्क, गोपालपूर, गंजम – 761 020, ओडिशा (“प्रोजेक्ट साइट”) येथे 4 GW सोलर PV मॉड्यूल उत्पादन सुविधा गुंतवणूकीसाठी आणि उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी (“Object of the Offer”) वापरणार आहे.
ऑफर फॉर सेल मध्ये परमोद कुमार यांच्याकडून एकूण 1,120 दशलक्ष रु. पर्यंत इक्विटी शेअर्स आणि सुनीला गर्ग यांच्याकडून (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) 880 दशलक्ष रु. पर्यंत इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत.
डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्स लिमिटेड, अॅम्बिट प्रायव्हेट लिमिटेड आणि मोटीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड हे या ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.
Comments
Post a Comment