गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने बुलडाणा नागरी सहकारी बँकेत सुरू केली `ऑटोव्हॉल्ट` सुविधा

गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने बुलडाणा नागरी सहकारी बँकेत सुरू केली `ऑटोव्हॉल्ट` सुविधा
अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ऑटोव्हॉल्टमुळे ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार आपला ऐवज सुरक्षितपणे उपलब्ध होईल
१२० वर्षे जुन्या गोदरेज समूहाची एक भाग असलेली आणि सुरक्षितताविषयक सोल्युशन्स पुरविणारी भारतातील प्रसिद्ध कंपनी गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने आज बँकिंग सुरक्षिततेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत `ऑटोव्हॉल्ट` सुविधा उपलब्ध केली आहे. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रस्तेवाहतूकमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे बुलडाणा नागरी सहकारी क्रेडिट सोसायटी लि.च्या उद्घाटन सोहळ्यात `ऑटोव्हॉल्ट` या स्वयंचलित सेफ डिपॉझिट लॉकरचा शुभारंभ करण्यात आला.
बहुस्तरीय सुरक्षा प्रणालीने सज्ज असलेल्या ऑटोव्हॉल्टमुळे ग्राहकांना कोणत्याही त्रासाविना तसेच कर्मचाऱ्यांच्या हस्तक्षेपाविना आपला मौल्यवान ऐवज कोणत्याही वेळी उपलब्ध होऊ शकेल. याशिवयाया उपाययोजनेमुळे ग्राहकाला रुममध्ये पूर्णपणे गोपनीयता राखली जाईल. आपले स्मार्ट/ अॅक्सेस कार्ड स्वाईप केल्यावर त्याला/ तिला लॉकर रुमपर्यंत पोहोचता येईल.
अशा प्रकारचे पहिलेच लॉकर असलेल `ऑटोव्हॉल्ट` हे `डिजिटल इंडिया` अभिनयाच्या दृष्टीने उत्तम उदाहरण ठरेल.

ऑटोव्हॉल्टचे कार्य कसे असेल :
लॉकर बूथमध्ये प्रवेश करण्यासाठी ग्राहकाला आपल्या स्मार्ट/ अॅक्सेस कार्डचा वापर करावा लागेल.
·         ग्राहकाला एलसीडी पॅनेलवर आपल्याकडील चार आकडी डिजिटल पिन प्रमाणित करावा लागेल.
·         स्वयंचलन प्रणालीद्वारे ग्राहक बसलेल्या लॉकर बूथमधील टेबलावर संबंधित लॉकर येईल.
·         त्यानंतर ग्राहक वैशिष्ट्यपूर्ण किल्ली वापरून वैयक्तिक लॉकर उघडू शकेल.
·         ग्राहकाचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्याला/ तिला किल्लीचा वापर करून लॉकर पुन्हा कुलूपबंद करून एलसीडी स्क्रीनवरील `रिटर्न` बटन दाबावे लागेल.
·         स्वयंचलित रोबोटिक प्रणालीद्वारे लॉकर सुरक्षितपणे पुन्हा व्हॉल्टमधील त्याच्या जागेवर ठेवला जाईल.

मळलेली पायवाट सोडून नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न कायमच गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स करत असल्याने सुरक्षिततेच्या बाबतीत सातत्याने नव्या तंत्रज्ञानाचाच अवलंब करण्यात आला आहे. `ऑटोव्हॉल्ट` देखील अशीच अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था असून त्याने बँकिंग सुरक्षिततेला नवे आयाम दिले आहेत. या अत्याधुनिक यंत्रणेबाबत गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सचे उपाध्यक्ष आणि गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सच्या मार्केटिंगसेल्स आणि इनोव्हेशनचे ग्लोबल हेड श्री. मेहेर्नोश पिथावालायांनी सांगितले की, `नाविन्यता हा मूळ गाभा कायम राखत गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने ग्राहकांना चांगला अनुभव मिळावायावर कायमच भर दिला आहे.`ऑटोव्हॉल्ट`मुळे केवळ बँकिंग सुरक्षाविषयक पायाभूत सुविधा बळकट होणार नाही तरत्यांच्या ग्राहकांना देखील व्यवहार करणे अतिशय सुलभ होणार आहे.`
`या डिजिटल युगातकमालीची सुरक्षितता उपलब्ध करू शकेल असे तंत्रज्ञान पुरविणे हे अतिशय महत्त्वाचे ठरते. बुलडाणासारख्या बँकेने देशभरातील वित्तीय संस्थांसाठी एक उदाहरण सादर केले आहेयाचा आम्हाला आनंद होत आहे.`
बुलडाणा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिरीष देशपांडे म्हणाले की, ``ऑटोव्हॉल्ट` सुविधेचा शुभारंभ आणि आमच्या नव्या शाखेचे उद्घाटन करण्याबरोबरच आमच्या आणखी पाच शाखांमध्ये या अत्याधुनिक तंत्रज्ञाचा समावेश करून ५००० ग्राहकांचे लक्ष्य साध्य करण्याचा आमचा प्रयत्न राहील.`
याप्रसंगी इटोकी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री. हिरोशी जिंझा यांनी सांगितले की, `गोदरेजचे भागीदार असणेही इटोकीसाठी आनंददायी बाब आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या `ऑटोव्हॉल्ट`मुळे बँकेला आपल्या ग्राहकांना एक आल्हाददायक अनुभव देता येईल.`
गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सबद्दल माहिती :
गोदरेज अॅण्ड बॉईस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि.चा विभाग असलेली गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स ही कंपनी ४.१ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या गोदरेज समूहाचा एक हिस्सा आहे. या व्यवसायातील आद्यप्रवर्तक आणि आघाडीचा गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स डिव्हिजन हा सुरक्षाविषयक उपकरणांच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठा उत्पादक आणि मार्केटर आहे. अनेक नामांकित बँकिंगकॉर्पोरेट आणि सार्वजनिक संस्थांना सुरक्षाविषयक सोल्युशन्स पुरवणारी ही आघाडीची कंपनी आहे. उद्योगात आणि श्रेणीत पहिल्यांदाच `सुपरब्रॅण्ड`चा बहुमान गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स डिव्हिजनला मिळाला आहे. गृहपयोगी वस्तूंच्या श्रेणीत `सर्वाधिक पसंतीचा ब्रॅण्ड`चा पुरस्कारही या कंपनीला मिळाला आहे. मध्य पूर्व आशियादक्षिण पूर्व आशियापूर्वदूर आशियापूर्व आफ्रिकाअमेरिकायुरोप आणि सार्क देशांसह ४५ देशांमध्ये ही कंपनी आपली उत्पादने निर्यात करते.
अधिक माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या :  www.godrejsecure.com

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता