कबुनीने उच्चस्तरीय क्रिकेट प्रशिक्षण सर्वांसाठी सुलभ करण्यासाठी जागतिक AI प्लॅटफॉर्म लॉन्च केला
कबुनीने उच्चस्तरीय क्रिकेट प्रशिक्षण सर्वांसाठी सुलभ करण्यासाठी जागतिक AI प्लॅटफॉर्म लॉन्च केला
AI-संचालित जागतिक क्रीडा प्लॅटफॉर्म कबुनीने मुंबई येथे आयोजित आपल्या पहिल्या Playtime 2026 कार्यक्रमात अधिकृतपणे पदार्पण केले असून, सर्व स्तरांवरील क्रिकेटप्रेमींसाठी सहज उपलब्ध आणि उच्चस्तरीय प्रशिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात केली आहे.
क्रीडा, तंत्रज्ञान आणि खेळ यांच्या संगमावर उभ्या असलेल्या कबुनीने प्रशिक्षणासाठी जगातील पहिल्यांदाच वापरल्या जाणाऱ्या अभिनव दृष्टिकोनाची ओळख करून दिली आहे. प्रगत AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हे प्लॅटफॉर्म रिअल-टाइम आणि वैयक्तिकृत प्रशिक्षण प्रदान करते, ज्यामुळे सर्व स्तरांवरील खेळाडूंना कधीही आणि कुठेही आपल्या कामगिरीत सुधारणा करता येते.
या जागतिक लॉन्चसोबतच कबुनीने आपल्या सुपर कोचेसची घोषणा केली आहे. यामध्ये दिग्गज क्रिकेटपटू सौरव गांगुली, शेन वॉटसन, एबी डिव्हिलियर्स आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. हे सर्व दिग्गज खेळाडू परस्परसंवादी आव्हाने आणि युवा स्पर्धांच्या माध्यमातून पुढील पिढीतील खेळाडूंना प्रेरणा देण्यात आणि त्यांचा विकास घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
या प्लॅटफॉर्मच्या केंद्रस्थानी एक साधे पण प्रभावी ध्येय आहे – प्रत्येक खेळाड्याच्या खिशात जागतिक दर्जाचा क्रिकेट प्रशिक्षक उपलब्ध करून देणे. उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाची उपलब्धता सर्वांसाठी खुली करून, जगभरातील खेळाडू शिकण्याची आणि प्रगती करण्याची पद्धत बदलण्याचा कबुनीचा प्रयत्न आहे. आधुनिक कुटुंबांसमोरील आव्हाने आणि वाढत्या स्क्रीन टाइमचा प्रभाव यांची सखोल जाण असलेल्या पालकांनी हे प्लॅटफॉर्म विकसित केले आहे. निष्क्रिय स्क्रीन टाइमऐवजी कौशल्यविकास आणि परस्परसंवाद वाढवणारे सक्रिय अनुभव उपलब्ध करून देत लोकांनी अधिक खेळावे आणि कमी स्क्रोल करावे, हे कबुनीचे ध्येय आहे.
कबुनीचे संस्थापक निमेष पटेल यांनी आपल्या बालपणातील अनुभव आणि त्यांच्या आयुष्यात खेळाने घडवून आणलेल्या सकारात्मक परिवर्तनातून प्रेरणा घेत तरुणांना पुन्हा क्रीडेशी जोडण्यासाठी आणि त्यांची क्षमता विकसित करण्यासाठी कबुनीची निर्मिती केली. हे प्लॅटफॉर्म पुढील पिढीला सक्षम बनवताना पालक, शिक्षक आणि प्रशिक्षकांना अधिक सक्रिय जीवनशैली घडवण्यासाठी मदत करते.
