इंडिया मोबाईल काँग्रेस २०१८ ठरणार जगातली सर्वांत मोठी टीएमटी आणि आयसीटी परिषद

इंडिया मोबाईल काँग्रेस २०१८ ठरणार
जगातली सर्वांत मोठी टीएमटी आणि आयसीटी परिषद
२०१८ च्या सत्रात २ लाख लोकांची हजेरी आणि १३०० प्रदर्शकांचा सहभाग अपेक्षित
एप्रिल २०१८ ः इंडिया मोबाईल काँग्रेस तर्फे इंडिया मोबाईल काँग्रेस २०१८ ची प्राथमिक माहिती जाहीर करण्यात आली. यावेळी या परिषदेत सहभागी होणारे प्रदर्शक, प्रायोजक, उपक्रम आणि मोबाईल उद्योगक्षेत्रासाठीच्या विविध वार्षिक कार्यक्रमांविषयींची माहिती देण्यात आली. न्यू डिजिटल होरायझन : कनेक्ट, क्रिएट, इनोव्हेट“ या थीमअंतर्गत, इंडिया मोबाईल काँग्रेसचे आयोजन २५ ते २७ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत नवी दिल्लीतल्या एअरोसिटी येथे केले जाणार असून या परिषदेच्या वेळी अनेक नवनवीन उपक्रमही राबवण्यात येणार आहेत. या आयएमसीमध्ये टेलिकॉम उद्योगक्षेत्रातील २ लाखांहून अधिक व्यावसायिक उपस्थित राहणे अपेक्षित आहे. यात ५ जी, स्टार्ट अप इकोसिस्टीम, इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी), बिग डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), स्मार्ट शहरे आदी संकल्पनांवर ऊहापोह करण्यात येणार असून या क्षेत्रांशी निगडित उद्योजक इंडिया मोबाईल काँग्रेस २०१८ मध्ये सहभागी होणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

चित्रपट धडपड्या तरुणांना "साधन" ची साथ!! सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टचा उपक्रम

वाळकेश्वर येथे बिर्ला एड्युटेकची बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल शाळा सुरू

स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कलाकेंद्र संचालित ‘कलाश्रम’चे पुरस्कार प्रदान!