“से नो टू प्लास्टिक” टाटा पॉवर क्लब एनर्जीने सुरू केले ऑनलाइन मोड्युल


से नो टू प्लास्टिकटाटा पॉवर क्लब एनर्जीने सुरू केले ऑनलाइन मोड्युल
~पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या तीव्र आवश्यकतेला पाठिंबा~
 क्लब एनर्जीही टाटा पॉवरची देशव्यापी संसाधन आणि ऊर्जा संवर्धन मोहीम, पर्यावरण व संसाधन संवर्धनाबद्दल देशभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी, अविश्रांत काम करत आहे. राष्ट्रबांधणीवरील आपला धोरणात्मक भर कायम ठेवत तसेच जागतिक पर्यावरण २०१८च्या विषयाशी सुसंगती राखत, कंपनीने आपल्या क्लब एनर्जीसाठी नवीन ऑनलाइन मोड्युलची- “से नो टू प्लास्टिकची घोषणा केली आहे.



प्लास्टिकच्या वापरामुळे आरोग्याला तसेच पर्यावरणाला निर्माण होणाऱ्या धोक्यांबद्दल लोकांमध्ये संवेदनशीलता निर्माण करण्याच्या हेतूने हे नवीन मोड्युल सुरू करण्यात आले आहे. लोकांना एकत्र येऊन प्लास्टिकला शाश्वत पर्याय शोधून काढण्याचे आवाहन हे मोड्युल करत आहे. यामुळे सागरी प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या, सागरी जीवनाला धोका पोहोचवणाऱ्या आणि मानवी आरोग्यासाठी हानीकारक ठरणाऱ्या एकदा वापरून टाकून देण्याजोग्या प्लास्टिकच्या अतिवापराला आणि उत्पादनाला आळा बसेल.
या मोड्युलचा उद्देश ऑनलाइन मार्गाने मोठ्या जनसमूहापर्यंत पोहोचणे असून त्यायोगे कणखर नागरी व नैतिक मूल्ये बिंबवणे, प्लास्टिकचे मानवावरील तसेच प्राण्यांवरील हानीकारक परिणाम स्पष्ट करून सांगणे, प्लास्टिक प्रदूषणाचे मूळ कारण स्पष्ट करून आपण त्याचा वापर थांबवून संसाधनांचे संवर्धन कसे करू शकतो ते सांगणे अशी अनेक उद्दिष्टे यामुळे साध्य करता येतील. “से नो टू प्लास्टिकया विषयावरील मोड्युलस्वच्छ भारतया राष्ट्रीय मिशनवर भर देणारे असून क्लब एनर्जीच्या वेबसाइटवरून- www.clubenerji.com हे होस्ट केले जाईल. यूजर्सनी येथे जाऊन सुलभरितीने नोंदणी केल्यानंतर त्यांच्यासाठी ते उपलब्ध होईल.
यावर मत व्यक्त करताना टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रवीर सिन्हा म्हणाले, “आम्ही, टाटा पॉवरने, आमचा क्लब एनर्जी कार्यक्रम मजबूत करून वैश्विक जनसमूहापर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे. आजच्या ऑनलाइन जनसमूहाला उद्याचे जबाबदार नागरिक होण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत.  आमच्या अलीकडील ऑनलाइन मोड्युलचे, “से नो टू प्लास्टिकचे, उद्दिष्ट प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आणि पर्यावरणाच्या संवर्धनाचे महत्त्व लहान मुलांना पटवून देणे हे आहे...”
शाळा व शालेय विद्यार्थ्यांमधील या उपक्रमाचे मूल्यवर्धन करण्याची प्रचंड क्षमता लक्षात घेऊन, ऊर्जेच्या कार्यक्षम वापराचा प्रसार करण्यासाठी आणि समाजाला हवामान बदलाच्या समस्येबद्दल जागरूक करण्यासाठी क्लब एनर्जीची स्थापना २००७ मध्ये करण्यात आली. आजपर्यंत ही मोहीम मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, पुणे, अजमेर, रांची, जमशेदपूर, बेळगाव, लोणावळा, बेंगळुरू आणि कोलकाता या शहरांमध्ये यशस्वीरित्या राबवण्यात आली आहे. क्लब एनर्जीने १५ दशलक्ष नागरिकांमध्ये संवेदनशीलता निर्माण केली आहे, देशातील २५० शाळांमध्ये मिळून एकूण २१ दशलक्ष वीजएककांची बचत केली आहे. टाटा पॉवरचाक्लब एनर्जीआपल्या विविध उपक्रमांतून लहान मुलांना सक्रिय नेत्यांचा आकार देत जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम पुढेही सुरू ठेवणार आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24