व्हर्लपूल ऑफ इंडियाच्या `मेक इन इंडिया` मोहिमेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब
व्हर्लपूल ऑफ इंडियाच्या `मेक इन इंडिया` मोहिमेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब
मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८ दरम्यान भारतातील व्यापारव्याप्तीची
घोषणा
कन्झ्यूमर अप्लायन्सेसची जागतिक उत्पादक व्हर्लपूल कॉर्पोरेशन यूएसए या कंपनीच्या
व्हर्लपूल ऑफ इंडिया या उपकंपनीने त्यांच्या पुण्यातील उत्पादन प्रकल्पाचा विस्तार
करीत असल्याची घोषणा नुकतीच केली. टप्प्याटप्प्यात ३५७ कोटी रुपयांची गुंतवणूक या
प्रकल्पात करण्यात येत असल्याचे मुंबईत झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र –
कन्व्हर्जन्स २०१८ या परिषदेत व्हर्लपूल ऑफ इंडियातर्फे जाहीर करण्यात आले. यातून
व्हर्लपूल कंपनीच्या `मेक इन इंडिया` आणि `मेक इन महाराष्ट्र` उपक्रमाप्रति
असलेल्या निष्ठेचेच प्रतिबिंब दिसते.
सदर घोषणेच्या पार्श्वभूमीवर
महाराष्ट्र सरकार आणि व्हर्लपूल इंडिया यांच्यात मॅग्नेटिक महाराष्ट्र
कन्व्हर्जन्स २०१८ परिषदेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
१९९८ साली व्हर्लपूल इंडियाने
पुण्याजवळीत रांजणगाव एमआयडीसी भागात अत्याधुनिक उत्पादन केंद्राची स्थापना केली.
येत्या पाच वर्षांत रांजणगाव उत्पादन केंद्राच्या दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून
व्हर्लपूल ही कंपनी आपल्या रेफ्रीजरेशन उत्पादनांच्या क्षमतेत वाढ करण्याच्या
विचारात आहे. नवीन इमारतीत नवीन रेफ्रीजरेशन केंद्र स्थापन करण्याचा यात समावेश
होणार असून या माध्यमातून भारतीय ग्राहकांसाठी नवीन कल्पक उत्पादने निर्माण करणे
हा यामागचा उद्देश आहे.
व्हर्लपूल ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय
संचालक श्री. सुनिल डीसुझा म्हणाले, ``महाराष्ट्र सरकारशी पुन्हा एकदा
भागीदारी करून आम्हाला आनंद होतो आहे. या गुंतवणूकीच्या माध्यमातून आम्ही आमच्या
रेफ्रीजरेशन उत्पादनाच्या क्षमतेत वाढ करणार असून ग्राहकांना अत्याधुनिक
तंत्रज्ञान पुरवण्याचे यामागे आमचे ध्येय आहे. आमच्या मेक इन इंडिया वचनाची परिपूर्ती
करण्याचेही आम्ही ध्येय बाळगत असून पुण्यातील तरुणांना रोजगार व ग्राहकांना पुरवठा
सेवा पुरवणे आम्हाला शक्य होणार आहे.``
व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड या
कंपनीचे मुख्य कार्यालय गुरुग्राम येथे असून होम अप्लायन्सेसच्या क्षेत्रातील ही
एक अग्रेसर कंपनी आहे. फरीदाबाद, पुद्दुचेरी आणि पुणे येथे कंपनीची तीन अत्याधुनिक
उत्पादन केंद्रे प्रस्थापित आहेत. ग्राहकांना अत्याधुनिक व काळाच्या पुढे नेणारी
उत्पादने व सेवा पुरवण्याच्या व्हर्लपूलच्या निष्ठेचे प्रतिबिंब प्रत्येक उत्पादन
केंद्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चरमधून दिसून येते.
Comments
Post a Comment