कबुनीचे मालकीचे तंत्रज्ञान असलेले Kabuni PlayOS प्रत्यक्ष खेळाचे रिअल-टाइम विश्लेषण करते आणि टायमिंग, संतुलन, शरीराची मांडणी, फुटवर्क आणि हालचालींचा क्रम यांसारख्या घटकांचे मूल्यमापन करून त्वरित आणि कृतीयोग्य अभिप्राय प्रदान करते. जगातील आघाडीच्या क्रिकेटपटूंच्या सखोल कामगिरी डेटावर आधारित हे तंत्रज्ञान खेळाडूंना अशा अंतर्दृष्टी उपलब्ध करून देते ज्या यापूर्वी केवळ उच्चस्तरीय अकादमींमध्येच उपलब्ध होत्या. त्यामुळे प्रत्येक सराव सत्र उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाच्या अनुभवात रूपांतरित होते.
जगातील सर्वात मोठ्या आणि उत्साही क्रिकेट समुदायांपैकी एक असलेल्या भारताची या प्लॅटफॉर्मच्या लॉन्च मार्केट म्हणून निवड करण्यात आली आहे. यामुळे या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय वाढीसाठी मजबूत पाया निर्माण करण्यास मदत होईल. भारतातील प्रारंभिक चाचणी टप्पा आणि प्रमुख नियामक संस्थांबरोबरच्या भागीदारीनंतर, हे प्लॅटफॉर्म यावर्षीच्या उत्तरार्धात जागतिक स्तरावर सादर करण्यात येणार आहे.
या घोषणेसोबतच “Do You Want to Play for a Legend?” या राष्ट्रीय मोहिमेचीही सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे भारततील १२ ते १६ वयोगटातील खेळाडूंना दिग्गज सुपर कोचेसच्या नेतृत्वाखालील संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा करण्याची संधी मिळणार आहे. सहभागी खेळाडू कबुनी प्लॅटफॉर्मचा वापर करून प्रशिक्षण घेतील, देशव्यापी निवड चाचण्यांमध्ये सहभागी होतील आणि अंतिम संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा करतील. निवड झालेले संघ पुढे एका प्रतिष्ठित क्रिकेट मैदानावर होणाऱ्या राष्ट्रीय युवा स्पर्धेत सहभागी होतील.
कबुनीचे संस्थापक निमेष पटेल म्हणाले, “भारतातील अनेक युवा क्रिकेटपटूंसाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण, स्पर्धात्मक संधी आणि सातत्यपूर्ण विकास यांची उपलब्धता ही सर्वात मोठी अडचण आहे. कबुनी ही परिस्थिती बदलण्यासाठी तयार करण्यात आली आहे. AI-संचालित प्रशिक्षण आणि नवीन युवा स्पर्धांचा संगम घडवून आम्ही असे व्यासपीठ निर्माण करत आहोत, जिथे प्रत्येक युवा खेळाडू – तो कुठेही राहत असो किंवा त्याची पार्श्वभूमी काहीही असो – प्रशिक्षण घेऊ शकतो, स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो आणि आपली प्रतिभा सिद्ध करू शकतो.
भारत ही केवळ सुरुवात आहे. आम्ही येथे जे उभारत आहोत ते क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासाठी एक आराखडा आहे. आमचा विश्वास आहे की हे मॉडेल जागतिक स्तरावर विस्तारू शकते, ज्यामुळे जगभरातील पुढील पिढीतील खेळाडूंसाठी नवीन संधी निर्माण होतील आणि त्यांची क्षमता अधिक प्रभावीपणे विकसित होईल.”
उच्चस्तरीय प्रशिक्षण परवडणाऱ्या किमतीत आणि व्यापक प्रमाणात उपलब्ध करून देत हे प्लॅटफॉर्म खेळाडूंच्या पार्श्वभूमी किंवा क्षमतेची पर्वा न करता त्यांना पाठबळ देते. तसेच, प्रशिक्षकांची भूमिका कमी करण्याऐवजी ती अधिक बळकट करण्याचे कार्य करते. शालेय कार्यक्रमांपासून राष्ट्रीय स्पर्धांपर्यंत विविध उपक्रमांना पाठिंबा देण्यास सक्षम असलेले कबुनी मोठ्या प्रमाणावर प्रतिभा विकसित करण्यासाठी आणि युवा खेळाडूंना प्रशिक्षण, स्पर्धा आणि यशाच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment