मॅक 24एफपीएस 2017मध्ये भारतीय व आंतरराष्ट्रीय सिनेमातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना सलाम

मॅक 24एफपीएस 2017मध्ये भारतीय व आंतरराष्ट्रीय सिनेमातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना सलाम
वार्षिक इंटरनॅशनल अॅनिमेशन अॅवॉर्ड्समध्ये 4000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग
माया अॅकॅडमी ऑफ अॅडव्हान्स्ड सिनेमॅटिक्स (मॅक) या थ्रीडी अॅनिमेशन व व्हीएफएक्स ट्रेनिंगमधील आघाडीच्या अकादमीने 15व्या वार्षिक 24एपपीएस इंटरनॅशनल अॅनिमेशन अॅवॉर्ड्समध्ये 2017मध्ये भारतीय व आंतरराष्ट्रीय सिनेमातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना सलाम केला. मीडिया व मनोरंजन क्षेत्रातील वार्षिक तांत्रिक पुरस्कारांचे आयोजन मुंबईतील सहारा स्टार येथे मॅकच्या विविध केंद्रांवरील अंदाजे 4000 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हे विद्यार्थी या समारंभासाठी आवर्जून आले होते.
24 एफपीएस पुरस्कारांतर्फे जगभरातील अॅनिमेशन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा व व्यक्तींचा गौरव केला जातो आणि तरुण आर्टिस्टना व मॅकच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रिएटिविटीसाठी सन्मानित केले जाते. हे पुरस्कार म्हणजे हे पुरस्कार म्हणजे तरुण अॅनिमेशन फिल्ममेकर्सनी केलेल्या कामाचा सर्वांपर्यंत पोहोचवणारा व त्यांना या उद्योगात उत्तेजन देणारा उपक्रम आहे.
टाटा एलेक्सीडीक्यूअसेम्ब्लेजझेंटिक्स, टून्झडबल निगेटिव्हएमपीसीप्राणा स्टुडिओजप्राइम फोकस अशा आघाडीच्या मीडिया व मनोरंजन कंपन्यांचा समावेश असलेल्या परीक्षक मंडळाने 113 प्रवेशिकांतून विविध श्रेणींतील विजेत्यांची निवड केली.

15व्या वार्षिक पुरस्कारांविषयी बोलताना, अॅपटेक लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पंत म्हणालेमॅकतर्फे दरवर्षी मीडिया व मनोरंजन क्षेत्राला अनेक क्रिएटिव्ह व्यक्तींची भेट दिली जाते. या व्यक्ती मीडिया व मनोरंजन क्षेत्रात जागतिक स्तरावर स्वतःचे नाव निर्माण करतात. विक्रमी संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग व विविध श्रेणींमध्ये सादर करण्यात आलेल्या उत्कृष्ट प्रवेशिका निःशब्द करणाऱ्या आहेत. यातून या उद्योगाला मीडिया व मनोरंजन क्षेत्र चांगल्या दराने वाढत असल्याचा व त्यामध्ये उत्तम प्रोफेशनलची कमतरता नसल्याचा संदेश दिला गेला आहे. रोजगाराभिमुख शिक्षण हे ब्रिद घेऊन सुरू केलेल्या या संस्थेच्या उद्दिष्टामुळे उद्याच्या अनेक स्टार्सचे करिअर घडवले जात असल्याने आम्हालाही यामुळे अभिमान वाटतो.
अॅपटेक लि.चे संचालक अनुज काकर म्हणाले, येत्या काही वर्षांत मीडिया व मनोरंजन क्षेत्र 9% दराने वाढण्याची शक्यता आहे आणि 2020 पर्यंत या क्षेत्राची उलाढाल 23 अब्ज रुपये असेल. वाढीच्या इतक्या उत्तम संधींमुळेया क्षेत्राला चांगल्या मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. या वर्षीही 24 एफपीएस पुरस्कारांनी विद्यार्थ्यांचे गेमिंग कॅरॅक्टर व लँडस्केप रेंडरिंग आर्टिस्टऑग्मेंटेड रिअॅलिटी (एआर)व्हर्च्युअल रिअॅलिची (व्हीआर), सिम्युलेशन आर्टिस्ट अशा नव्या करिकअरबाबत वाढते स्वारस्य अधोरेखित केले.
अॅपटेक लि.चे कार्यकारी उपाध्यक्ष राम वॉरिअर म्हणाले24 एफपीएसमध्ये येणाऱ्या प्रवेशिकांची विचारक्रिएटिविटी व अंमलबजावणी या बाबतीतील गुणवत्ता दरवर्षी वाढते आहे. त्यातून प्रत्येक श्रेणीसाठी विजेत्यांची निवड करणे परीक्षकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. हे पुरस्कार म्हणजे उत्तम विद्यार्थ्यांच्या कार्याचा दखल घेण्याचा व त्यांना या क्षेत्रातील दिग्गजांशी जोडण्याचा एक मार्ग आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24