ट्रू बॅलन्सने प्रिपेडवर दैनिक 1 लाख व्यवहारांचा टप्पा पार केला;


ट्रू बॅलन्सने प्रिपेडवर दैनिक 1 लाख व्यवहारांचा टप्पा पार केला;

पोस्ट पेडवर बॅलन्स तपासणी, बिल भरणा आणि कॅशबॅक सुविधा

·         आता आपण कुठल्याही मोबाइल सेवेचा पोस्टपेड बॅलन्स तपासू शकता. एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया ग्राहक आपले बिल भरू शकता. या सेवेचा विस्तार जिओपर्यंत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
·         सध्याचे मोबाइल वॉलेट आणि पोस्टपेड बॅलन्स तपासणीरीचार्ज या वैशिष्ट्यांच्या जोडीला पोस्टपेड वैशिष्ट्य सादर केले आहे.

ट्रू बॅलन्स, जे एक डिजिटल वॉलेट व फायनान्शियल सर्व्हिसेस व्यासपीठ आहे, यांनी, भारतात प्रथमच कुठल्याही मोबाइल सेवेच्या पोस्टपेड सेवेचा बॅलन्स तपासणे व अनेक सिम कार्डचे बिल एकाच ठिकाणी भरता येणे, या सुविधा असलेली सेवा सादर केली आहे.हे अॅपजे प्री-पेड वापरकर्त्यांसाठी मोबाईल बॅलन्स व्यवस्थापन सेवा म्हणून सुरू झालेत्याने आता 100,000 पेक्षा अधिक दैनिक व्यवहार पार केले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला या व्यासपीठाने मोबाईल वॉलेट सेवाही बाजारात आणली. नवीन पोस्टपेड बिल भरणा पर्यायासहमोबाइल वापरकर्ते याचा सोपा ग्राफिकल इंटरफेस वापरून ट्रू बॅलेन्स अॅपमधून त्यांचे पोस्टपेड बिल तपासू शकतात आणि पैसे भरू शकतात. अॅप सध्या एअरटेलआयडियाआणि वोडाफोनसाठी पोस्टपेडच्या देयकास उपलब्ध आहे आणि त्याचप्रमाणे जिओलाही त्याचे समर्थन विस्तारित करण्याचा विचार करीत आहे.

या सेवेमध्ये स्मार्ट अॅलर्ट्स आहेत ज्याद्वारे पोस्टपेड ग्राहक फक्त एका "टॅप" द्वारे त्यांचा डेटा वापरथकबाकी रक्कम आणि बिल देय तारीख पाहू शकतात. या व्यतिरिक्तरिचार्ज सदस्यत्व आणि प्रोमो कोड्स या दोन्हीकडून पैसे परत (कॅशबॅक) देखील मिळू शकतात. ट्रू बॅलन्स सध्या प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही वापरकर्त्यांना उपलब्ध आहे.

पोस्टपेड बॅलन्सची तपासणी आणि बिल भरणा सेवेबद्दल बोलताना ट्रू बॅलन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारीचार्ली ली म्हणाले - "विद्यमान प्रीपेड सुविधेसह कुठल्याही मोबाइल पोस्टपेड सेवेची बॅलन्स तपासणी आणि बिल भरणा वैशिष्ट्य सादर करून आम्ही सर्व वापरकर्त्यांना एक खिडकी सुविधा देण्याचे ध्येय ठेवले आहे. एखाद्याचे थकबाकी तपासणे आणि बिल देयक भरणे या सोयीशिवायग्राहकांना कॅशबॅक सुविधा सुद्धा मिळेल ज्यामुळे पोस्टपेड ग्राहकांना आकर्षक लाभ मिळतील."

पोस्टपेड बॅलन्स तपासणी आणि रिचार्ज सुविधा यामुळे विविध प्रीपेड/पोस्टपेड देयके एकाच ठिकाणी भरण्याची ग्राहकांची गरज भागवते. याहून अधिक व्यापक सेवा पुरविण्यासाठी एक आधार बनला असून पुढच्या महसुलात वाढ करण्याच्या वाढीचा मार्ग तयार आहे.

बॅलन्स हीरो द्वारे 2014 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ट्रू बॅलन्स अॅपचे 50 मिलियन पेक्षा जास्त डाउनलोड्स झाले आहेत. आपल्या ग्राहक-केंद्रीत यूआय आणि आकर्षक सदस्यत्व पर्यायांमुळे थोड्या कालावधीत ग्राहक संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. अॅप ने डेटा वापर तपासणी अधिक सोपी केली असून आता ग्राहकांना डायल पॅडवर यूएसएसडी कोड डायल करण्याची गरज नाही.

Comments

Popular posts from this blog

कमिन्स इंडियाने नैसकॉम ग्लोबल कैपिसिटी सेंटर पुरस्कार 2019 जिंकला

क्रिकेटपटू सुनिल गावसकर समाजातील वंचित घटकांच्या 34 मुलांच्या जीवनरक्षक हृदय शस्त्रक्रियांसाठी संपूर्ण आर्थिक मदत करणार

IDFC Mutual Fund launches mobile game to raise awareness on financial planning