पर्ल ऍकॅडमी तर्फे पी जी अभ्यासक्रमासाठी 'ओपन हाऊस' चे आयोजन

पर्ल ऍकॅडमी तर्फे पी जी अभ्यासक्रमासाठी 'ओपन हाऊसचे आयोजन

             मीडिया आणि बिझनेस डोमेन उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचे चर्चासत्र

             ४०० हुन अधिक विद्यार्थी उपस्थित

             संस्थेकडून २४ फेब्रुवारी २०१८ ला गुणवत्ता शिष्यवृत्ती चाचणी

भारतातील डिजाईनफॅशन आणि बिजनेस आणि मीडिया क्षेत्रातील आघाडीची संस्था पर्ल एकेडमीने मुंबईतील कॅम्पस मध्ये  विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सर्जनशील करिअर आणि संधी यासाठी 'ओपन हाऊससेशन चे आयोजन केले होते. पूर्ण दिवसाच्या या कार्यक्रमात पॅनल चर्चेसाठी दैनिक भास्कर समूहाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ भास्कर दासअभिनेत्री मोनिका मूर्तीव्हिजन वर्ल्डचे हेड स्ट्रॅटेजी अॅँड मार्केट डेव्हलपमेंट अमिताश बॅनर्जीलक्झरी उद्योग तज्ज्ञ कलीम खानपर्ल ऍकॅडमीच्या स्कूल ऑफ मिडीयाचे प्रमुख प्रा. उज्जल के चौधरी आणि पर्ल अकादमीचे फॅशन व्यवस्थापन तज्ज्ञ नीरज पॉल तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या  'ओपन हाऊसमध्ये क्रियात्मक कार्यशाळेत उद्योगलक्झरीरेडिओपत्रकारिता,जनसंचार आणि छायाचित्रण या विविध क्षेत्रांमधील तज्ञांनी मार्गदर्शन  केले. या कार्यशाळेत  विद्यार्थ्यांनी उद्योग व्यावसायिकांशी संवाद साधला ज्यामुळे त्यांना या क्षेत्रांतील महत्वपूर्ण माहिती मिळाली.

संस्थेकडून २४ फेब्रुवारी २०१८ ला प्रसार माध्यम आणि संपर्क या दोन नवीन पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी पर्ल ऍकॅडमीच्या मुंबईदिल्लीजयपूरकोलकाता आणि पाटणा या कॅम्पस मध्ये घेण्यात येणार आहे.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०१८ आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ट्यूशन फीसाठी ५० टक्के गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळेल. जुलै २०१८ पासून सुरू होणाऱ्या या अभ्यासक्रमासाठी एकूण ४० जागा उपलब्ध आहेत.

३ वर्षाच्या यु जी लेवल अंतर्गत विद्यार्थी माध्यम आणि कम्युनिकेशन (पत्रकारिता / मनोरंजन) आणि जाहिरात आणि विपणन अभ्यासक्रमांची निवड करू शकतात.
२ वर्षांचे पीजी स्तर अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांसाठी खुले असतील.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार