गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्सतर्फे फायर सेफ्टी कॉन्क्लेव्हचे

गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्सतर्फे फायर सेफ्टी कॉन्क्लेव्ह
गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्सने परिसंवादासाठी संबंधित व सक्रिय मान्यवर व्यक्तींना व संबंधितांना एकाच व्यासपीठावर आणले एकत्र

फायर सेफ्टीविषयी वाढत असलेली काळजी लक्षात घेऊन, गोदरेजने फायर सेफ्टीविषयी चर्चा करण्यासाठी परिसंवादाचे आयोजन केले होते. तसेच, आग लागण्यास प्रतिबंध करणे व त्याचा प्रतिकूल परिणाम इमारतीवर होणे रोखणे, यावरही जागृती करण्यात आली. परिसंवादामध्ये सहभागी झालेले प्रमुख पाहुणे होते – मेहेरनोश पिठावाला, व्हीपी व ग्लोबल हेड, गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्स अँड सिस्टीम्स; के. शामी, फायर अडव्हॉयजर, केंद्र सरकाररचे गृह मंत्रालय; मेजर जनरल सोली पावरी, माजी सुरक्षा सल्लागार, भारतीय रिझर्व्ह बँक; बुरझिन सरभनवाला, वरिष्ठ जोखीम व्यवस्थापन तज्ज्ञ, आयसीआयसीआय जनरल इन्शुरन्स; विनायक साने, फायर सिक्युरिटीवरील सीनिअर कन्सल्टंट; कॅप्टन कानन, मुख्य सुरक्षा अधिकारी, सेंट्रल बँक; संदीप मालवी, उपायुक्त, ठाणे; बीआयएसमधील वरिष्ठ कार्यकारी; एस. बी. खरबडे, डेप्युटी चीफ फायर ऑफिसर, मुंबई अग्निशमन दल.


अलीकडच्या काळात देशात विविध ठिकाणी आगी लागण्याच्या घटना अनेक घडल्या आणि अशा घटनांचे प्रमाण सर्वाधिक असण्याच्या शहरांच्या यादीत मुंबई आघाडीच्या शहरांपैकी एक आहे. कमला मिल्समधील घटनेनंतर, अनेक व्यावसायिक इमारती, रेस्तराँ, बार आदींनी अद्याप फायर सेफ्टीची दक्षता घेतलेली नाही व त्यासाठी आवश्यक उपाय योजलेले नाहीत. मुंबई अग्निशमन दलाने स्टार हॉटेल, लोकप्रिय पब, रेस्टो-बार व क्लब, जिमखाना असलेल्या अशा 566 इमारतींची पाहणी केली आणि त्यातील जवळजवळ 90 टक्के इमारतींनी फायर सेफ्टी नियमांचे पालन केले नसल्याचे आढळले. नियमांचे पालन न करणाऱ्यांना महाराष्ट्र फायर सेफ्टी अँड लाइफ प्रिव्हेन्शन अक्ट 2006 या नुसार नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

आगीपासून सुरक्षित इमारत कशी निर्माण करावी, याविषयी माहिती देणे, हे या परिसंवादाचे उद्दिष्ट होते. #Securespaces याविषयीच्या चर्चेने उपस्थितांना एखाद्या ठिकाणी आग लागल्यास माहितीच्या अधिकाराचा वापर कसा करता येऊ शकतो, सुरक्षा उपयायांविषयीचे पूर्वग्रह दूर करणे, स्मार्ट सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, फायर एस्केप याची माहिती मिळाली.    

भारतात गेल्या दशकात फायर सेफ्टीविषयी जागरुकता प्रचंड वाढली आहे. आयटी व रिटेल मार्केट झपाट्याने विस्तार करत असल्याने व मोठे व्यावसायिक कारखाने उभारण्याचे प्रमाणही वाढले असल्याने त्यासाठी आवश्यक असलेली मालमत्ता, गुणवत्ता व संसाधने विचारात घेता आग व सुरक्षितता याबाबत जोखीम घेणे धोकादायक ठरते. तसेच, निवासी क्षेत्राच्या विकासातही आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे पायाभूत सुविधा विकसित करताना व प्रामुख्याने स्मार्ट सिटी मिशन यासारखे उपक्रम राबवत असताना फायर सेफ्टी व सुरक्षा यांची काळजी घेण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्सचे बी2बी बिझनेसचे उपाध्यक्ष व परिसंवादातील एक सहभागी पुष्कर गोखले यांनी फायर प्रोटेक्टिंग रेकॉर्ड कॅबिनेटसारख्या सुरक्षा उपकरणांचा अवलंब, आगीशी संबंधित घटनांचा सामना करण्याची तयारी करण्यासाठी आगीची सूचना देणारी प्रगत व्यवस्था बसवणे, यांचे महत्त्व स्पष्ट केले.

गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्सचे उपाध्यक्ष आणि मार्केटिंग, सेल्स व इनोव्हेशनचे ग्लोबल हेड मेहेरनोश पिठावाला यांनी फायर सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह आयोजित करण्याच्या उद्देशाविषयी सांगितले, “भारतात स्वेच्छेने व सावधगिरी म्हणून आगीपासून संरक्षणाची तरतूद न करता गरजेनुसार उपाय करण्याकडे कल दिसून येतो. सुरक्षेविषयीची चिंता केवळ वैयक्तिक सुरक्षिततेविषयी मर्यादित नसून, त्यामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींची सुरक्षाही विचारात घेतली जाते.  असे असूनही, सुरक्षेचे उपाय करण्याबद्दल उदासीनता दिसून येते. हे लक्षात घेता, फायर सेफ्टी या विषयावर चर्चा करण्याची व इमारत आगीच्या बाबतीत सुरक्षित करण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या प्रगतीविषयी जागृती करण्याची तातडीने गरज आहे, असे आम्हाला वाटले. समाज तंत्रज्ञानाच्या बाबतीत समृद्ध व सबल होत आहे आणि तरीही आपण आगीच्या घटनांच्या बाबत अजूनही पूर्वीइतकेच दुर्बल आहोत. आपल्या वागण्यामध्ये मूलभूत करण्याची नितांत गरज आहे व फायर सेफ्टीची दक्षता घेण्यासाठी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.”

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24