अर्टेमने घोषणा केली M9 या जगातील सर्वांत सुरक्षित स्कूटरची

अर्टेमने घोषणा केली M9 या सुरक्षित स्कूटरची
  अत्यंत कमी भांडवलावर संशोधनाचे काम केल्यानंतर आता लक्ष्य गुंतवणुकीच्या मालिकेतून उभा राहणारा निधी वापरून तंत्रज्ञानाचे व्यावसायीकरण करण्याचे व पायाभूत सुविधा विकसित करण्याचे
अर्टेम एनर्जी फ्युचर प्रायव्हेट लिमिटेड या एतद्देशीय इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान कंपनीने अर्टेम M9 या जगातील सर्वांत सुरक्षित इलेक्ट्रिक स्कूटरची घोषणा केली आहेयापूर्वी केवळ लक्झ्युरी कार्समध्ये वापरलेली गेलेली आणि दुचाकी वाहनांसाठी अभूतपूर्व अशी एडीएएस (प्रगत चालक-सहाय्य प्रणालीएमनाइनमध्ये वापरण्यात आली आहेही स्कूटर विकसित करताना आजपर्यंत या क्षेत्रात कधीच न दिसलेल्या बाबींचा अंतर्भाव केला आहे ९० किलोमीटर प्रति तास हा सर्वोच्च वेग-५० किलोमीटर प्रति तास हा वेग सहा सेकंदात गाठणे आणि एकदा चार्ज केल्यानंतर १०० किलोमीटर पल्ला पार करण्याची क्षमताएमनाइनमध्ये ऑन-बोर्ड जलद चार्जरने चार्जिंगसोबतच बॅटरी बदलून चार्जिंगची सुविधा देऊन अर्टेम इलेक्ट्रॉनिक वाहनांकडे एका नव्या दृष्टीने बघत आहे.

