जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश असलेल्या किल्ल्यांचा चित्रनगरीने साकारला देखावा

जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश असलेल्या किल्ल्यांचा चित्रनगरीने साकारला देखावा देखाव्यातून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य व पराक्रमाची गाथा मुंबई : `चित्रनगरीच्या राजा'चा यंदाचा गणेशोत्सवातील देखावा आकर्षक ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य व पराक्रमाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील किल्ले व जिंजी किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा जीवनपट उलगडला आहे. या देखाव्याला पहिल्या दिवसापासून भाविकांची पसंती मिळत आहे. हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण होणाऱ्या गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीत विराजमान होणाऱ्या श्री गणरायाचे यंदा ३२ वे वर्ष आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिष शेलार , चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली हा देखावा साकारण्यात आला आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक सुमित पाटील यांनी हा देखावा साकारला आहे. महार...