डॉ. बत्रा’s® यांच्या १७ व्या पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड्स २०२५ मध्ये प्रेरणादायी संघर्षकथांना सलाम
डॉ . बत्रा ’ s® यांच्या १७ व्या पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड्स २०२५ मध्ये प्रेरणादायी संघर्षकथांना सलाम मनीषा कोईराला यांनी पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड प्राप्तकर्त्यांच्या दृढतेला आणि जिद्दी चा गौरव केला बजाज ऑटो लिमिटेडच्या सहाय्याने आयोजित डॉ. बत्रा’ s® पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड्सच्या १७ व्या आवृत्तीमध्ये आजारपण , दिव्यांगत्व आणि प्रतिकूल परिस्थितींवर मात करून समाजावर दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणाऱ्या विलक्षण व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री आणि स्वतः कर्करोगावर मात केलेल्या मनीषा कोईराला यांनी विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रत्येकी एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान केले. मुंबईतील प्रतिष्ठित टाटा थिएटर , एनसीपीए येथे आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अक्षय बत्रा (उपाध्यक्ष आणि एमडी – डॉ. बत्रा’ s® हेल्थकेअर) आणि अभिनेत्री मन्दिरा बेदी यांनी केले. या वर्षी , कार्यक्रमाला विविध क्षेत्रे आणि प्रदेशांमधून आलेल्या १ , ००० हून अधिक प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल उपस्थिती दिली. पाच पुरस्कार विजेते — तिनकेश कौशिक (तीन अवयव गमावूनही माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्...