पेअर-समृद्ध आहारातील संभाव्य प्रोबायोटिक लाभांचा शोध घेण्यासाठी नवीन संशोधन

पेअर-समृद्ध आहारातील संभाव्य प्रोबायोटिक लाभांचा शोध घेण्यासाठी नवीन संशोधन

टाइप-टू मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या व्यवस्थापनात पेअरची भूमिका निश्चित करण्यासाठीही इन व्हायट्रो अभ्यास
फूड रिसर्च इंटरनॅशनलच्या मार्च महिन्यातील अंकात “डाएटरी फंक्शनल बेनिफिट्स ऑफ बार्टलेट अॅण्ड स्टारक्रिम्जन पेअर्स फॉर पोटेन्शिअल मॅनेजमेंट ऑफ हायपरग्लिस्मिया, हायपरटेन्शन अॅण्ड अल्सर बॅक्टेरिया हेलिकोबॅक्टर पायलोरी व्हाइल सपोर्टिंग बेनिफिशिअल प्रोबायोटिक बॅक्टेरिया रिस्पॉन्स,” एक नवीन इन व्हायट्रो (टेस्ट ट्यूब) अभ्यास प्रसिद्ध झाला होता.
सध्या नॉर्थ डकोटा स्टेट युनिव्हर्सिटीत वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक असलेले कालीदास शेट्टी (पीएचडी) आणि या संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ. दीपायन सरकार यांनी प्रयोगशाळेत इन व्हायट्रो सेटिंगमध्ये बार्टलेट आणि स्टारक्रिम्जन या पेअर्सच्या दोन प्रकारांमध्ये आढळणार्‍या घटकांचा जुनाट आजारांवर होणारा प्रभाव समजून घेण्यासाठी अभ्यास केला. या अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार, पेअरचे हे दोन प्रकार आंबवले असता, जठराशी निगडित आजारांवर नियंत्रण मिळवण्याची त्यांची क्षमता आणखी वाढते. विशेषत: मानवामध्ये सर्वाधिक आढळणारा एच. पायलोरी हा यकृताला होणारा जीवाणू प्रादुर्भाव, प्रोबायोटिक क्षमता असलेल्या लाभदायक जीवाणूंना धक्का न लावता, नियंत्रणात आणण्याची क्षमता पेअरच्या या दोन प्रकारांत असते. 
या अभ्यासाबद्दल डॉ. कालीदास शेट्टी म्हणाले, “जीवाणू म्हटले की आजाराला कारणीभूत ठरणारे काहीतरी असा समज सामान्यपणे आढळतो. प्रत्यक्षात मात्र आपले शरीर जीवाणूंनी भरलेले आहे आणि त्यातील बहुतेक जीवाणू चांगले आहेत. पचनक्रियेतील जीवाणूंच्या हालचालींमध्ये समतोल राखण्यात पेअर काय भूमिका बजावू शकते हे जाणून घेणे खूपच रोमांचक आहे. कारण, चांगले जीवाणू शरीराचे आरोग्य राखण्यात मदत करतात.”
पेअर्समधील प्रोबायोटिक क्षमतेचा अभ्यास करण्यासोबतच टाइप-टू मधुमेह आणि त्यातून उद्‌भवणार्‍या हृदयविकारासारख्या आहाराशी निगडित असंसर्गजन्य आजारांचे कार्यक्षम व प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी पेअर्सचा आहारात वापर कसा करता येईल याचाही अभ्यास संशोधकांनी केला. या अभ्यासात असे आढळून आले की, बार्टलेट आणि स्टारक्रिम्जन या पेअरच्या प्रकारांमध्ये फेनोलिक्ससारखे घटक आणि अॅण्टिऑक्सिडंट्स आहेत; याशिवाय स्टार्च आणि ग्लुकोज चयापचयाशी संबंधित विकारांना (एंझाइम्स) संथ करणारी हालचाल यामुळे होते. याचा उपयोग सुरुवातीच्या टप्प्यातील हायपरग्लिस्मिया आणि मधुमेहामुळे झालेला उच्च रक्तदाब आटोक्यात आणण्यासाठी होतो. पेअरचा समावेश जगातील सर्वात लोकप्रिय फळांमध्ये होतो. पेअर हा तंतूमय पदार्थ अर्थात फायबरचा उत्तम स्रोत असून यातून केवळ शंभर कॅलरींमागे मोठ्या प्रमाणात क जीवनसत्व मिळते. एक मध्यम आकाराचे पेअर खाल्ल्यास त्यातून मानवी शरीराला दररोज आवश्यक असलेल्या फायबरपैकी २४ टक्के फायबर मिळते.  शिवाय या फळात सोडियम व कोलस्टरॉल अजिबात नाही आणि १९० मिलिग्रॅम पोटॅशिअम आहे. एकंदर फळे व भाज्यांनी समृद्ध आहारामध्ये पेअर्सचा समावेश केल्यास त्यातून सुक्ष्मपोषके, जीवनसत्वे, आहारातून मिळणारे फायबर, पोटॅशिअम, अॅण्टिऑक्सिडण्ट्स आणि आणखीही बरेच काही मिळते.
डॉ. शेट्टी यांनी याआधी केलेल्या इन व्हायट्रो संशोधनात पेअरच्या विविध प्रकारांचे गर घेऊन त्यांचा पचनक्रियेतील ग्लुकोज शोषून घेण्याच्या प्रक्रियेवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला होता. त्यांचे हे संशोधन याचाच पुढील टप्पा आहे. या दोन्ही इन व्हायट्रो संशोधनांचे निष्कर्ष मानवी शरीरांना कसे लागू पडतात याबद्दल माहिती नाही. मात्र, या संशोधनाचा संदर्भ घेऊन भविष्यकाळात मानवावर याचा काय परिणाम होतो हे शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासता येईल हे निश्चित.
पेअरवरील संशोधन, पोषणमूल्यांचे स्रोत आणि कृती जाणून घेण्यासाठी पुढील www.usapears.org या वेबसाइटला भेट द्या किंवा www.facebook.com/USAPears.India या फेसबुकपेजला भेट द्या.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy