महिंद्रा पॉवरॉलतर्फे उच्च क्षमतेचे नवे डिझेल जनरेटर दाखल


महिंद्रा पॉवरॉलतर्फे उच्च क्षमतेचे नवे डिझेल जनरेटर दाखल

महिंद्रा पॉवरॉल या 19 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाच्या बिझनेस युनिटने पर्किन्स 2000 सिरिज इंजिनाचे बळ असलेले डीजी (डिझेल जनरेटर) दाखल करून आपल्या उच्च क्षमतेच्या डिझेल जनरेटरमध्ये विस्तार केल्याचे जाहीर केले. चेन्नईतील महिंद्रा रिसर्च व्हॅलीतील संशोधन व विकास केंद्रामध्ये डिझाईन केलेल्या आणि पुण्यानजिकच्या चाकण येथील प्रकल्पात उत्पादन केलेल्या या 12.5 लिटर ते 18 लिटर पर्किन्स इंजिन असलेल्या नव्या जनरेटरचा समावेश महिंद्रा पॉवरॉलच्या उच्च क्षमतेच्या मालिकेत करण्यात आला आहे. पर्किन्स 2000 सिरिज इलेक्ट्रॉनिक इंजिन त्यांच्या जागतिक दर्जाच्या गुणवत्तेसाठी व कार्यक्षमतेसाठी नावाजली जातात. ते टबॉर्ज्ड आहेत व एअर टू एअर कूल्ड आहेत.
याबाबत बोलताना महिंद्रा अँड महिंद्राच्या पॉवरॉल व स्पेअर्स बिझनेसचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले की, उच्च केव्हीए क्षमतेची आमची उत्पादने सक्षम करण्याचे पॉवरॉलचे उद्दिष्ट आहे. आता दाखल केलेल्या जनसेटमुळे आमच्याकडे आता 5 केव्हीए ते 625 केव्हीए क्षमतेचे उत्तम दर्जाचे जनसेट आहेत. यामुळे आम्हाला नव्या श्रेणीमध्ये प्रगती करण्यासाठी व आमच्या ग्राहकांना जागतिक दर्जाचे जनसेट देण्यासाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
नव्या डीजी सेंटरमध्ये महिंद्राच्या विशेष डिजिसेन्स तंत्राचा वापर केला असून त्यामुळे हे डीजी स्मार्ट डीजी ठरले आहेत. स्मार्ट डीजीच्या कामगिरीची तपासणी केव्हाही व दुरूनही करता येते. त्यामुळे डीजी सेटचा अपटाइमही सुधारतो. प्रामुख्याने या सेवा केंद्रित उद्योगात डीजी सेटची खरेदी करण्याचा निर्णय सर्व्हिस नेटवर्क व आफ्टर सेल्स सर्व्हिस यावर अवलंबून असतो. महिंद्रा पॉवरॉल डीजी सेट्सना देशभरातील 200 हून अधिक डीलर व अंदाजे 400 टच पॉईंट्स यांच्या विस्तृत सेवा जाळ्यांचे पाठबळ आहे.
महिंद्रा पॉवरॉलने 2001-02 मध्ये वीजनिर्मिती उद्योगात प्रवेश केला आहे. तेव्हापासून व्यवसाय प्रचंड वाढीस लागला आणि आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 1400 कोटी रुपेय इतका व्यवसाय झाला आहे. महिंद्रा पॉवरॉलमध्ये आजच्या घडीला 5 केव्हीए ते 625 केव्हीए अशा डिझेल जनरेटिंग सेटने उर्जा दिली जाते.


Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.