व्हॉल्वो XC40 गाडीचे बुकिंग आज पासून सुरु, ४ जुलै ला लाँच होणार कार
व्हॉल्वो XC40 गाडीचे बुकिंग आज पासून सुरु, ४ जुलै ला लाँच होणार कार
व्होल्वो कार इंडिया ऑल- XC40 लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. युरोपियन कार ऑफ द इयर ची उपाधी जिंकल्यानंतर लवकरच XC40 भारतात उपलब्ध होईल. हैदराबादमध्ये सध्या मीडिया ड्राइव्ह चालू आहे. कंपनी ला अपेक्षा आहे कि XC40 लाँच होण्या आधीच संपूर्ण २०० युनिट्सप्रीबुक होतील. कारण हि गाडी वेगळ्या वैशिष्टयां मूळे एसयूव्ही सेगमेंटमध्ये नावीन्य आणणारी आहे. इच्छुक ग्राहक व्होल्वो कार च्या डीलर कडे हि गाडी प्रीबुक करू शकतात. कार चे वैशिष्ट्य आणि किंमत ह्याची माहिती ग्राहकांना कार लाँच च्या वेळी मिळेल, पण ५ लाख रुपये व्होल्वो कार च्या डीलर कडे जमा करूनइच्छुक ग्राहक लगेच हि गाडी बुक करू शकतात.
व्हॉल्वो कार इंडिया:
स्वीडिश लक्झरी कार कंपनी व्हॉल्वो कार इंडिया (व्हीसीआय) ने 2007 मध्ये भारतात पदार्पण केले आणि तेव्हापासून कंपनी भारत देशात स्वीडिश ब्रॅंड बाजारपेठेवर सखोलतेने काम करते आहे. व्होल्वो कार सध्या अहमदाबाद, बेंगळुरू, चंडीगढ, चेन्नई, कोयम्बटूर, दिल्ली एनसीआर - दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली आणिगुरगाव, हैदराबाद, जयपूर, कोची, कोझीकोड, लखनऊ, लुधियाना, मुंबई, पुणे, रायपूर, सूरत, विशाखापट्टनम आणि विजयवाडा ह्या शहरांमध्ये कार विक्री करीत आहे.
Comments
Post a Comment