मानसिक आरोग्यावरील भारतातील पहिला सांस्कृतिक महोत्सव
मानसिक आरोग्यावरील भारतातील पहिला सांस्कृतिक महोत्सव ‘ अनंतरंग २०२५’मध्ये मानसिक आरोग्याविषयी संभाषणाला मिळाली चालना मुंबई , १० ऑक्टोबर २०२५ :जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने वेल्स्पन फाउंडेशनच्या वतीने मुंबईतील सहारा स्टार येथे ’अनंतरंग’ या मानसिक आरोग्य महोत्सवाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले. या निमित्ताने मन आणि संस्कृतीचा एक परिवर्तनकारी उत्सव साजरा होताना दिसला. ‘अनंतरंग‘ हा मानसिक आरोग्याला समर्पित असा देशातील पहिला सांस्कृतिक महोत्सव आहे. ख्यातनाम कवी आणि गीतकार जावेद अख्तर आणि वेल्स्पन वर्ल्डच्या अॅपेक्स सदस्यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. कला , संवाद आणि जिवंत अनुभव यांचा मिलाफ करणाऱ्या एका दिवसाचा अनुभव या निमित्ताने आला. मानसिक आरोग्याविषयी देशात काय चर्चा होते , याची या निमित्ताने पुन्हा नव्याने मांडणी करण्यात आली. ’ अनंतरंग’च्या निमित्ताने कलाकार , शिक्षक , मानसशास्त्रज्ञ , धोरणतज्ज्ञ आणि क्रिएटर्स असे ६०० पेक्षा अधिक सहभागी एकत्र आले. वैयक्तिक आणि सांस्कृतिक प्रवासाच्या रूपाने मा...