चारचाकी वाहनांची सुरक्षितता नियमांसोबत झगडत असतानाचदुचाकी वाहनेही नियमांशी जुळवून घेण्यात अपयशी ठरत आहेतएबीएस (अॅण्टि-लॉक ब्रेकिंग सिस्टमआणि सीबीएस (कंबाइन्ड ब्रेकिंग सिस्टमयांसारख्या किमान अटींची पूर्तता करण्यात त्यांना अडचणी येत आहेतभारतातील वाहतूक सुरक्षिततेचा दर्जा अत्यंत वाईट असून गेल्या वर्षभरात १.४ लाख जणांचा रस्ते अपघातात बळी गेलात्यापैकी ३५ टक्के दुचाकी वाहने चालवत होतेएकट्या भारतात दरवर्षी २० दशलक्ष दुचाकी वाहनांची खरेदी होते आणि २०२२-२३ सालापर्यंत यात वाढ होऊन ती ३६ दशलक्षाचा आकडा गाठण्याची शक्यता आहेसंस्थापकांच्या स्वत:च्या अनुभवावरून त्यांना दुचाकी वाहनांमध्ये सुरक्षिततेच्या सुविधा विकसित करण्याची गरज पटली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करताना सर्वांत चिंतेचा मुद्दा असतो तो म्हणजे एका चार्जिंगमध्ये वाहन किती पल्ला गाठू शकेल हाM9 मध्ये १०० किलोमीटरचा पल्ला गाठण्याची सोय देऊन आम्ही हा मानसिक अडथळा पार केला आहे.त्याचबरोबर आम्ही चार्जिंगला बॅटऱ्या बदलण्याचा पर्याय उपलब्ध करून देऊन वाहन अधिक सोयीस्कर केले आहे, असे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रजीत आर्य स्पष्ट करतातअत्यंत कमी भांडवलावर काम करणारी (बूटस्ट्रॅप्डही स्टार्टअप येत्या पाच वर्षांत आणखी तीन उत्पादने विकसित करण्याच्या प्रयत्नात असून यासाठी गुंतवणूक मालिकेची पहिली फेरी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. M9 ची रचना मोड्युलर प्रकारची असून उंची कमी जास्त करण्याची सोय यात आहे.त्यापाठोपाठ M9-A आणि मध्यम आकारमानाच्या बाजारपेठेसाठी M6 स्कूटरही कंपनी आणणार आहे.
अर्टेमची स्थापना नोव्हेंबर २०१६ मध्ये झाली असलीतरी ही कंपनी स्कुनवर्क्स ईव्ही या नावाने तंत्रज्ञानात संशोधन करणारी एक टीम म्हणून सात वर्षांहून अधिक काळापासून काम करत आहेया काळात उत्पादनतंत्रज्ञान व प्रक्रियांच्या पडताळणीसाठी २५०० ग्राहकांची मदत घेण्यात आली आहेकंपनीने नेहमीच सखोल बाजारपेठ संशोधनावर आणि समजुतीवर आधारित विकासावर लक्ष केंद्रित करून व्यवहार्य शाश्वत तंत्रज्ञान आणि सुरक्षितता देण्यावर भर ठेवला आहे.दीर्घकाळात केवळ पर्यावरणपूरक ऊर्जेवर आधारित निर्मितीवितरणसाठा आणि वाहतुकीच्या माध्यमातून हे साध्य करण्याचे अर्टेमचे उद्दिष्ट आहेएलजी केम पॉवरचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अर्टेमच्या सल्लागार मंडळाचे सदस्य डॉप्रभाकर पाटील म्हणालेजगाच्या पाठीवर सर्वत्र इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान क्षेत्राचा वेगाने विकास होत आहेबॅटरीच्या किमती खाली उतरत असून ऊर्जेची घनता वाढत आहेयामुळे व्यवसायाची गृहितके सतत तपासत राहण्याची गरज आहे.दुचाकीद्वारे व्यवहार्य इलेक्ट्रिक वाहतुकीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्टेमकडे एक संपूर्ण आणि दीर्घकालीन दृष्टी आहे यावर माझा विश्वास आहे.
कंपनी सुरक्षिततेच्या मुद्दयावर दोन टप्प्यांत विचार करत आहेटक्कर टाळणे आणि टकरीचा इशारा देणेदुचाकी वाहनांचे बहुतेक अपघात हे चालकाच्या चुकीमुळे आणि अवधान कमी पडल्याने होतातचालकाला अधिक चांगल्या पद्धतीने निर्णय करता यावेत यासाठी वेळोवेळी माहिती देत राहणारे तंत्रज्ञान अर्टेम विकसित करत आहेअर्टेमच्या फ्लॅगशिप M9-A स्कूटर्समध्ये १०० मीटर परिघाचे दर्शन ३६० अंशाच्या कोनात होत राहील याची काळजी घेण्यासाठी कॅमेरे आणि रडार्स बसवले जाणार आहेत.
वातावरणाचे आकलन करून देणाऱ्या संवेदकांकडून मिळालेल्या माहितीचा वापर वाहनाद्वारे चालकाला जागरूकतेसाठी दिलेल्या सुविधांच्या जोडीने केला जाईलहे स्पष्ट करताना अर्टेमचे सहसंस्थापक आणि मुख्य तांत्रिक अधिकारी नवीन दीपक वीरमनेनी म्हणतातएका स्मार्ट हेल्मेटमार्फत तसेच हँडलबार्सवरील व्हायब्रेशन्सद्वारे चालकाला समीपतेचे इशारे दिले जातील. अर्टेमने स्वतविकसित केलेल्या  ईडीबी (इलेक्ट्रो-डायनॅमिक ब्रेकिंगतंत्रज्ञानामुळे आपत्कालीन परिस्थितीत आपोआप ब्रेक दाबले जातीलया तंत्रज्ञानामध्ये रिव्हर्स ट्रॅक्शनची शक्ती वापरून गाडी थांबवणे अधिक सुरक्षित करण्यात आले आहे आणि ब्रेक वेअरसाठीही हे तंत्रज्ञान सौम्य पद्धतीने काम करते.
अर्टेमचे तंत्रज्ञान वातावरणातील घटकांवर लक्ष ठेवून राहील; आजूबाजूचे वाहनचालक खूप समीप आले तरी त्याचा इशारा देणारे निदर्शक यात आहेतचालकाने वाहन पूर्णपणे वळवले की इंडिकेटर सुरक्षितपणे व आपोआप बंद होतोवळताना इंडिकेटर देऊनही एखादे वाहन अगदी जवळ येऊन धोका निर्माण करण्याच्या बेतात असेल तर त्याची सूचनाही चालकाला ब्लाइंड-स्पॉट इशारा प्रणालीच्या माध्यमातून दिली जातेया प्रणाली यापूर्वी केवळ हाय-एण्ड कार्समध्ये उपलब्ध होत्या.यांमुळे दुचाकी वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये आमूलाग्र अशी सुधारणा होणार आहे.
अपघात झाल्यास, M9 स्कूटरकडूनआधीच आपण पुरवलेल्या ५ क्रमांकांना स्वयंचलित टेक्स्ट मेसेजेस पाठवले जातातमध्यवर्ती कॉल सेंटर हे स्थानिक आपत्कालीन प्रतिसाद देणारे केंद्र असल्याने तेथेही माहिती पोहोचवली जातेकंपनीचे चीफ नॉलेज ऑफिसर वत्सल शहा म्हणतातअपघातात मृत्यू होण्याचे सर्वांत पहिले कारण म्हणजे वेळेवर वैद्यकीय मदत न मिळणे.टक्कर इशारा प्रणाली चालकाच्या नातेवाईक व मित्रांसोबतच यंत्रणेलाही जागे करून त्वरित कृती करण्यास मदत करते.
यापुढे जाऊन पर्यावरणाचा विचारही अर्टेम करत आहे. इलेक्ट्रिक वाहने प्रदूषणाला आळा घालू शकत नाहीतकारण बहुतांश विजेची निर्मिती कोळशापासूनच होते, आर्य स्पष्ट करतातया समस्येवर एकात्मिक पायाभूत उपाय म्हणून अर्टेमचे उद्दिष्ट आहे सौरऊर्जेवर आधारित बॅटरी स्वॅपिंगसाठी सुविधा निर्माण करण्याचेयामध्ये सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग केंद्रे पेट्रोल पंपांप्रमाणे जागोजागी स्थापन करता येतील.


Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24