चित्रपट धडपड्या तरुणांना "साधन" ची साथ!! सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टचा उपक्रम

चित्रपट धडपड्या तरुणांना "साधन" ची साथ!!
सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टचा उपक्रम

सदाशिव अमरापूरकर यांची जयंती – एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी प्रत्येक मराठी कला रसिकाच्या मनात स्वतःचं एक अबाधित स्थान निर्माण केलं. सिने सृष्टीला ग्रामीण भागातल्या टॅलेंटच्या ताकदीची जाणीव करून देणारा या सृष्टीतला एक प्रमुख शिलेदार. चित्रपटसृष्टीची काहीही माहिती नसताना, कोणाचीही मदत नसताना, स्वतःचा मार्ग काढणं हे किती कठीण असतं याची जाणीव स्वतः प्रस्थापित झाल्यानंतर सुद्धा अमरापुरकरांना होती.

अमरापूरकर गेल्यानंतर त्यांच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि कलाकारांबद्दलच्या कळवळ्याला पुढे नेत, एक मूर्त स्वरूप देण्याचं काम सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्ट सातत्याने करत आहे. यातलंच एक पाऊल म्हणजे "साधन" हा उपक्रम. "साधन" मधून चांगली कथानके घेऊन चित्रपट निर्मिती करू इच्छीणाऱ्या प्रोजेक्टना लागणाऱ्या equipments ची स्कॉलरशीप देण्यात येणार आहे. या विषयीची माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी श्रीमती सुनंदा आणि मुलगी रिमा यांनी पत्रकारांना या साधन उपक्रमाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार होते, पण काही अपरिहार्य कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी आपले मनोगत लिखित स्वरूपात पाठऊन ह्या कार्यासाठी सोबत असल्याचे जाहिर केले आहे.

मा. श्री विनोद तावडे यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे – " ग्रामीण भागात अभिजात कलेची कमतरता नाही.. पूर्वी कथा कविता यातून आपली सर्जनशीलता जगासमोर मांडली जायची... पण आता डिजिटल जगाबरोबर चालताना दृक्श्राव्य माध्यम वापरून जगासमोर आपल्या मनातली गोष्ट सांगायचं प्रमाण वाढलं आहे... पण जागतिक स्पर्धेत तांत्रिक बाबींमुळे हे कलाकार मागे पडतात. कारण चांगली साधन सामुग्री या कलाकारांकडे नसते.. किंवा व्यावसायिक साधन सामुग्री वापरण्यासाठी लागणारे पैसे यांच्या कडे नसतात. तर अश्या चांगल्या आणि अभिजात कथानकांना आम्ही ही मदत देणार आहोत."

या वेळी माहिती देताना रिमा अमरापूरकर यांनी सांगितलं – " ज्यांना ही स्कॉलरशीप हवी आहे, त्यांनी आमच्याशी संपर्क साधून, त्यांच्या प्रोजेक्टची सर्व माहिती आम्हाला कळवायची आहे. ग्रामीण भागातले ग्रुप, चित्रपट शास्त्राचे विद्यार्थी, सामाजिक संस्था यांना या मध्ये प्राधान्य दिले जाईल. ट्रस्ट तर्फे एक कमिटी नेमण्यात येईल, जी स्कॉलरशीपसाठी पात्र प्रोजेक्ट ठरवेल. प्रोजेक्ट पात्र ठरल्यानंतर, त्यांनी त्यांची पूर्ण केलेली स्क्रिप्ट रजिस्टर करून, त्याची झेरॉक्स आणि इतर काही माहिती पाठवायची आहे. या आधारे स्कॉलरशीपसाठी योग्य प्रोजेक्ट निवडले जातील, व त्यांना पूर्ण किंवा आंशिक स्कॉलरशीप दिली जाईल. या मध्ये शोर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी तसंच फीचर फिल्मचा ही समावेश असेल."

सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्ट गेली तीन वर्ष, अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागांमधील शाळा व कॉलेज या मधून चित्रपट रसग्रहण कार्यशाळा तसेच चित्रपट बनविण्याचे प्रशिक्षण कार्यशाळा मोफत घेत आहे.

श्री. विनोद तावडे, श्रीमती सुनंदा अमरापूरकर, श्री. राजाभाऊ अमरापूरकर, डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ.उमा कुलकर्णी, श्री. विनोद शिरसाठ आणि श्रीमती रिमा अमरापूरकर हे या ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. ११ मे २०१८ – अमरापुरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचे सांगत, ज्यांना या उपक्रमाचा भाग व्हायचे आहे किंवा त्याचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना connect@sadashivamarapurkar.org  या इमेलशी संपर्क साधून सर्व माहिती मिळवता येईल.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.