ऑनलाईन खरेदीदारांना झेस्टमनीतर्फे सोपे ईएमआय पर्याय

ऑनलाईन खरेदीदारांना झेस्टमनीतर्फे सोपे ईएमआय पर्याय
क्रेडीट कार्डशिवाय विनाहरकत आणि त्वरीत कर्ज सुविधा, सोपे ईएमआय पर्याय
रिटेल कन्झ्युमर्ससाठी असलेले भारतातील जलद गतीने वाढणारे झेस्टमनी हे डिजिटल कर्ज व्यासपीठ असून त्यांनी आपल्या डिजिटल व्यासपिठावर 5 दशलक्षहून अधिक यूजर्सची नोंद केली आहे. या व्यासपिठाच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरीत कर्ज अर्ज सुविधा, त्वरीत क्रेडीट मर्यादेची मान्यता प्रक्रिया आणि सोपी परतफेड सुविधा पुरवण्यात येते. भारतीयांची जीवनशैली आधुनिक करून आपल्या आवडत्या ऑनलाईन शॉपिंग व्यासपिठावरून क्रेडीट कार्डशिवाय कोणतीही वस्तू विकत घेण्याची सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्याच्या हेतूने झेस्टमनीची सुरूवात करण्यात आली.
झेस्टमनीच्या या यशाबद्दल व ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल बोलताना झेस्टमनीच्या सीईओ व सहसंस्थापक लिझी चॅपमन म्हणाल्या, “झेस्टमनी या व्यासपिठावर आम्ही असा विश्वास बाळगतो की, प्रत्येक व्यक्तीला क्रेडीट मिळवण्याचा अधिकार आहे आणि ग्राहकांचे आयुष्य सुखकर व आनंदी बनवण्यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या प्रत्येक वस्तूच्या खरेदीसाठी त्यांना कोणत्याही रकमेचे क्रेडीट देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. झेस्टमनीचे वापरकर्ते ऑनलाईन माध्यमांतून स्मार्टफोनस्वयंपाकघरतील उपकरणेहेडफोनदूरदर्शन यांची खरेदी आणि शिक्षणासाठीचे वित्तव्यवहार करू शकतात. हे सुनिश्चित करण्यासाठी व ग्राहकांची आवड – निवड जपण्यासाठी आम्ही अलीकडेच शाओमी आणि फ्लिपकार्टसारख्या लोकप्रिय ऑनलाइन रिटेल ब्रॅण्ड्सशी भागीदारी केली आहे. सध्या आम्ही दररोज 2.5 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करतो.’’
झेस्टमनी सध्या 200 पेक्षा जास्त किरकोळ भागीदारांसह कार्यरत असून चेकआऊटच्या वेळी विविध आर्थिक पर्याय हे व्यासपीठ ग्राहकांना पुरवते. यामध्ये  क्रेडिट कार्डशिवाय ग्राहकांना ईएमआय पर्यायाचा लाभ घेता येतो. झेस्टमनीच्या ग्राहकांना ज्या गोष्टींची गरज असेल, त्या वस्तू त्वरीत विकत घेण्याची क्षमता या व्यासपिठानेच त्यांना दिली असून त्या खरेदीची रक्कम पुढील 36 महिन्यांत फेडण्याची सोय आहे. झेस्टमनी ही एक तंत्रज्ञान कंपनी आहे आणि पूर्णपणे नियमन केलेल्या कर्ज संस्थांतर्फे या व्यासपिठावर कर्ज दिले जाते.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24