इमाराचा नवा चेहरा जॅकलिन फर्नांडिस
इमाराचा नवा चेहरा जॅकलिन
फर्नांडिस
जलद गतीने विस्तारत
असलेल्या फॅशन रिटेल कंपनीने, इमाराचा स्प्रिंग 2018साठी नवा चेहरा
लोकप्रिय बॉलिवुड नटी जॅकलिन फर्नांडिस असेल, असे जाहीर केले आहे. इमारा ही
स्त्रियांच्या एथनिक वेशभूषेची सेलिब्रिटी फॅशन लाइन आहे, याची संकल्पना
यूएसपीआलद्वारे करण्यात आलेली आहे, यातील एथनिक डिझाइन्स समकालीन इटरप्रिटेशनची
आहेत.
जॅकलिनचे व्यक्तिमत्त्व अत्याधुनिक भारतीय तरुण
मुलीच्या चार्मिंग व्यक्तिमत्त्वाला साजेसे आहे, ती कूल आहेच शिवाय तिची स्टाइलही
तशी आहे; इमारा ब्रँडची सर्व वैशिष्ट्ये यात येतात. सर्वात
जास्त यश प्राप्त केलेली ही नटी व उद्योजिका तिच्या ट्रेंड सेटिंग फॅशनसाठी प्रसिद्ध
आहे, फॅशनबद्दल जागरुक असणाऱ्या शहरी तरुणींचेच ती प्रतिनिधित्व करते.
या नव्या विकासाविषयी, यूएसपीएलचे संस्थापक
आणि सीईओ अंजना रेड्डी म्हणाल्या की, ``जॅकलिनची इमारासहची संलग्नितता कंपनीच्या धोरणात्मक वचनबद्धतेत प्रतिवबिंबित
होते, महिलांच्या एथनिक वेशभूषेचा विस्तार करते. आमची विस्ताराची धोरणे इमाराच्या श्रेयानुसार
येतात, याद्वारे स्टाइलिश क्लासिक समकालीन फॅशन सादर केली जाते. जॅकलीनची ऊर्जा
आणि युशफुलनेस यांच्यासह तिची वेगळी फॅशन तिला चाहत्यांशी वेगळ्या मार्गाने जोडते,
आणि येत्या काही वर्षांमध्ये आमच्या ब्रँडशी हे चाहते जोडले जातील.''
``इमाराबरोबर मी जोडली जातेय, याचा मला प्रचंड
आनंद झालेला आहे, इमारा खूपच लोकप्रिय आणि यशस्वी ब्रँड आहे. यामुळेच यूएसपीएलच्या
एनर्जेटिक टीमबरोबर काम करण्याकडे मी लक्ष देणार आहे, त्यांनी तरुण भारतीय महिलांसाठी
सर्वात स्पर्धात्मक अशी खास श्रेणी तयार केली आहे आणि मी त्याचे प्रतिनिधित्व
करावे हे नक्कीच मोठे आव्हान आहे,'' असे जॅकलिन म्हणाली.
यंदाच्या मोसमातील लाइन, स्प्रिंग 2018 सादर
करताना, सिलहाउटी श्रेणी दाखवण्यात आली आहे, फॅब्रिकचा वापर, इंडिगो, मोनोक्रोम सारख्या
जॅकलिनचा इनिमिटिबल फॅशन सेन्स दर्शवणाऱ्या विविध थीमचा प्रामुख्याने वापर करण्यात
आला आहे. ब्रँडचे विशेष कलेक्शन सादर करण्यात आले आहे, आणि यात अत्याधुनिक भारतीय
महिलांच्या गरजा अगदी योग्य प्रकारे दर्शवण्यात आल्या आहेत, यामुळे तिच्या
वैयक्तिक स्टाइल कोशंटची पूर्तता स्त्रीला करता येणार आहे.
इमाराबद्दल
इमाराची स्थापना 2015 साली अत्याधुनिक भारतीय क्लासिकची
स्वीकृती करणारा ब्रँड म्हणून करण्यात आली. एथनिक डिझाइनमध्ये प्रयोग करत असतानाच,
ब्रँडतर्फे अत्याधुनिक परंतु समकालीन फॅशन सादर करण्यात आली आहे, तरुण टवटवीत आणि
स्टाइलिश अशी ही फॅशन आहे. नव्या भारतीय महिलेसाठी; स्मार्ट आणि स्वतंत्र, मोकळी आणि स्वतंत्र अशा महिलेसाठीची ही नवी श्रेणी
आहे.
इमारा हा महिलांच्या एथनिक फॅशनचा ब्रँड असून, यूएसपीएल
(युनिव्हर्सल स्पोर्ट्स बिझ प्रायव्हेट लिमिटेड)तर्फे तिची संकल्पना
करण्यात आलेली आहे, अॅसेल पार्टनर्स
पोर्टफोलिओ कंपनी आणि भारतातील पहिली सेलिब्रिटी कॉमर्स कंपनी आहे.
Comments
Post a Comment