समेना कॅपिटलने ब्लूम हॉटेलचा ३५% हिस्सा रु. ३३० करोडमध्ये घेतला

समेना कॅपिटलने ब्लूम हॉटेलचा ३५% हिस्सा रु. ३३० करोडमध्ये घेतला
संपूर्ण भारतामध्ये विस्तार करण्याच्या रणनीतीला वेग

ब्लूम हॉटेल्स ("ब्लूम") ने कंपनीच्या सिरीज बी गुंतवणूक टप्प्यामध्ये समेना कॅपिटलकडून झालेल्या रु. १०० कोटींच्या गुंतवणुकीनंतर आपल्या विस्तार योजनेला वेगाने वाढविण्यास सुरुवात केली आहे. ब्लूम चे एकूण गुंतवणूक मूल्य रु. ३३० कोटी इतके आहे आणि हि गुंतवणूक कंपनीचे नाविन्यपूर्ण किफायती ब्रॅण्ड्स संपूर्ण भारतातील शहरांमध्ये पोहोचविण्यास मदतरूप ठरेल. या गुंतवणुकीबरोबर समेना कॅपिटलने ब्लूम हॉटेल्सचा ३५ टक्के हिस्सा आपल्या ताब्यात घेतला आहे.

ब्लूम ने देशातील बेंगळुरूनवी दिल्लीगुरगाव आणि गोव्यामध्ये आपले अनोख्या हॉटेलची संकल्पना सादर केल्यानंतर आता विस्तार योजनांना आणखी गती दिली आहे आणि दक्षिण आशियामध्ये १०० हॉटेल्स स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हा विस्तार भारताच्या जगातील तिस-या सर्वात मोठ्या एअरलाईन बाजारपेठ बनण्याच्या समानांतर करण्यात येत आहे. मागणीमधील या वाढीला उदयोन्मुख मध्यम उत्पन्न वर्गामुळे विवेकाधीन उपभोगातील वाढीमुळे चालना मिळाली आहे.

Comments

Popular posts from this blog

चित्रपट धडपड्या तरुणांना "साधन" ची साथ!! सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टचा उपक्रम

वाळकेश्वर येथे बिर्ला एड्युटेकची बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल शाळा सुरू

स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कलाकेंद्र संचालित ‘कलाश्रम’चे पुरस्कार प्रदान!