ईका मोबिलिटीने मुंबईमध्ये नवीन ऑल-रेंज वेईकल डिलरशिपसह विस्तार केला
ईका मोबिलिटीने मुंबईमध्ये नवीन ऑल-रेंज वेईकल डिलरशिपसह विस्तार केला मुंबई, २ ऑक्टोबर २०२५: ईका मोबिलिटी या आघाडीच्या इलेक्ट्रीक वेईकल व तंत्रज्ञान कंपनीने राजस राइडसोबत सहयोगाने मुंबईमध्ये आपल्या नवीन डिलरशिपच्या उद्घाटनाची घोषणा केली. राष्ट्रीय महामार्ग ४८, वसई (पूर्व), पालघर जिल्हा, महाराष्ट्र - ४०१२०८ येथे परमार इंडस्ट्रीयल इस्टेटजवळ स्थित ईका शोरूम ऑल-रेंज डिलरशिप म्हणून काम करते, जे इलेक्ट्रिक प्रवासी व व्यावसायिक वाहनांचा संपूर्ण पोर्टफोलिओ देते. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये धोरणात्मकरित्या स्थित हे डिलरशिप सुरत, अहमदाबाद आणि प्रमुख व्यापक व औद्योगिक केंद्रांपासून जवळच्या अंतरावर आहे, ज्यामुळे ग्राहकांसाठी व व्यवसायांसाठी योग्य गंतव्य आहे. सर्वसमावेशक ३एस सुविधा (सेल्स, सर्विस व स्पेअर पार्ट्स) म्हणून स्थापित करण्यात आलेले हे डिलरशिप सर्वांगीण ग्राहक अनुभव देते, जेथे ग्राहक तज्ञांच्या मार्गदर्शनासह ईकाच्या इलेक्ट्रिक वेईकल्सचा अनुभव घेऊ शकतात व खरेदी करू शकतात, तसेच समर्पित सर्विस व जेन्यूएन स्पेअर पार्ट्स सपोर्ट मिळवू शकतात. ६...