डॉक्युमेंटरी ‘लिव्हिंग जैनीजम’ने उलगडले जैन धर्माच्या अध्यात्मिकतेमागील विज्ञान
डॉक्युमेंटरी ‘लिव्हिंग जैनीजम’ने उलगडले
जैन धर्माच्या अध्यात्मिकतेमागील विज्ञान
प्रतिनिधी- जैन धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक आहे. भारतात निर्माण झालेल्या या धर्माची पाळेमुळे गेल्या शेकडो वर्षांत जगाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचली आहेत. 30 ऑगस्ट रोजी, ‘लिव्हिंग जैनीजम’ डॉक्युमेंटरी प्रदर्शित करण्यात आली. त्यामध्ये या धर्माचे मूळ व सध्या जीवन जगण्यासाठी या धर्माचे पालन करणारे आधुनिक अनुयायी याचे दर्शन प्रेक्षकांना घडवण्यात आले आहे. रिद्धिसिद्धी बुलिअन लिमिटेडचे संचालक भवरलाल कोठारी यांनी डॉक्युमेंटरीचे अनावरण केले. हा मुंबईतील द एम्पिरिअल क्लब येथे झाला.
राजेंद्र श्रीवास्तव यांची दिग्दर्शित केलेली व पल्स मीडियाने साकारलेली लिव्हिंग जैनीजम ही डॉक्युमेंटरी जगातील या सर्वात जुन्या धर्माचे मूळ, तत्त्वज्ञान, तत्त्वे व शिकवण यांचे चित्रण करते. चाळीस मिनिटांच्या या डॉक्युमेंटरीमध्ये, जैन स्कॉलर्सच्या मुलाखती व संशोधन संकलित केल्या आहेत, भगवान महावीरांची व अगदी सुरुवातीच्या तीर्थंकरांची शिकवण, तसेच दैनंदिन जीवनात जैन धर्माची तत्त्वे अंगीकारणारे आधुनिक, यशस्वी जैनधर्मीय यांचाही समावेश केला आहे.
आजकालचे जीवन धावपळीचे असल्याने, समतोल साधण्यासाठी स्वतःच्या आंतरमनाशी संवाद साधणे अधिक महत्त्वाचे बनले आहे. जीवनाला अर्थ व सखोलता देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आधुनिक जगातील प्रत्येक नागरिकासाठी ही डॉक्युमेंटरी आहे. सध्याच्या धकाधकीच्या व अस्थिर जगात, शांततेबद्दल संवाद साधण्याच्या दिशेने या निमित्ताने एक पाऊल टाकण्यात आले आहे.
रिद्धिसिद्धी बुलिअन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज कोठारी यांनी सांगितले, “पर्युषणाच्या पवित्र निमित्ताने लिव्हिंग जैनीजम प्रदर्शित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही ही डॉक्युमेंटरी 60वा वाढदिवस साजरा करत असलेले भवरलाल कोठारी यांना समर्पित करत आहोत. ते धर्मनिष्ठ जैन आहेत. त्यांच्या मते, जैन धर्माची तत्त्वे आजच्या काळासाठी अत्यंत समर्पक आहेत. लिव्हिंग जैनीजममार्फत, आम्हाला अहिंसा, अनेकांतवदा, सत्य व वैराग्य ही तत्त्वे आजच्या तरुणांपर्यंत पोहोचवायची आहेत. आजच्या जीवनशैलीमध्ये जैन धर्म कशा प्रकारे अंगिकारला जातो आहे, लोकांना कामाच्या ठिकाणी व वैयक्तिक प्रगतीमध्ये तो कशा प्रकारे मदत करत आहे, ते डॉक्युमेंटरीमध्ये अधोरेखित केले आहे. जैन धर्माचे पालन करणाऱ्या वा न करणाऱ्या जगभरातील सर्व लोकांना जैन धर्माच्या मूलभूत तत्त्वांच्या मदतीने अधिक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी लिव्हिंग जैनीजम उपयुक्त ठरेल, अशी आमची अपेक्षा आहे.”
जगभर अंदाजे 5 दशलक्ष व्यक्ती जैन धर्माचे पालन करतात. त्यापैकी बहुतेक जण भारतातील आहेत, परंतु अमेरिका, युरोप, केनया, हाँगकाँग व फिजी येथेही जैन धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. प्राण्यांसाठी भूतदया दाखवण्याबरोबरच, जैनधर्मीय भारतातील सर्वात यशस्वी व साक्षर धर्मियांपैकी एक समजले जातात.
ही डॉक्युमेंटरी युट्यूबवर लाइव्ह आहे व जगभरातील प्रेक्षकांना पाहण्यासाठी खुली आहे. लिव्हिंग जैनीजम हा रिद्धिसिद्धी बुलिअन लिमिटेड (आरएसबीएल) या भारतातील आघाडीच्या बुलिअन कंपनीच्या सीएसआर उपक्रमांचा भाग आहे.
Comments
Post a Comment