भारतातील निम्म्याहून अधिक धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी ते सोडण्याचा प्रयत्न केला, मात्र ठरले अपयशी;नवीन माहिती उघड


भारतातील निम्म्याहून अधिक धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी ते सोडण्याचा प्रयत्न केला,
मात्र ठरले अपयशी;नवीन माहिती उघड
भारतात 10 पैकी सात स्मोकर्सना धुम्रपान धोकादायक आहे याची जाणीव असते. 53 टक्के लोक धुम्रपान सोडण्यास असमर्थआहेत,अशी फाउंडेशन फॉर स्मोक-फ्री वर्ल्डने प्रसारित केलेल्या माहितीतून हे सत्य उघड झाले आहे. त्यामुळे नवीन धुम्रपान-विराम,कमी धोकादायक पर्यायांची आवश्यकता असून ज्याद्वारे स्मोकर्सना प्रदीर्घ आणि आरोग्यदायक आयुष्य जगता येईल.
आपल्याला दशकानुदशके माहिती असलेले सत्यच यातून स्पष्ट झाले आहे की,धुम्रपान करणाऱ्या अनेक व्यक्तींना ते सोडण्याची इच्छा असते,मात्र ते यशस्वी होत नाहीत,”असे फाउंडेशन फॉर स्मोक-फ्री वर्ल्डचे अध्यक्ष डेरेक याच म्हणाले. ते जगभरातील तंबाखू सेवन नियंत्रणात यावे याकरिता सक्रीय आहेत,त्यांनी फ्रेमवर्क कन्वेनशनऑन टोबॅको कंट्रोल (एफसीटीसी) राबवले तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये ते संसर्ग-रहित आजार आणि मानसिक आरोग्य विषयक कार्यकारी संचालक आहेत.
ही माहिती जागतिक सर्वेक्षणाचा भाग असून त्यात 13 देशांमधील 17 हजार सहभागीदार सामील झाले,यातील एक आव्हान म्हणजे जगभरातील लोकांना धुम्रपान थांबवायचे आहे. हे स्पष्ट आहे की,धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी स्मोकिंग करण्यासाठी आपली शारीरिक आणि आर्थिक सुस्थिती पणाला लावली,तरीही काहींना धुम्रपान सोडण्याची इच्छा आहे.
फाउंडेशन फॉर स्मोक-फ्री वर्ल्ड नवीन धुम्रपान-विराम आणि कमी धोकादायक पर्याय शोधून लोकांचा जीव वाचविण्यासाठी निधी-साह्य देईल.
भारतात दर दिवशी 104 दशलक्षहून अधिक लोक तंबाखू सेवनामुळे आपल्या आरोग्याशी खेळत असतात. देशात रस्त्यारस्त्यावर हाताने वळलेल्या विड्या क्षुल्लक किंमतीत उपलब्ध असतात. याप्रकारामुळे भारतात मोठ्या प्रमाणात तंबाखू सेवन चालते. हा पारंपरिक सिगरेट प्रकार भरपूर लोकप्रिय असून त्यांच्यावर कराचा भार नाही.त्यामुळे भारतासारख्या देशात इतर देशांच्या तुलनेत तंबाखू-नियंत्रणाचे निराळे पर्याय राबवून तंबाखू विरामाला चालना देऊन धोके कमी केले पाहिजेत.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE