न्युमरिक ‘प्रेस्टिजिअस ब्रॅण्ड ऑफ इंडिया २०१८’ सह सन्मानित

न्युमरिक प्रेस्टिजिअस ब्रॅण्ड ऑफ इंडिया २०१८’ सह सन्मानित

न्युमरिक या भारतातील आघाडीच्या युपीएस उत्पादक व पॉवर क्वॉलिटी सोल्यूशन प्रदाता कंपनीला प्रेस्टिजिअस ब्रॅण्ड ऑफ इंडिया २०१८सह सन्मानित करण्यात आले. न्युमरिकला प्रख्यात ब्रॅण्डची उपाधी देण्यात आली आहे. या ब्रॅण्डने आपल्या अत्याधुनिक उत्पादने व सेवांच्या संयोजनासह भविष्याची निर्मिती करण्यासोबतच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.


न्युमरिक व्यापक व प्रबळ उत्पादन रेंजसोबतच व्यापक सेवा देते. आपल्या विभागामध्ये ही ६०० व्हीए ते ४.८ एमव्हीए पर्यंत व्यापक उत्पादन रेंज असलेली बहुधा एकमेव कंपनी आहे. ही कंपनी लहान प्रकल्पांपासून मोठ्या डेटा सेंटर्सपर्यंत विविध उपयोजनांची पूर्तता करते. यासाठी व्यापक सेवा नेटवर्कचे साह्य लाभले आहे. न्युमरिकचे एकूण २५४ सर्विस सेंटर्स आणि पूर्णतः इन-हाऊस असलेले ९०० क्षेत्रीय तंत्रज्ञ आहेत. हीच न्युमरिकची खरी संपत्ती आहेअसे आम्ही मानतो.

या यशाबाबत बोलताना न्युमरिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पलाश नंदी म्हणाले‘‘आम्हाला प्रेस्टिजिअस ब्रॅण्ड ऑफ इंडिया’ पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद होत आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना यशस्वीपणे सेवा देण्यासोबतच त्यांच्या गरजांची पूर्तता केली आहे. आमच्या उत्पादनाला विश्‍वासप्रतिमास्थिरताउत्तम कार्यक्षमतासमंजसपणास्थितीब्रॅण्ड रिकॉलविकासपोहोचनाविन्यता अशा घटकांसंदर्भात ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘यासारख्या पुरस्कारांमुळे आम्हाला अधिक मेहनत घेत आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळते. न्युमरिकने लीग्रॅण्डसोबत केलेल्या सहयोगानंतर आम्हाला जगभरातील सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. स्थानिक बाजारपेठेबाबतचा आमचा अनुभव आम्हाला बाजारपेठेबाबत सखोल माहिती देतो. आम्ही आता स्वतःला जागतिक कौशल्य व स्थानिक माहिती असलेले ग्लोकल कंपनी मानतो. या सन्मानाला आम्हाला नव्या ऊंचीवर पोहोचण्यास मदत झाली आहे.’’

न्युमरिक उत्पादने ऊर्जा कार्यक्षम आहेत आणि हे अत्यंत महत्त्वाचे आहे. न्युमरिकची उत्पादने ९६ टक्के ऊर्जा कार्यक्षम असण्यासह भारतीय बाजारपेठेमधील सर्वात ऊर्जा कार्यक्षम उत्पादने मानली जातात.

प्रेस्टिजिअस ब्रॅण्ड्स ऑफ इंडिया २०१८मध्ये प्रख्यात ब्रॅण्ड्सचा समावेश आहेअसे ब्रॅण्ड्स ज्यांनी आपल्या अत्याधुनिक उत्पादने व सेवांच्या संयोजनासह भविष्याची निर्मिती करण्यासोबतच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

हा पुरस्कार ब्रॅण्डचे मूल्यसामर्थ्य व पात्रतेला प्रशंसित करतो. प्रकल्पामध्ये भारतीय बाजारपेठेतील सर्वात प्रशंसनीयनाविन्यपूर्ण व प्रबळ ब्रॅण्ड्सचा समावेश आहे. हे ब्रॅण्ड्स त्यांच्या अद्वितीय मूल्य तत्त्वे व गुणधर्मांसाठी ओळखले जातात आणि ते अतुलनीय मार्ग स्थापित करण्यासोबतच त्यांच्या ग्राहकांसोबत सखोल व अर्थपूर्ण विपणन संबंध निर्माण करतात.

