टाटा पॉवरच्या सौरऊर्जानिर्मिती शाखेने उभारली जगातील सर्वात मोठी सोलर रूफटॉप यंत्रणा




मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या क्रिकेट स्टेडिअमसाठी टाटा पॉवरच्या 
सौरऊर्जानिर्मिती शाखेने उभारली जगातील सर्वात मोठी सोलर रूफटॉप यंत्रणा


·         820.8kWp क्षमतेची सौर छत यंत्रणा
·         मुंबईतील सीसीआय स्टेडियम बनले पर्यावरणस्नेही
·         प्रति वर्ष 1.12 दशलक्ष युनिट्स ऊर्जानिर्मितीचा अंदाज
·         कार्बन उत्सर्जनामध्ये वर्षाकाळी 840 टनांची घट होणार


भारतातील सर्वात मोठी एकात्मिक सौरऊर्जा कंपनी आणि संपूर्णत: टाटा पॉवरच्या मालकीची सहसंस्था असलेल्या टाटा पॉवर सोलरने मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे 820. kWp क्षमतेचा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारला आहे. मुंबईमधील या स्टेडियमसाठी छतावरील अर्थात सोलर रूफटॉप यंत्रणा उभारण्याचा हा प्रकल्प टाटा पॉवर सोलारने हाती घेतला होता व 100 दिवसांत तो पूर्ण करण्यात आला. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्टेडिअमचे उद्घाटन झाले. सौरऊर्जेच्या क्षमतेचा वापर करून घेण्यासाठी टाटा पॉवर सोलरने क्रिकेट क्लब ऑफ इंडियाबरोबर केलेल्या हातमिळवणीतून हा प्रकल्प उभा राहिला आहे. या सोलर रूफटॉपच्या उभारणीमुळे वर्षाकाठी 1.12 दशलक्ष विद्युतनिर्मिती होणार आहे, ज्यातून वीजवापरावरील खर्चामध्ये 25 टक्‍क्‍यांची बचत होणार आहे. सध्या स्टेडिअमकडून (DG वर चालणारी स्टेडिअम फ्लडलाइट्साठीची विद्युत यंत्रणा वगळता) प्रति महिना सरासरी 4 लाख kWh इतकी वीज वापरली जाते, पण सौरऊर्जा यंत्रणा बसविल्यामुळे ग्रीडमधून घेतल्या जाणा-या विजेचे प्रमाण प्रति महिना सरासरी 3 लाख kWh पर्यंत खाली येईल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर सीसीआयला वर्षाकाठी 840 टनांहून अधिक कार्बनउत्सर्ग आटोक्यात ठेवता येणार आहे.

टाटा पॉवरचे एमडी आणि सीईओ श्री. प्रवीर सिन्हा म्हणाले, ''मुंबईमध्ये सौरऊर्जेवर चालणारे जगातील सर्वात मोठे स्टेडिअम उभारण्यासाठी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाशी केलेल्या भागीदारीचा आम्हाला आनंद आहे. पुनर्नवीकरणीय आणि शाश्वत ऊर्जार्निर्मितीशी जोडलेली आमची उद्दीष्ट्ये पूर्ण कऱण्याच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही सतत करत असतो.''

कार्बनउत्सर्ग कमी करून पर्यावरणीय दृष्टिकोनातून अधिक जबाबदार कामगिरी करून दाखविण्याच्या हेतूने क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने मुंबईतील सीसीआय स्टेडिअममध्ये 820.8 kWp क्षमतेच्या छतावर बसवायच्या सौरऊर्जा यंत्रणा प्रकल्पाला सुरुवात केली.

टाटा पॉवरच्या पुनर्नवीकरणीय ऊर्जा विभागाचे अध्यक्ष श्री. आशिष खन्ना यांनी आपल्या विधानामध्ये असे म्हटले आहे की, ''एकाच जागी जगातील सर्वात मोठी रूफटॉप सोलर यंत्रणा उभारल्यानंतर तसेच कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतातील सर्वात मोठे कारपोर्ट उभारल्यानंतर टाटा पॉवर सोलरने सीसीआय, मुंबई इथल्या क्रिकेट स्टेडिअममध्ये जगातील सर्वात मोठ्या रूफटॉप सोलर यंत्रणेची उभारणी केली आहे, तीही विक्रमी शंभर दिवसांत.''

या प्रसंगी बोलताना, सीसीआयचे अध्यक्ष श्री. प्रेमल उदानी आणि सीसीआयच्या पायाभूत सुविधा व हरित तंत्रज्ञान समितीचे उपाध्यक्ष श्री. राकेश कपूर म्हणाले, ''पुनर्नवीकरणीय ऊर्जेवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन देणा-या प्रकल्पांच्या आम्ही नेहमीच शोधात असतो आणि हा महत्त्वाचा प्रकल्प उभारण्यासाठी टाटा पॉवर सोलरशी केलेल्या भागीदारीचा आम्हाला आनंद आहे. TATA ब्रँडच्या वचनबद्धतेला जागत त्यांनी हे काम पूर्ण केले आहे. स्टेडिअम्समधील छतावरील जागेचा पर्यावरणरक्षणासाठी वापर करण्याचे उदाहरण यानिमित्ताने लोकांसमोर आले आहे.''

टाटा पॉवर सोलरने आजवर 1.45 GW हून अधिक क्षमतेच्या जमिनीवरील सौरऊर्जानिर्मिती यंत्रणा उभारणीचे काम पूर्ण केले असून 220 MW हून अधिक क्षमतेच्या रूफटॉप यंत्रणा उभारल्या आहेत. तसेच देशाच्या विविध भागांमध्ये ऊर्जानिर्मिती प्रकल्पांचे वितरण केले आहे. BRIDGE TO INDIA या अग्रणी क्लिनटेक आणि नॉलेज सर्व्हिस पुरवठादार संस्थेने बनविलेल्या, EPC रूफटॉप सोलर यंत्रणा तयार करणा-या कंपन्यांच्या मानांकन यादीमध्ये टाटा पॉवर सोलरला गेली चार वर्षे सातत्याने पहिले स्थान मिळत आहे. 31 मार्च 2018 पर्यंतच्या आकडेवारीनुसार टाटा पॉवर सोलारने आजवर एकूण 220 MW हून अधिक क्षमतेच्या यंत्रणा बसविल्या आहेत. व्यापारी, निवासी तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये या यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE