मुंबई शॉपिंग फेस्टीवल 2018

मुंबई शॉपिंग फेस्टीवल 2018

महाराष्ट्र राज्य सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नव्या स्वरुपातील पहिली आवृत्ती असणार्‍या मुंबई शॉपिंग फेस्टीव्हलचे (एमएसएफ) उद्घाटन करताना अतिशय आनंद होत आहे. या प्रकारचा भारतातील पहिलाच असणारा हा फेस्टीव्हल 12 ते 13 जानेवारी 2018 या कालावधीत विस्तीर्ण आणि महान अशा मुंबई शहरात आयोजित करण्यात आला आहे. एमएसएफ 2018 मुंबईकर नागरिकांची खरेदीची आवड लक्षात घेउन भरवण्यात आला असून या शहराला  खरेदीचे ठिकाण अशी ओळख करुन देणारा ठरेल. देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असणार्‍या या शहरासाठी हा फेस्टीव्हल साजेसाच आहे. 
महाराष्ट्राच्या संस्कृतीची गुणवैशिष्ट्ये खर्‍या अर्थाने जपणारे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शुक्रवार, दि. 12 जानेवारी 2018 रोजी जिओ गार्डन्स, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी फेस्टीव्हलचे उद्घाटन करतील.
दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापने आता चोवीस तास सुरु ठेवण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार, पर्यटन मंत्रालय आणि एमटीडीसी मुंबईतील पहिला रात्र बाजार आणि फ्ली मार्केट सुरु करणार आहे. हा रात्र बाजार शनिवार आणि रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे मुंबईकर नागरिकांना आपल्या सोयीनुसार बाहेर पडून मुंबई शॉपिंग फेस्टीव्हलचा आनंद खर्‍या अर्थाने लुटता येईल. तुमचे सहकार्य आणि शुभेच्छांच्या माध्यमातून आमची सर्वोत्कृष्ट टीम एमएसएफ 2018 साजरा करताना तुम्हाला आनंद आणि सुरक्षिततेचा अनुभव मिळवून देईल याची खात्री देतो. मी हे देखील सांगू इच्छितो की, हे फ्ली मार्केट नागरी वसाहत नसणार्‍याच ठिकाणी उभारले जाईल त्यामुळे नागरिकांना कोणत्याही स्वरुपाचा त्रास सहन करावा लागणार नाही. तरीही ग्राहकांना मार्केटच्या ठिकाणी सहजासहजी पोहोचता येईल.
या ठिकाणी खरेदीच्या निमित्ताने एकत्र येउन अबालवृध्द शहरामध्ये प्रफुल्लतेचे वातावरण निर्माण करतील.
देशाची आर्थिक तसेच मनोरंजनाची राजधानी समजल्या जाणारे मुंबई शहर पर्यटन तसेच बिनधास्त जीवनशैलीसाठीही परीचित आहे. एमएसएफ 2018मुळे निश्‍चितपणे महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल, जो राज्याच्या प्रगतीसाठी अतिशय महत्वाचा आहे. खरेदी आणि सांस्कृतिक उत्सवाबरोबरच हा उपक्रम व्यावसायिक तसेच ग्राहकांसाठी एक जागतिक दर्जाचे व्यासपीठ बनवण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. पर्यटन मंत्रालयाकडून आयोजित केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा इव्हेंट आहे.

आऊटडोअर मार्केटमधील ग्राहकांची गर्दी, मेगा सेल आणि बक्षिसे या माध्यमातून मुंबईतील हा पहिला वीस दिवसांचा खरेदी उत्सव मुंबईला खर्‍या अर्थाने एक खरेदीचे सर्वोत्तम ठिकाण बनवेल यात शंका नाही. तुमचे कुटुंब किंवा मित्र परिवारासोबत फॅशनमधील नवीनतम ट्रेंड्सच्या खरेदीचा आनंद लुटण्यासाठी एमएसएफ 2018मध्ये आलेच पाहिजे. हा उत्सव पाहुण्यांना जागतिक दर्जाचा खरेदीचा अनुभव तरी देईलच. त्यासोबत मनोरंजनाचे लाईव शो, नृत्य यांचेही शहरभरात आयोजन करण्यात येणार आहे. 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24