"युथ कि आवाज समिट २०१८"
भारतातील गंभीर समस्यांवर चर्चा करण्यासाठी
"युथ कि आवाज समिट २०१८"
"युथ कि आवाज समिट २०१८" हा भारतातील सर्वात विशाल क्राउडसोर्स्ड डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म युथ कि आवाज द्वारा आयोजित कार्यक्रम आहे. या कार्क्रमामध्ये २००० पेक्षाअधिक युवकांसमोर देशभरातील ३० अधिक युवा चेंजमेकर्स त्या विषयांवर चर्चा करतील जे सामाजिक आणि राजनैतिक दृष्टीने महत्वाचे आहेत. दिनांक १ आणि २ सप्टेंबर २०१८ ला दिल्लीमधील जनपथस्थित डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये होणाऱ्या या संमेलनात अत्यावश्यक संवाद, वादविवाद आणि पॅनल डिस्कशन होणार आहेत. संमेलनादरम्यान जातीवाद, खोट्या बातम्यांचा वेगाने होणाराप्रसार, लिंगभेद, मलमूत्र वाहून नेणे, जपानच्या मियावाकी पद्धतीने शहरातील जंगलांचा बचाव करणे, रस्त्यांवर राहणाऱ्या कोणतीही ओळख नसलेल्या लाखो मुलांचे भविष्य, महिला पोलीस अधिकाऱ्यांनासामना करावी लागणारी पितृसत्ता यांसारख्या कठीण मुद्द्यांवर बोलले जाणार आहे.
Comments
Post a Comment