कंपनी बाबत :
न्युमरिक ही भारतातील आघाडीची युपीएस (अन-इंटरप्टिबल पॉवर सप्लाईज) उत्पादक व पॉवर क्वॉलिटी सोल्यूशन प्रदाता कंपनी आहे. १९८४ मध्ये स्थापना करण्यात आलेली न्युमरिक जागतिक दर्जाच्या पॉवर कंडिशनिंग उत्पादनांच्या माध्यमातून सर्व महत्त्वपूर्ण उपकरणे अधिक काळ चालू राहण्याच्या खात्रीसाठी वीज पुरवठा सुरू राहण्यासोबतच सुरक्षितता देते. संपूर्ण युजर विभागांसाठी एक विश्‍वसनीय पॉवर सोल्यूशन्स भागीदार असलेल्या न्युमरिकच्या उल्लेखनीय उत्पादनांमध्ये किओर टीकिओर एचपीकिओर एचपीई आणि ट्रिमोड एचई व आर्किमोड एचई सारख्या मॉड्युलर सोल्यूशन्सचा समावेश आहे.

न्युमरिकने सातत्याने व सक्रियपणे दर्जेदार व्यवसाय प्रक्रिया दिल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने वितरित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. कंपनी ISO 9001: 2008, ISO 14001:2015,OHSAS 18001:2007 प्रमाणित आहे. ही कंपनी गुणात्मक सर्वोत्तमतेच्या अविरत आवडीसाठी ओळखली जाते. न्युमरिकचे भारतातील युपीएस क्षेत्रामध्ये सर्वाधिक विक्री व सेवा नेटवर्क आहे. कंपनीच्या २५४ हून अधिक सर्विस सेंटर्समध्ये ९०० हून अधिक कारखान्याबाबत प्रशिक्षण घेतलेले क्षेत्रीय तंत्रज्ञ आहेत आणि कंपनीचे प्रबळ बॅक ऑफिस ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देते. ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी असलेले ५ जागतिक दर्जाची उत्पादन केंद्रे उत्तमरित्या प्रशिक्षित मनुष्यबळआधुनिक उत्पादन सुविधांनी युक्त आहेत आणि ही केंद्रे भारतात धोरणात्मकरित्या स्थित आहेत.
न्युमरिकचा बीएफएसआयसरकारटेलिकॉमहेल्थकेअरआयटी/आयटीईएसडेटासेंटर्सप्रोसेस इंडस्ट्रीज व एसओएचओ अशा विविध क्षेत्रांमध्ये क्लायण्टचा सर्वोत्तम समूह आहे. यामधूनच कंपनीची प्रतिष्ठा आणि ब्रॅण्ड इक्विटी दिसून येते.

न्युमरिक गेल्या २४ वर्षांपासून नंबर वन युपीएस आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी राहिली आहे (स्रोत : सॉफ्ट डिस्क अवॉर्ड्‌स). न्युमरिकला बेस्ट मॉड्युलर युपीएस फॉर द इअर २०१५सह देखील सन्मानित करण्यात आले आहे (सॉफ्ट डिस्क अवॉर्ड्‌स २०१५). नुकतेच ईआरटीसी मीडियाने न्युमरिकला इंडियाज गुडविल ब्रॅण्ड फॉर २०१७सह सन्मानित केले.

न्युमरिक ही २०१२ पासून इलेक्ट्रिकल व डिजिटल बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जागतिक स्पेशालिस्ट असलेल्या आणि ५.५ बिलियन युरो उलाढाल असलेल्या लीग्रॅण्डची भाग आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24