फिनो पेमेंट्स बँक अँड्रॉइडवर आधारित 10 हजार एमपीओएस लावणार


तुमच्या दारातील बँकिंग सुविधा वाढविण्यासाठी फिनो पेमेंट्स बँक अँड्रॉइडवर आधारित 10 हजार एमपीओएस लावणार

फिनो पेमेंट्स बँकेची मूळ कंपनी फिनो पेटेकने तंत्रज्ञान आधारित तुमच्या दारातील बँकिंग सुविधांध्ये इतर बँकांच्या वतीने दशकभरापूर्वी अग्रणीस्थान घेतले होते. हाच वारसा पुढे नेत फिनो पेमेंट्स बँकेने नव्या प्रकारचे डिजिटल उपकरणे देऊन क्सेस पॉइंट्स आणखी सक्षम केले आहेत.
डिजिटल सोल्युशन्स उपलब्ध करून देऊन बँकिंग ग्राहकांसाठी कागदविरहीत, सोपे आणि सुलभ करण्याच्या बँकेच्या धोरणावर आधारित हा उपक्रम आहे.
फिनो पेमेंट्स बँक बहुउद्देशीय अँड्रॉइड आधारित एमपीओएस उपकरणे देशातील 10 हजार बँकिंग पॉइंट्सला टप्प्याटप्प्यात पुरविणार आहे. हे एक उपकरण सध्या वापरात असलेल्या बोटाच्या ठशाची पडताळणी आणि डिजिटल व्यवहार करण्याच्या विविध उपकरणांची जागा घेणार आहे.
नव्या अँड्रॉइड आधारित एमपीओएसचे वैशिष्ट्य आहे की, या एका उपकरणात फिंगर प्रिंट स्कॅनर, कार्ड रीडर, कॅमेरा, प्रिंटर आणि टॅबलेट या सर्व गोष्टी पोर्टबल फॉर्म फॅक्टरमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे अनेक उपकरणे घेऊन जाण्याचा फिनोच्या प्रतिनिधींचा त्रास वाचणार आहे व परिणारी ग्राहकांना सेवा देण्यातील कार्यक्षमता वाढीस लागेल.
अँड्रॉइडआधारित एमपीओएसमुळे ग्राहकांना मिळणारी वित्तीय सेवा सुधारणार असल्याचे सांगताना फिनो पेमेंट्स बँकेच्या प्रोडक्ट्स विभागाचे प्रमुख आणि एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट श्री. आशिष आहुजा म्हणाले, येत्या 12 महिन्यात आम्ही ही 10 हजार उपकरणे आमच्या रिटेल तसेच कॉर्पोरेट बँकिंग पॉइंट्स, शाखा, बीपीसीएलचे आऊटलेट्स, फ्रँचाइझी पॉइंट्स आणि भागिदार बँकांच्या बिझनेस करस्पाँडन्डटपर्यंत पोहोचवणार आहोत. यापूर्वीच 2 हजार उपकरणे आम्ही वापरात आणली असून शहरातील व ग्रामीण भागातील तुमच्या दारातील व जवळपास उपलब्ध असलेली बँकिंग सुविधा ग्राहकांसाठी अधिक सोयीस्कर व सुलभ केली आहे.
बँकेच्या बिझनेस करस्पॉन्डंटसाठी अशाप्रकारचा पर्याय उपलब्ध करून देणारी फिनो पेमेंट्स बँक ही पहिलीच बँक ठरली आहे.
एमपीओएस उपकरणांसह येणारा फिनोचा प्रतिनिधी खाते उघडणे, पैसे जमा करणे, पैसे काढणे, उत्पादन विक्री (वीमा, सोने कर्ज, बिझनेस करस्पॉन्डट कर्ज सुविधा) आणि आधार आधारित पेमेंट यंत्रणा (एईपीएस) यासारख्या सुविधा ग्राहकांना त्यांच्या दारात उपलब्ध करून देईल.
विविध उपयोगांसह एमपीओएस उपकरण हे इंटर ऑपरेबल देखील आहे. म्हणजेच इतर बँकांचे डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना देखील फिनोच्या बँकिंग पॉइंट्च्या आधारे पेमेंट आणि पैसे काढण्याचे व्यवहार करता येतील, असेही श्री. आहुजा म्हणाले.
हे नमूद केले पाहिजे की फिनो पेमेंट्स बँकेने जुलै 2017 मध्ये 400 शाखा व 25 हजार ॲक्सेस पॉइंट्ससह (त्यात त्यांचे धोरणात्मक गुंतवणूकदार भारत पेट्रोलियमच्या आऊटलेट्सचाही समावेश आहे) यासह कामकाजाला सुरुवात केली.
वाढते स्मार्टफोन युझर्सवर लक्ष ठेवून फिनोने त्यांचे मोबाइल बँकिंग ॲप बीपे देखील काही महिन्यांपूर्वी सादर केले.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy