इनव्हॉईसमार्टच्या मंडळावर युनियन बॅंक ऑफ इंडिया वित्तसहाय्यकाच्या भूमिकेत

इनव्हॉईसमार्टच्या मंडळावर युनियन बॅंक ऑफ इंडिया  वित्तसहाय्यकाच्या भूमिकेत
 इनव्हॉईसमार्ट या अग्रेसर डिजिटल इनव्हॉईस डिस्काऊंटिंग बाजारपेठेने एमएसएमईंना इनव्हॉईस सवलत देण्यासाठी युनियन बॅंक ऑफ इंडियाशी भागीदारी केली आहे. ट्रेड्स व्यासपिठावर युनियन बॅंकेची वित्तसहाय्यक म्हणून नेमणूक झाल्यानंतरआता त्यांच्या वित्तसहाय्यकांची संख्या १४ वर पोहोचली आहे.
या वेळी बोलताना ट्रेड्स लिमिटेडचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक श्री. कल्याण बसू म्हणाले, “इनव्हॉईसमार्टच्या व्यासपिठावर युनियन बॅंक ऑफ इंडिया आता वित्तसहाय्यक म्हणून आली असल्याचा आम्हाला आनंद होतो आहे. देशातील एमएसएमई क्षेत्राच्या भरभराटीसाठी त्यांचे अमूल्य सहाय्य आम्हाला लाभेलअशी आशा आहे. परिसंस्थेच्या बळकटीसाठी वित्तसहाय्यक हा अत्यंत महत्वाचा घटक असतो आणि एमएसएमईला आवश्यक असलेले मोठे भांडवल त्यांच्याकडून उपलब्ध होते.’’
एमएसएमईंना भांडवल मिळवण्याकरिता कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते त्याविषयी तसेच, वित्तीय परिसंस्थेतील त्रुटींविषयी टीमला जाणीव आहे. संस्थात्मक कर्जदारांना लघु उद्योजकांपर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण करणारी ही दरी तंत्रज्ञानाच्या मदतीने भरून काढण्याचा आमचा प्रयत्न असून सुरुवातीच्या टप्प्यावर ऑफलाईन चॅनल्सच्या माध्यमातून हे काम पार पाडण्याचे आमचे ध्येय आहे.
युनियन बॅंक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक श्री. ए. के. गोयल म्हणाले, “ट्रेड्स व्यासपीठ म्हणून इनव्हॉईसमार्टशी भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद होत असून पारदर्शक आणि स्पर्धात्मक किमतीसह वेगवान व्यापार वित्तसहाय्य एमएसएमईंना पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता डीईबीटीचा अंतर्भाव प्राधान्यक्रमावरील कर्जामध्ये होणार असल्याने आमचा वित्तीय व्याप वाढवण्याची आम्हाला या भागीदारीमुळेच संधी मिळणार आहे.’’
RAV_8421-1
फोटो ओळ डावीकडून उजवीकडे – श्री. पी. एस. राजनमहाव्यवस्थापक (क्रेडीट पॉलिसी आणि एमएसएमई), युनियन बॅंक ऑफ इंडियाश्री. ए. के. गोयल,कार्यकारी संचालकयुनियन बॅंक ऑफ इंडियाश्री. कल्याण बसूव्यवस्थापकीय संचालक आणि सीईओए. ट्रेड्स लिमिटेडश्री. व्ही. व्ही. शेणॉय,महाव्यवस्थापक (लार्ज कॉर्पोरेट व्हर्टीकल)युनियन बॅंक ऑफ इंडिया

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24